Information About Rani Lakshmibai In Marathi | झाशीची राणी लक्ष्मीबाई

झाशीची राणी लक्ष्मीबाई | Information About Rani Lakshmibai In Marathi

झाशीची राणी लक्ष्मीबाई ही एक भारतीय राजकन्या होती जिने रणांगणात स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. पेशव्यांच्या सल्लागार मंडळाचे सदस्य मोरोपंत तांबे यांचि एकुलती एक कन्या म्हणजे मनुबाई राणी. लक्ष्मीबाईंचे खरे नाव मनुबाई होते. मनुबाईंचा जन्म १९ नोव्हेंबर 1835 रोजी काशी येथे झाला.आणि त्या बिठूरमध्ये वाढल्या. मनू चे लहानपण त्यांचे भाऊ नानासाहेब पेशवे राव यांच्या सोबत गेले. नानासाहेब पेशवे मनुबाईंना प्रेमाने छबिली म्हणत.

मनुबाई जेमतेम चार वर्षाच्या असताना त्यांच्या आईचं मृत्यू झालं. त्यामुळे वडील आणि भाऊ यांच्या सहवासात त्या तलवार बाजी , धनुष्य बाण, घोडेस्वार या सगळ्या गोष्टी शिकल्या. लहानपणापासून त्या स्वातंत्र्याच्या गोष्टी ऐकत मोट्या झाल्या, त्यामुळे लहानपणापासून देशाबद्दल प्रेम आणि आदर त्यांच्या मनात भरले होते.

१९४२ मध्ये मनुबाईचे लग्न झाशीचे शेवटचे पेशवे राजा गंगाधर राव याच्यासोबत झाले. लग्नानंतर या मनुबाई आणि छबलीला “राणी लक्ष्मीबाई” म्हणायला सुरवात झाली . लग्नाच्या नऊ वर्षानंतर राणी लक्ष्मीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु त्या बाळाचे तीन महिन्यांनंतर मृत्यू झाले.

गंगाधररावांना राज्याच्या भविष्याची चिंता पडली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास व्हायला लागला त्यांच्या दुखा:चे आणखी एक कारण होते. ते म्हणजे त्या वेळचा गव्हर्नर जनरल लार्ड डलहौसी याचे प्रशासन अतिशय क्रूर होते.

काही राज्यांनी इंग्रजांच्या मदतीचा स्वीकार केला होता. त्या बदल्यात त्यांच्या वर अशी एक अट लादली गेली होती , कि जो राजा पुत्रा शिवाय मरेल त्याचे राज्य खालसा होऊन इंग्रज साम्राज्यात विलीन होईल. एवढेच नव्हेतर राज्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाला सुद्धा राज्य करण्याचा अधिकार राहाणार नाही. १८५३ साली महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांनी एका मुलाला दत्तक घ्यायचे ठरविले.

धार्मिक विधी नुसार दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव दामोदरराव ठेवण्यात आले. काहीच दिवसांनतर २१ नोहेंबर १८५३ साली गंगाधररावांचे निधन झाले. अगदीच अनुभव नसलेली राणी लक्ष्मीबाई १८ व्या वर्षीच विधवा झाली. एकीकडे लॉर्ड डलहौसी हा राज्य बळकावण्याच्या तयारीत तर दुसरी कडे लहान दामोदर ! लक्ष्मीबाई अश्या कठीण अवस्थेत पडल्या होत्या. त्यांच्या दुखा:ला व संकटांना तोड नव्हती.

ब्रिटीशांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना अनाथ आणि असहाय्य समजले आणि त्यांच्या दत्तक मुलाला बेकायदेशीर घोषित केले व लक्ष्मीबाईंना झाशी सोडून जाण्यास सांगितले. परंतु तेजस्विनीचा अवतार धारण केलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी स्पष्ट शब्दात उत्तर पाठविले “ये झांशी मेरी है और मैं अपनी झांसी नहीं दूंगी’ । आणि १८५७ च्या स्वतंत्र सम्रात त्यांनी उडी घेतली. या स्वातंत्र युद्धाची ती खरी स्फूर्तीदेवताच ठरली.

तेव्हापासून राणीने आपले संपूर्ण जीवन झांशी वाचविण्यासाठी संघर्ष आणि युद्धांत व्यतीत केले.
त्यांनी गुप्तपणे ब्रिटीशांविरूद्ध आपली सत्ता जमा करण्यास सुरवात केली. आणि बघता बघता ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी काल्पी आणि ग्वाल्हेर दोन्ही ठिकाणी विजय मिळविला.

राणी जेव्हा घोड्यावर स्वार होऊन बाहेर पडायच्या तेव्हा त्या पुरुश्याचा वेश परिधान करीत असे. त्या धातूचा टोप घालून त्यावर फेटा बांधायच्या. स्वतःच्या संरक्षणासाठी छातीवर धातूची पट्टी बांधलेली असायची. पायजामा घालून वर एक शेला बांधायच्या. दोन्हीकडे पिस्तुल व तलवार लटकत असायची. ह्या शिवाय त्या आपल्या बरोबर कृपानहि बाळगीत असे.

काही दिवसातच राणीने झाशी आपल्या ताब्यात घेतली. हि गोष्ट ब्रिटिशाना कळताच ब्रिटिश सेनानी सर ह्यु रोज झाशीवर चालून गेला. राणीने सतत अहोरात्र किल्ला लढविला.,पण फितुरीने दगा दिला.

त्यांमुळे पुत्र दामोधर याला पाठीशी बांधून व मोचक्या सैन्यासह शत्रू सैन्याचा वेढा भेदून राणीने नानासाहेब व तात्या टोपे ज्या किल्ल्यात राहत होते त्या काल्पी किल्ल्याच्या दिशेने घोडा लढविला. पण ह्यु रोजच्या सैन्याने तिथेही पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केल्याने नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्यासह राणी ग्वाल्हेरला गेली.

परंतु तेथेही ह्यु रोज व त्याचे सैन्य चालून गेले. अतितटी चा संग्राम पुन्हा सुरु झाला. दामोदरांनी पाठीशी बांधून राणीने पराक्रमाची शर्थ केली,पण नाईलाज झाला. ब्रिटिशांच्या घावाने त्यांचे १८ जून १८५८ रोजी वीरगती प्राप्त झाली . त्यांच्या या बलिदानाला आमचा शतशः अभिवादन

त्यांच्या पराक्रमासाठी म्हणून ह्या ओळी

“बुंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहा थी।
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।”
वह तो झाँसी वाली रानी थी।

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “Information About Rani Lakshmibai In Marathi | झाशीची राणी लक्ष्मीबाई”

Leave a Comment