आयुष्य || मराठी सुविचार । Life quotes in Marathi | Marathi Suvicharआयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात.

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात
तर ते दुर पळतात.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून,
अनुभवातुन शिकण्यात आहे.

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

जखम आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले

जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

माणसाला "बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...
पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात...
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते .....
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते......?

आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे
तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.

आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो
यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत.
ते मिळवावे लागतात.


In this Life quotes in Marathi article we have shared whatsapp status on life in marathi, whatsapp status quotes on life in marathi status on life in marathi, status on life in marathi, marathi msg for life, happy life status in marathi, Marathi Suvichar, marathi thoughts, Good Thoughts in marathi, marathi quotes, marathi suvichar sms etc.

1 2

You May Also Like

Add a Comment