मैत्री | Friend status in Marathi | Friendship Quotes in Marathi | Friendship Status in MarathiBest Friends Friendship Status in Marathi - नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आम्ही खास Best Friends, Friends Forever आणि Friend Ship status चा Marathi collection बनवलेला आहे. आम्ही या आधी सुद्धा Maitri Status टाकले होते, आणि ते सर्वांना आवडले होते, मला आशा आहे तुम्हाला हा friend status in marathi चा collection सुद्धा आवडेल. तुम्ही हे Friendship Messages in Marathi चे status कॉपी करून Whatsapp, Facebook आणि दुसऱ्या कोणत्याही सोशल मीडिया साईट वर अपलोड करू शकता, आणि तुम्हाला जर का हा आमचा Friendship Marathi Status Collection आवडला असेल तर आमची हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेयर करा.

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!

या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही.....

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे,
तर शत्रूचाही आदर गमावतो.

मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो-जन्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी....

श्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीही जवळ नसताना तुझि साथ असते मैञी....

रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!

बंधनापलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा....

दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.....

बोलता बोलता काही जण रुसुन जातात...
चालता चालता हातातले हात सुटून जातात...
म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते...
इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात........

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे.
नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा.

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे....

“कुठलेही हिशोब न ठेवता
जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री."

“मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात.
पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात.
तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत”

जुन्या मित्रांशी बोलताना जाणवतं की,
आपलं आयुष्य किती बदललं आहे.

निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून आपण स्वताला पाहू शकलो,
तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.

शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र. ॥

रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे,
तर शत्रूचाही आदर गमावतो.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून मला आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन ......

शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे
त्यांना आपले मित्र बनविणे होय.

शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,
अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही.

सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो ….
पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र

हल्ला करणार्‍या शत्रूला भीऊ नकोस.
पण स्तुती करणार्‍या मित्रापासून सावध रहा.

मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों क्षणी आठवेल अशी करा!!!!


Search For: maitri, maitri suvichar, maitri whatsapp status, maitri quotes in marathi, yari dosti, dosti quotes, happy friendship day in marathi, happy friendship day quotes in marathi, friendship day whatsapp status, friendship day whatsapp status video download, Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3

You May Also Like