marathivarsa.com
प्रेम || मराठी सुविचार । Love quotes in Marathi | Marathi Suvichar


प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते
तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

प्रेम हे जिवनासाठी आहे,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत नाही,
प्रेमात जिवन वाया घालवू नका,
पण जिवनात प्रेम करायला विसरु नका.

प्रेम हे गोड स्वप्नासारखं असते
लग्न हे अलार्म सारखं असते
त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड
स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही

प्रेम हा जुगार आहे.
माणसाचा जीव घेणारा जुगार आहे.

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे
भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे

प्रेम या अडिच अक्षरात
ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं
दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं
नाजुक बंधन जपलेले असते.

प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून
आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणं हेच प्रेम.

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !!!!

प्रेम म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे,
एखाद्या दुबळ्या माणसाला बळ देत अतेत
आणि एखाद्या सामर्थ्यवान माणसाला दुबळ बनवत असते.


प्रेम मिळत तेव्हा वाटत मोफत आहे,
पण त्याची किंमत कधी न कधी मोजावीच लागते.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.

प्रेम आहे, जेथे जीवन आहे.

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

प्रीती म्हणजे केवळ क्षणिक वासनेची तृप्ती नव्हे!
माणसाला स्वत:पलीकडे पाहायला लावणारी उदात्त भावना आहे ती!

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

पोरगी म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते
अमाप सुख देवून जाते ...पण धरून ठेवता येत नाही

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

धैर्य हे प्रेमासारखे आहे,
नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...

​ थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत. भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

तुम्हाला वेदना होईपर्यंत जर तुम्ही दुस-यांवर प्रेम करत राहिलात,
तर प्रेम वाढायलाच मदत होईल वेदना होणारच नाहीत.

तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचे आहे,
तुझ्या प्रत्येक सुख दुखात तुझेच बनून राहायचे आहे......
तुझ्याच नावाचे कुंकू भाळी लावायचे आहे,
या जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म तुझेच व्हायचे आहे.......

तुझ्या एकाच हसण्याने आपल्यातलं सगळं अंतर पार केलंय.
मधल्या सगळ्या भिंती पाडून तिथे मी नवीन दार केलंय.

तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होतो !!

डोळ्यांना फसवण अवघड आहे पण मनाला फसवण कठीण आहे.

झरे आणि डोळे यांना माहित असते फक्त वाहणे
फरक एवढाच की झरे वाहतात
तळ्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं,
त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

जेव्हा मुलीच्या फोनमध्ये BALANCE असतो
तेव्हा तिचा कोणीतरी BOYFRIEND असतो.
जेव्हा मुलाच्या फोनमध्ये BALANCE असतो
तेव्हा त्याची कोणीच GIRLFRIEND नसते.

जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम.
जो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती मैत्री,
आणी निरंतर राहते ती मैत्री आणी फक्त मैत्री.

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते
पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,
जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,
जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.

जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना?

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!

जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते
तसे मनाने मनाला जिंकता येते.


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment