प्रेम | Love quotes in Marathi | Love Marathi Status | Love Marathi Shayari | Love Whatsapp Status


कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना?
मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना?

कितीही रागावल तरी एकमेकांना सावरायला प्रेम म्हणायचं असत.
शब्दातून बरसायला स्पर्शाने धुंद होण्याला प्रेम म्हणायचं असत.

कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार..
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार..
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे..
एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं..

कुणीतरी लागतं आपल्याला खादाड म्हणणारं ...
खादाड म्हणताना आपल्या आवडीनिवडी जपणारं ...

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते,
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते,
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे,
भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे.

गारवा वार्‍यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा..
प्रिये नभांत ही चांदवा नवा नवा...

घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही,
जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधली जाते तेच खरे घर होय.

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

जखमांची भरपाई न्यायाने करा: निष्ठुरतेची भरपाई प्रेमाने करा.

जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव,
आणि त्यामध्ये आपली 'कोंबड्यांची पोल्ट्री असावी..

ह्रदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

हे नेहमीच शक्य नाही ज्या प्रत्येकाने तुमच्यासोबत सुरुवात केली आहे
तो शेवटही तुमच्या बरोबर करेल.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली
की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...
आणि ती असते "आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती".

स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा
अधिक मोलाचा असतो.

सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात.
म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

समुद्राचा शांत किनारा, शांत सुंदर नदी काठ,
आशा ठिकाणी सतत पडावी, तुझी नि माझी गाठ.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल
म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका .

वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

लोक प्रेमात स्वत:चा विचार जास्त करतात
आणि समोरच्या बद्दल कमी करतात.....
याच स्वार्थीपणामुळे प्रेमाला
आज किमंत फक्त टाईमपासापुरती केली जाते.......

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठी तरी
आहे ही भावनाच किती श्रेष्ठ आहे!

मी बोलले न काही नुसतेच पाहिले,
हृदयात दाटलेले हृदयात राहिले.

मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं.

मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.
युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला
फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर
ती सेवा नसते, तो व्यापार असतो.

प्रेमात पडलेल्या व्यक्ती म्हणजे जणू काही कोशामध्ये असलेलं ‪‎सुरवंट‬
त्याला अवती-भोवती काय चाललयं याची जणिव नसते
ते एकटचं आपल्या विश्वास रममाण असतं,
प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या रंगात रंगत असतं.


Search For : Marathi Suvichar, love quotes in marathi, love quotes in marathi for bf, whatsapp love status in marathi, status for love in marathi, marathi love whatsapp status, whatsapp status in marathi love, Love Marathi Shayari, प्रेम मराठी स्टेटस, मराठी स्टेटस प्रेमाचे, marathi love status for whatsapp marathi love status video

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment