गमतीदार मराठी उखाणे । Funny Marathi Ukhane | Vinodi Marathi Ukhane⇒ खोक्यात खोका टिवी चा खोका,
..... माझी मांजर आणि मी तिचा बोका


⇒ कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... राव माझे आहेत फार निस्वार्थी


⇒ गोड करंजी सपक शेवाई ......
होते समजूतदार म्हणून ...... करून घेतले जावई


⇒बागेत बाग राणीचा बाग...
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!


⇒ चांदीच्या ताटात फणसाचे गरे
..... राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे⇒ आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची....... म्हणजे जगदंबा


⇒ अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका


⇒ सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?


⇒ नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा ..... रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi


⇒ महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड् .....
रावांना डोळे मारण्याची लई खोड्


⇒ नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर


⇒ निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
..... रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास


⇒ जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा


⇒ मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
..... हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर


⇒ हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी .....
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी


⇒ पाव शेर रवा पाव शेर खवा
..... चे नाव घेते हजार रुपये ठेवा.


⇒ चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ


⇒ ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
..... ला पाहून माझ डोक दुखत.


⇒ नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून.....
अन बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!


⇒ नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
...... राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात


⇒ मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
..... च नाव घ्यायला मला नाही आळस्.


⇒ ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड
..... रावांना भरवते Icecream चा घास सांगा आहे कि नाही थंड?


« 1 2 3 4

You May Also Like

Add a Comment