शुभ सकाळ || मराठी सुविचार । Good morning messages in Marathi | Good Morning Marathi Suvichar


हसता हसता सामोरे जा "आयुष्याला".....
तरच घडवू शकाल "भविष्याला".....
कधी निघून जाईल, "आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण" परत मिळणार नाही..!!!
"शुभ सकाळ"

कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका....!!!
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत...!!!
मी विसरलो नाही कुणाला....!!!
माझे छान मित्र आहेत जगात...!!!
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
सुखाच्या शोधात...!!!
❤|| शुभ सकाळ ||❤

☝ एक आस, एक विसावा...
तुमचा मेसेज रोज दिसावा...
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा...☝
हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात,
तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..
!!! शुभ सकाळ !!!

हो” आणि “नाही” हे दोन*
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो…
आपण जीवनात
बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!
शुभ सकाळ

लिहताना जपावे ते अक्षर मतातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दुख जिवनातले.
Good Morning

"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहु नका.
"मान-सन्मान त्यांचाच करा......,
जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील.......!
​₲๑๑d ℳ๑®ทïทg​
​Have A Great Day​

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो
*शुभ प्रभात*

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात...
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...
Good Morning

"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला...
|| *शुभ सकाळ* ||

।।सुंदर विचारधारा ॥
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं
आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं
आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर
आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!
                शुभ सकाळ

काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं...
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही...!
        सुप्रभात

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ प्रभात.

जो तुमच्या आनंदासाठी, हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच, जिंकू शकत नाही...!
।। Good morning ।।

✍ डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...✍
*GOOD MORNING*

"माणुस स्वत:च्या चुकांसाठी उत्तम वकील असतो,
परंतु...दुसर्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश च बनतो...
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"
शुभ सकाळ

*मजेशीर कविता*
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर...!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला...!!! *या चहा प्यायला.*
*शुभ ससकाळ *.

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...
|| शुभ रात्री ||

"यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी
कल्पना मिळतात"
|| शुभ सकाळ ||

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या
व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
"नेटसम्राटांना"
शुभ सकाळ

डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो
पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....
कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे
आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....
*शुभ सकाळ *

​ स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ

✍ काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस
खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात...!!!
शुभ सकाळ

माणसाच्या मुखात गोडवा...मनात प्रेम...
वागण्यात नम्रता... आणि
हृदयात गरीबीची जाण असली की...
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!
☘ शुभ सकाळ ☘

आकाशापेक्षाही विशाल, सागरापेक्षाही खोल,
चंदनापेक्षाही शितल, गुलाबापेक्षाही कोमल,
क्षितिजाच्याही दूरवर, स्वप्नाहूनही सुंदर,
प्रेमापेक्षाही प्रेमळ, जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं,
तसं नातं आपल्या सगळ्यांच असावं
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

"मनात" घर करून गेलेली व्य़क्ती कधीच विसरता येत नाही......!!!
"घर" छोटं असले तरी चालेल
पण "मन" माञ मोठ असल पाहिजे.......!!
☘ Good morning ☘

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसत..
☆ शुभ प्रभात ☆

•• सुप्रभात ••
टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.
शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.
जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!

मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा आवडीनं जवळ येत
आपण तर माणूस आहोत, त्यामुळं आयुष्य हे एकदाच आहे,
"मी" पणा नको, तर सर्वांशी प्रेमाने रहा...
शुभ प्रभात

जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी. तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी.... || शुभ सकाळ ||

एक पेन चुक करू शकतो. .., पण.,
एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,
कारण तीचा पार्टनर (खोडरबर) तीच्या सोबत असतो. ..
तो तिच्या सर्व चुका सुधारतो...
म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.
जो आपल्या चुका सुधारेल..
...... शुभ सकाळ

अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही,
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही,
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही,
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
*आपला दिवस आनंदात जावो.*

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही.
जरी पाने उलटले कि जुने काही आठवत नाही.
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये
शुभ सकाळ


Search For: good morning in marathi, good morning marathi sms, good morning msg in marathi, gm msg in marathi, good morning status marathi, good morning shayari marathi, good morning image in marathi, good morning in marathi sms, Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment