आई-वडील || मराठी सुविचार । Mom And Dad quotes in Marathi | Aai Baba Suvicharमनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

स्वतः डब्बा मोबाईल वापरून मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
-----तो एक बाप असतो.....

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती "आई"...
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते "बाबा"..

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.

देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो
पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

जगात असे एकच न्यायालय आहे
की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात 'आई' नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...!

झाडासारखे जगा... खूप उंच व्हा...
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ति दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करते ति पत्नी,
आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त आई.....

प्रेमास्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई!
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी?

या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे
व ते प्रत्येक आई जवळ असते!

बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,
'' आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल....
हे ऐकून मुलगा रडायला लागला....आणि त्याने विचारलं,
तिथे माझी काळजी कोण घेणार???
देव म्हणाला, मी एक परी पाठवली आहे...ती तुझी खूप छान काळजी घेईल..
बाळाने पुन्हा विचारलं, मला बोलायला कोण शिकवणार???
देव म्हणाल, तीच परी तुला बोलायला शिकवेल...
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला,
मी तुझी प्रार्थना कशी करणार??
देव म्हणाला, परी तुला शिकवेल..
बाळाने विचारलं, मी त्या परी ला ओळखणार कसं??
देव म्हणाला , ओळखायला वेळ नाही लागणार....
पृथ्वीवर लोक तिला 'आई' म्हणतात....'

प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात काहीच अर्थ नाही...
.
.
.
कारण, तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार मिळेल....
.
.
.
पण तुमच्या आई-बाबा ला तुमच्यासारखा मुलगा
मुलगी कधीच नाही मिळणार..!!!

प्रेम कुणावर करावं...? ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर,
कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर?
सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या 'गुलाबावर' कि त्याला जपणा-या... काट्यांवर. ......?
काल facebook वर भेटलेल्या' मुलीवर....
कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या 'आई-वडिलां वर'

देवाने एका 'आई' ला प्रश्न विचारला...
.
.
' तुमच्या आयुष्यातून सर्वसुख: काढून घेतले...
आणि विचारलं दुसरं काही मागा....तर तुम्ही काय मागणार..??
.
.
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
.
.
माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार...

कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत..."

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोडा वेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर,
"आई ग...!" हा शब्द बाहेर पडतो...
.
पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन
ब्रेक दाबतो तेव्हा "बाप रे!" हाच शब्द बाहेर पडतो.
.
छोट्या संकटासाठी आई चालते
पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो....

खरे प्रेम आंधळे का असते?
.
.
.
.
.
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात केलेली असते..

आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही.
कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.

आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी,
आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली, आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून, आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून, आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी.. आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी.. आईचं आपले, अस्तित्व घडवणारी.

आई बाबा वरती माया अपार असायला पाहिजे
सागरासारखं प्रेम अभ्याग असायला पाहिजे
श्रावण बाळाने केली जशी सेवा
तशी आपण पण करायला पाहिजे

आई तू उन्हा मधली सावली… आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल… आता यावीत दु:खे खुशाल!!
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!
आई म्हणजे वेदने नंतरची सर्वात पहिली आरोळी

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात पण ते अनुभवायला आज वेळ नाही
..आईच्या अंगाईची जाणीव आहे पण आईला आज आई म्हणायलाच वेळ नाही..
सगळी नातीसंपवून झाली पण त्या नात्याँना विचारायलाही आज वेळ नाही..
सगळयांची नावं मोबाईल मध्ये सेव आहेत पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही


Search For: aai baba stutas, आईवडील, marathi quotes on mom dad, aai baba quotes in marathi language, आई वडील शायरी, aai ani baba quote, aai baba anniversary quotes in marathi, sai baba answers, aai baba whatsapp status in marathi, mom dad status, mom dad anniversary status, mummy papa status, mother day status in marathi, father day status in marathi, आई व वडील कविता, आई वडील images Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2

You May Also Like

Add a Comment