marathivarsa.com
प्रेम || मराठी सुविचार । Love quotes in Marathi | Marathi Suvichar


हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी...पण हळुहळू तुझ्या हृदयाची
काळजी करू लागलोय मी...

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी

या जगात प्रेम तर सर्वच करतात...
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही

तुझ माझ अस न राहता
'आपल' म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.

"....ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो,
नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो."

"अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो,
आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो "

"जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही“"

"प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते.
जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त.
आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो.
म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं."


"हवेत ऑक्सिजन असतोच पण ..
माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो ....
आपल्या सर्वांचं अगदी तसचं आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच
पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते."

'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी
'म' म्हणजे मन माझ.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात ...
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

आपलं सुंदर दिसण हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं..
मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं..

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

आयुष्य अशा व्यक्तीसोबत व्यतीत करा ज्यांना
दुसर काही नको फक्त तुमची साथ हवीये

आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा..!

​ आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे....
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा......

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात....
याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात...
ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!

उगाचच्या रुसव्यांना तू मला मनवण्याला, प्रेम म्हणायचं असत.
एकमेकांना आठवायला आणि आठवणी जपण्याला, प्रेम म्हणायचं असत.

ए अश्रू, तू थांब रे, इतके दिवस आलास ना..
माझा म्हणता म्हणता, तू ही त्याचाच झालास ना...

ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा ..
आज त्याला सांगायची आहे...

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

एकांत क्षणी...कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.

कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात

कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा, पाऊस अलगद मनात दाटतो

काही व्यक्ती .. सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात ...
त्या तुमच्या जवळ असोत किंवा नसोत
त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो.

किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,
अनमोल हाच धागा बघ, कितीही ताणला तरी तुटत नाही..


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment