marathivarsa.com
यश || मराठी सुविचार । Success quotes in Marathi | Marathi Suvichar


तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते
ती म्हणजे 'अपयश येण्याची भीती'

भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात.
म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते.
नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात.

दृष्टी जी डोळ्यामुळे मिळते आणि दृष्टीकोन जो बुद्धीमुळे

कधीच म्हणु नका तुम्हाला शक्य नाही
हि एका पराभूताची मानसिकता आहे.

भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा किंवा भुतकाळात कुढत राहा.

यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे
जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे.

चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची.

तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा
एक नवीन जग तुमच्या समोर असेल.

उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि
आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो.


जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा,
वेगळा विचार करा.

कधी तुम्ही जिंकत असता
कधी तुम्ही शिकत असता.


प्रत्येक संकटात संधी दडलेली असते.

आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या
भीतीला समोर जावच लागते.

यश मिळवण्याच्या पुस्तकात
अपयश हा महत्वाचा धडा आहे.

मला गजराच्या घड्याळाची गरज नाही
माझी ध्येय मला उठवण्यास समर्थ आहेत.

प्रत्येकाकडे स्वप्न असतात
पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते.

निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे.

"यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं".

"आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं कि
समजावं, आपला उत्कर्ष होतोय"

तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात..
मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

​ आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा.

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे.

ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल....

एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती
आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश....

हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते .

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकुन कंटाळा आल्याने गंमत म्हणुन हारलो आहे.

संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहिण्यासाठीच येतात.

ध्येय ठरल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या

फार सोपं वाक्य आहे.
आपल्या मनाशी सारखं बोलत राहा
तुम्ही कोणतेही ध्येय गाठु शकता

साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात,
आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात.

आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसुन,
तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.

जेव्हा यश मिळवण श्वास घेण्या इतकच गरजेचं होईल,
तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

प्रत्येकाकडे स्वप्न असतात
पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते.


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3

You May Also Like

Add a Comment