marathivarsa.com
प्रेरणादायी || मराठी सुविचार । Motivational quotes in Marathi | Marathi Suvichar


विसरणे हा मानवाचा धर्म आहे,
पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.

वचन देताना विलंब करा,
पण पाळताना घाई करा.

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

मोठेपणाची इच्छा असेल तर
मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करु नका.

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली
की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली,
यावरुन मोजता येते.

माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.


बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा उपयोग करणे
हे प्रगतीचे मूळ होय.

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.

भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा
आणि तिचा नायनाट करा.

भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले.

मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.

माणसे जन्मतात आणि मरतात,
पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वीच
तिची किंमत कळायला हवी.

​ प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले,
तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.

नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला
किंमत देण्यातून जन्माला येतो.

शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे,
शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे.

ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .

दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही,
म्हणून दुर्बल राहू नका.

थोर काय अगर सामान्य काय!
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.

तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार!

टीका आणि विरोध हीच तर समाजसुधारकास
मिळालेली बक्षिसे असतात.

ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,
त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.

ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही,
त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment