Diwali Wishes in Marathi | Diwali message in Marathi | Shubh diwali in Marathi | मराठी दिवाळी संदेश

Diwali Wishes in Marathi / Diwali message in Marathi / Shubh diwali in Marathi / मराठी दिवाळी संदेश 🪔

Diwali information in Marathi: दिवाळी हा एक असा सण आहे जो भारतसह जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. दिवाळीचा सण हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या दिवशी, अयोध्येचा राजा, श्री राम यांनी आपले 14 वर्षांचे वनवास संपवून आपल्या राज्यात परत आले होते आणि म्हणूनच लोकांनी सगळीकडे दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते.

Diwali wishes in Marathi: तर मित्रांनो तुम्हाला दिवाळी का साजरी केली जाते याबद्दल तर समजलेच असेल. आणि या सणाला अजून अनमोल करण्यासाठी आम्ही या लेखामध्ये घेऊन आलो आहोत Diwali message in Marathi. हे सुंदर सुंदर diwali quotes in marathi तुम्हाला दिवाळी सणाचे महत्त्व जाणून घेण्यास मदत करेल व तुमचा संदेश इतरांनाही पोचवण्यात देखील मदत होईल.

ये लेखामध्ये आम्ही काही निवडक Diwali images in Marathi, Happy Diwali wishes in marathi सह Dhantrayodashi wishes in Marathi, balipratipada Messages in Marathi, Diwali greetings in marathi तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही कॉपी किव्हा इमेजेस डाउनलोड करून Facebook आणि Whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत वर तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करू शकता.


Happy Diwali wishes in Marathi । Shubh Diwali in Marathi

Happy diwali wishes in marathi
Happy diwali wishes in marathi

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ⚡️⭐️

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.🪔
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
ली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
🪔शुभ दीपावली🪔

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


Diwali greetings in Marathi / दीपावलीच्या शुभेच्छा

Diwali greetings in marathi
Diwali greetings in Marathi

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,
दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त
आपणास व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

सुखं होवोत ओव्हरफ्लो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव,
मिळो आम्हा भक्तांना
सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या
शुभेच्छा अपरंपार.

धनाची पुजा यशाचा
प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान
मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा
फराळ समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब, सहपरिवरास
🪔सोनेरी शुभेच्छा!!!🪔

आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने आनंदाने
आनंदमय झाली सर्व
मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
🪔🪔Happy Diwali🪔🪔


Diwali message in Marathi / दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

Diwali message in Marathi
Diwali message in Marathi

अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.🪔

प्रत्येक घर उजळू दे,
कधीही न होवो अंधार,
घराघरात साजरा होऊ दे
आनंद, घराघरात होवो दिवाळी,
प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी,
प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी
णि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ,
सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून
मनात ठेऊ नये शंका आणि
शुभेच्छांमध्ये असो गोडवा.

हात पकडून पुन्हा खेळूया,
आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया,
विसरून जुने हेवे-दावे,
चला मिळून दिवाळी साजरी करूया.

दिवे तेवत राहोत,
म्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे
आमची, दिव्यांप्रमाणे उजळत
राहो आयुष्य तुमचे.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.🪔

तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔

दिव्यांच्या रोषणाईने
उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने
आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.

प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट,
पुन्हा आला प्रकाशाचा सण,
तुम्हाला आमच्या आधी
कोणी शुभेच्छा देण्याआधी
आमच्याकडून दिपावलीचा
हा आनंदी संदेश.

हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःखक विसरून सगळ्यांना
मिठी मारा आणि
प्रेमाने दिवाळी साजरी करा.


Diwali message in Marathi / Diwali SMS in Marathi

Diwali quotes in marathi
Diwali quotes in Marathi

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,
प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं,
या दिवाळीत तुमच्याही
आयुष्यात येवो खूप खूप आनंद,
रोषणाईने उजळलेल्या घरात
होवो माता लक्ष्मीचं आगमन.

सदा राहिलात हसतमुख
तर रोजच आहे दिवाळी,
तुमचा खिसा न होवो कधी रिकामा,
मग भले येवो कितीही तंगी,
मित्रांच्या आयुष्यात राहो
सदैव खुशाली तेव्हाच असेल
माझी खरी दिवाळी.🪔
हॅपी दिवाळी.🪔

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स,
भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.

शुभ दीपावलीच्या निमित्ताने
सारे एकत्र येतात,
जुने हेवेदावे विसरतात,
सर्वांच्या संसारात राहो
सुख-शांती आणि समादान,
प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.

दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की,
तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो,
हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं
आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.

आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल,
सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई
आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
🪔शुभ दिवाळी.🪔

दिवे तेवत राहो,
सर्वाचं घर प्रकाशमान होवो,
सर्व स्वप्नं पूर्ण होवो,
हे दिवस असेच झगमगत राहोत,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.🪔

दीपावली असा आहे सण,
जो येतो बऱ्याच काळानंतर
वर्षातून एकदा.
चला मस्तपैकी करू फराळ
आणि खाऊ मिठाई,
तुम्हा सर्वांना दीवाळीच्या
खूप खूप शुभेच्छा.
🪔हॅपी दिवाळी.🪔

चला आज पुन्हा एकदा दीप लावूया,
रूसलेल्यांना मनवूया,
डोळ्यातील उदासी दूर करून
जखमांवर फुंकर घालूया.
चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.🪔

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,
आपल्या मेंदूला आणि बुद्धीला
गणेशासारखं बनवा.
सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या
आणि दिवाळीचा आनंद लुटा.


Diwali whatsapp messages in Marathi / Diwali status in Marathi

Diwali images in marathi
Diwali images in Marathi

दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा,
आनंदाचा होवो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे
शुभेच्छा यश आणि
आनंद मिळो आम्हा सर्वांना.

दीपावली आल्यावर काढा रांगोळी,
लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔

दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने
माझ्या शुभेच्छा कबूल करा,
आनंदाच्या या वातावरणात मलाही
सामील करा.

दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास,
डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार,
फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार,
🪔हॅपी दिवाळी.🪔

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर,
प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं दुःख,
सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.🪔

दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात
आनंदाच्या भेटी आणो.

आहे सण रोषणाईचा,
येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी
सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.

धनाचा होवो वर्षाव,
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव,
मिळो नेहमी समृद्धी अशी होवो
खास तुमची आमची दिवाळी.

दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.

दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया,
सगळीकडे स्वच्छता करून
पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
🪔हॅपी दिवाली.🪔

दीप जळत राहो तुमचं
घर प्रकाशमान राहो,
या दिवाळीच्या सणाला
तुम्हाला सर्व सुख मिळो,
🪔🪔शुभ दिपावली.🪔🪔

दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना
साजरा करायचा आहे,
सुरक्षित आणि सार्थक
आनंद मिळवायचा आहे.
स्वच्छ भारत आणि सुंदर
निसर्गाला कायम ठेवायचं आहे.

मोठ्यांचा मिळो आशिर्वाद,
आपल्यांची मिळो साथ,
आनंद मिळो जगभरातून,
देवाकडून मिळो भरभराट,
हीच मनापासून आहे इच्छा
दिवाळीसाठी खास.🪔

वाईटाचा अंत होऊन
सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले
सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प
परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास
त्याला करू मिळून पार.
दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.🪔

आम्ही जेव्हा आकाशात
आतिषबाजी करतो आपल्या
दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो,
यंदा भेटूया सारे आणि
दुःखांना करूया असंच दूर,
🪔🪔सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔🪔


Diwali quotes in Marathi

Diwali status in Marathi
Diwali status in Marathi

दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे
आनंदाचा साक्षात्कार,
मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार..
सर्वांना हॅपी दिवाळी.🪔

दिवाळीची लाईट,
सगळ्यांना करो डिलाईट,
पकडा मस्तीची फ्लाईट,
धमाल करा ऑल नाईट…
🪔🪔हॅपी दिवाळी🪔🪔

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर
कशाला हवा फटाक्यांचा पसारा.

दिवाळीची शान तेव्हाच आहे
जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाजे,
त्यांच्याकडेही असेल मिठाई,
जोपर्यंत दूर होणार नाही हा
भेदभाव तोपर्यंत कशी होईल
दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी मगच
साजरी करा दिवाळी.🪔

एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
🪔|● शुभ दिपावली ●|.🪔

संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा… स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी… स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा……… आजपासून दिवाळी सुरू होतेय….. सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!

उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


Funny diwali message in Marathi

जर तुमची गर्लफ्रेन्ड तुमच्याकडे
चंद्र तारे तोडून आणायची
मागणी करत असेल तर
एक रॉकेट विकत घ्या,
त्यावर तिला बसवा आणि द्या रॉकेट पेटवून.

इकोप्रेमी दिवाळी साजरी करा,
ध्वनी रहित दिवाळी साजरी करा
म्हणजे आपल्या बायकोला
तिच्या घरी पाठवून द्या
🪔🪔Happy Diwali!🪔🪔

या दिवाळीला तुमच्या
शेजाऱ्यांची झोप उडवत राहा हा
तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🪔🪔

दिवाळीसाठी झाली घराची सफाई
आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री,
व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई

मी माझं मन फक्त पूजा,
अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना
आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो
अजून कोणी शेजारी राहत असेल
तर सांगा शुभ दिपावली.🪔

मी अशी आशा करतो की,
दिवाळीच्या या पावन निमित्ताने
आणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने
तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल…
🪔हॅपी दिवाळी.🪔

मी माचिस तू फटाका,
आपण दोघं भेटलो तर
होईल डबल धमाका…
🪔🪔Happy Diwali🪔🪔

तीन दिवसात मोबाईलमध्ये
इतके दिवे जमा झालेत की,
चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय.
🪔हॅपा दिवाळी.🪔

त्या लोकांनाही हॅपी दिवाळी,
जे वर्षभर माझ्यावर जळतात.

तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू,
तू स्वतःचं एक फटाका आहेस.

आली आली काही दिवसांवर दिवाळी,
आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर
त्या होऊन जातील शिळ्या…
🪔🪔 हॅपी दिवाळी. 🪔🪔

देवाचं दिलेलं सर्व काही आहे,
धन आहे, मान आहे फक्
दिवाळीचा बोनस नाही.

जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे
असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन
तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या.
शुभ दिपावली.


Balipratipada Marathi Messages

आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा…
शुभ दीपावली!

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

नव गंध, नवा वास,
नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे..
तमसो मा ज्योतिर्गमय..
दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा


Dhantrayodashi wishes in Marathi / Dhantrayodashi in Marathi

Dhantrayodashi Wishes in Marathi
Dhantrayodashi Wishes in Marathi

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
🪔 शुभ दीपावली 2023!🪔


Tulsi Vivah Marathi Messages (तुळशी विवाह)

Tulsi Vivah imaages in Marathi
Tulsi Vivah imaages in Marathi

अंगणात तुळस, आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर, हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो
नाती हिच आमची ओळख… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!
लग्न इतक्या गडबडीत ठरलं,
आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!
त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,
ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी
हेच निमंत्रण समजुन तुम्ही या….
लग्नाची तारीख 05.11.2021 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..
.
.
.
.
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!!

आज सजली तुळस
शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचं
मोहरला पान पान..

अंगणात उभारला
आज विवाह मंडप,
ऊस झेंडूच्या फुलांची
त्यात सजली आरास..

मुळे सजवली तिची
आज चिंच आवळ्यांनी,
आणि रांगोळी घातली
गुलाबाच्या पाकळ्यांनी..

आहे साताचा मुहूर्त
करू नका हो उशीर,
पण येताना जरूर
तुम्ही आणावा आहेर…

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

ऊसाचे मांडव सजूया आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

ज्या अंगणात तुळस आहे,
ती तुळस खूप महान आहे,
ज्या घरात असते ही तुळस,
ते घर स्वर्गासमान आहे.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवाळी हा प्रेम आणि उत्साहाचा सण आहे. हा वाईटावर विजय मिळवण्याचा सण आहे. हा सण दु:ख दूर करण्यासाठी आणि जीवनात आनंद आणण्याचा आहे. आपण हा सण आपल्या लोकांसोबत आनंदात साजरा केला पाहिजे. दिवाळीच्या या सुंदर पर्वात आपण आपल्यातील उणीवा दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मित्रांनो मला आशा आहे कि इथे दिलेले सर्व Diwali Messages In Marathi (दीवाली मैसेजेस इन मराठी) तुम्हाला आवडले असतील. तुम्ही हे diwali greetings in marathi आपल्या मित्रांसह तसेच आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा, ज्यामुळे दिवाळीच्या या सुंदर पर्वात तुमचे नाते अजून घट्ट होण्यास मदत होईल.

मित्रांनो तुमच्या कडे सुद्धा काही असेच निवडक happy diwali wishes in marathi, diwali quotes in marathi, diwali padwa wishes in marathi असतील तर कंमेंट मध्ये नक्की शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले marathi diwali messages आमच्या वेबसाईट वर नक्की टाकू!

शेवटी, मी तुम्हाला दसरा, दिवाळी आणि धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या दिवाळी निमित्त आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ही देवाला विनंती.


 हे देखील वाचा: बेस्ट भाऊबीज मेसेज
 हे देखील वाचा: दिवाळी शुभेच्छापत्रे
 हे देखील वाचा: दिवाळी विशेष इन इंग्लिश
 हे देखील वाचा: दिवाळी शुभेच्छा मराठीत

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Diwali Wishes in Marathi | Diwali message in Marathi | Shubh diwali in Marathi | मराठी दिवाळी संदेश”

Leave a Comment