marathivarsa.com
प्रेरणादायी || मराठी सुविचार । Motivational quotes in Marathi | Marathi Suvichar


एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही,
पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा.

आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

इच्छा दांडगी असली की
मदद आपणहून तुमच्याकडे चालत येते.

इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,
तो म्हणजे रात्र.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजुन तयार व्हायचा आहे !

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,
आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार?

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य!

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!

सुंदर दिवसाची सुंदर सुरवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ....

"स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो
जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो..
कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात..
पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं.."

कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल
असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो.

अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते.
फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात.

कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.

​ कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

गरूडाइतके उडता येत नाही,
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे
त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही.
एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि,
त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
पहिली: जे आवडते ते मिळवायला शिका.
दुसरी: जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.

परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा
लढण्याची जिद्द अंगी बाळगा..

चांगले काम करायचे मनात आले
की ते लगेच करून टाका.

हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!!

खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची.

गुणांचं कौतुक उशीरा होते.....पण होते!

गौरव हा पडण्यात नाही.....पडून उठण्यात आहे.

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता
पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

जग बदलायचे असेल
तर आधी स्वतःला बदला.

जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही
अधिक श्रेष्ठ असतात.


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment