गमतीदार मराठी उखाणे । Funny Marathi Ukhane | Vinodi Marathi Ukhane⇒ डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
..... रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया


⇒ द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
.... चे नाव घेते राखते तुमचा मान


⇒ धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा


⇒ Acer फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन
..... इज माइन


⇒ गोव्याहून आणले काजू
गनपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु


⇒ कपात कप बशीत बशी
.... माझी सोडुन बाकी सर्व म्हशी


⇒ जीवन आहे एक अनमोल ठेवा,
..... राव आणतात नेहमी सुकामेवा.


⇒ अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ


⇒ नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,
..... चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका


⇒ इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
..... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!


⇒ केळीचे पान टर टर फाटत .....
..... रावाच नाव घेताना कस कस वाटत


⇒ काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत
..... राव गेले ऑफिसला मला नाही करमत


⇒ एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास


⇒ नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी
..... चे नाव घेतो ..... च्या घरी


⇒ भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा


⇒ नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
..... आहे माझे जीवन सर्वस्व


⇒ ..... रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा ..... होऊ दे तोटा


⇒ Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले
..... राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले


⇒ आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती
..... रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती


⇒ आज आहे शनिवार उद्या येईल रविवार
..... रावांशी करते संसार, घडवू सुखाचा परिवार


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi


1 2 3 4 »

You May Also Like

Add a Comment