प्रेरणादायी || Motivational quotes in Marathi | Motivation in Marathi


यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

रस्ता नाही असे कधीही होत नाही,
रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं!
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,
आहे तो परिणाम स्विकारा.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही.

सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

अनुभव हा महान शिक्षक आहे,
पण तो मोबदला मात्र फार घेतो.

अन्यायापुढे मान झुकवू नका.
स्वाभिमानाने लढा.
प्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा.
उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका.
जातीपाती सोडून द्या.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू, आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!

आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

​ उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो,
त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.

उषःकाल कितीही चांगला असला तरी
सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा
घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल
आणि प्राणाशिवाय शरीर !

कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य
व संयमाची गरज लागते.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की,
आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते,
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

गरिबांच्या जीवनांशी एकरुप झाल्याशिवाय,
समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.

जसा गेलेला बाण परत येत नाही,
तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.


Search For: In this Motivation quotes in Marathi article you will find all types of motivational quotes in marathi. you can copy and use this inspiration marathi status for your whatsapp status. Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, motivation thoughts in marathi,motivational story in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi motivation status, marathi motivation status, motivational speech in marathi, marathi motivation thought, motivation marathi thought, marathi motivational video.

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment