राष्ट्रीय विज्ञान दिवस | 28th February National Science Day Information in Marathi

28th February National Science Day Information in Marathi

28th February National Science Day Information in Marathi: राष्ट्रीय विज्ञान दिवस १९२८ मध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चन्द्रशेखर वेंकट रमन यांनी कोलकत्ता येथे केलेल्या वैज्ञानिक अविष्कार म्हणजेच “रमन प्रभाव” यांचा स्मृती दिवस म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर “राष्ट्रीय विज्ञान दिवस” मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर रमण यांचा हा शोध २८ फेब्रुवारी १९३० रोजी प्रकाशित झाला. ह्या कारणाने २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मानला जाते. या कामासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान व वैज्ञानिक उपक्रमांबद्दल आकर्षित व सतर्क करण्याचा आहे.

विज्ञान दिनाचा इतिहास: भारतामध्ये २८ फेब्रुवारी १९२८ हा एक महान दिवस होता, ह्या दिवशी प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ वेंकट रमन द्वारा भारतीय विज्ञान क्षेत्रामध्ये एक आविष्कार पूर्ण झाला. ते एक तमिल ब्राह्मण होते आणि ते विज्ञान क्षेत्राचे पहिले अशी व्यक्ती आहेत ज्यांनी विज्ञानात अश्या आविष्काराचा शोध केला. भविष्यात हा कार्यक्रम नेहमी आठवणीत राहण्यासाठी आणि सन्मानासाठी सन १९८६ मध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी राष्ट्रीय परिषदेद्वारे भारतात २८ फेब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून नामांकन करण्यात आले. हा दिवस दरवर्षी विद्यार्थी, संशोधन शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, भारत सरकारच्या तांत्रिक आणि संशोधन संस्था, वैद्यकीय, वैज्ञानिक सह सर्व शिक्षण संस्था मध्ये साजरा करतात.

भारतातील पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील भारतीय असोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ साइन्स येथे १९०७ ते १९०३३ पर्यंत सर चन्द्रशेखर वेंकट रमन यांनी काम केले आणि त्या काळात त्यांनी भौतिक विषयात अनेक संशोधन केले त्यातीलच एक शोध म्हणजे “रमन प्रभाव” (‘रमण प्रभाव’ असे सांगतो कि प्रकाश जेव्हा एखाद्या केंद्रातून निघतो, तेव्हा या प्रकाशाचा काही भाग वेगळ्या दिशेला पसार होतो. आणि हि दिशा व मुख्य प्रकाश पसार होणारी दिशा या दोन्ही भिन्न दिशा असतात.) याचे यश आणि हा शोध भारतीय इतिहासात प्रसिद्ध झाला. आपल्या ह्या मोठ्या आविष्कारासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्कार सोबत बाकी अनेक भारतीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. सन 2०१३ मध्ये, अमेरिकन केमिकल समाजाद्वारा अंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लैण्डमार्क यांनी “रमान प्रभाव” असे नाव ठेवले गेले. हळू हळू राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी शाळा व कॉलेज मधील विद्यार्थी, राज्य आणि राष्ट्रीय विभागातील वैज्ञानिक वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेऊन हा दिवस साजरा करू लागले. यामुळे वैद्यानिकाना आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एक योग्य मंच मिळाला.

राष्ट्रीय विज्ञान दिन कसा साजरा करतात? | Why National Science Day is Celebrated in Marathi

प्रत्येक वर्षी भारतीय विज्ञान शाखेत विज्ञान दिनाच्या दिवशी, शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी विविध विज्ञान प्रयोग सादर करतात. त्याच बरोबर संशोधन केंद्रात संशोधक आपले नवनवीन शोध प्रदर्शित करतात. या कार्यक्रमात सार्वजनिक भाषण, रेडिओ-टीव्ही टॉक शो, विज्ञान-चित्रपट प्रदर्शने, नवीन विषय आणि संकल्पना यांच्यावर आधारित विज्ञान प्रदर्शने, आकाशदर्शन, सजीव प्रकल्प तसेच शोध प्रदर्शन, चर्चा, प्रश्न-उत्तर स्पर्धा, भाषण, विज्ञान मॉडेल प्रदर्शने इत्यादी कार्यक्रम होतात. खोडद मध्ये जायंट मीटरवेव रेडियो टेलिस्कोप (जी.एम.आर.टी) मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरी केली जाते, जी टीआयएफआर (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) ने स्थापित केली आहे आणि हे राष्ट्रीय सेंटर फॉर रेडियो एस्ट्रोफिजीक्स द्वारा लो रेडियो फ्रीक्वेंसीज वर चालते, जे संपूर्ण जगभर एक प्रसिद्ध टेलिस्कोप मानले जाते. रेडिओ खगोल विद्या आणि खगोल भौतिकी क्षेत्रातील आपले मुख्य शोध व क्रिया-प्रकल्पांना ओळख देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात एनसीआरए आणि जीएमआरटी द्वारा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. देश-विदेशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सर्वसामान्य जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजिले जातात.विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री या दिवशी आपले व्याख्यानाद्वारे विद्यार्थी, वैज्ञानिक, संशोधक आणि सामान्य नागरिकांना एक संदेश देतात.

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे महत्व | Importance of National Science Day in Marathi

१) लोकांच्या दैनिक जीवनात विज्ञानाचे महत्व कळण्यासाठी दर वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.

2) मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात असलेल्या सर्व क्रियाप्रकल्प, प्रयत्न आणि विविध उपलब्धी प्रदर्शित करण्यासाठी.

३) विज्ञान विकासासाठी सर्व मुद्दे चर्चा आणि नवीन तंत्रज्ञान लागू व्हावे यासाठी साजरा करावा राष्ट्रीय विज्ञान दिन.

४) देशातील नागरिकांमधील विज्ञानिक ज्ञानाला संधी मिळावी यासाठी विज्ञान दिन साजरा करावा.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे सालाप्रमाणे विषय:

वर्ष १९९९ विषय : “आपली बदलती पृथ्वी”.

वर्ष २००० विषय : “मूलभूत विज्ञानामध्ये स्वारस्य निर्माण करणे ”.

वर्ष २००१ विषय : “विज्ञान शिक्षणासाठी माहिती तंत्रज्ञान”.

वर्ष २००२ विषय : “टाकाऊ पासून टिकाऊ ”.

वर्ष २००३ विषय : “जीवनाची रुपरेखा- ५० वर्ष डीएनए चे आणि २५ वर्ष आईवीएफ चे ”.

वर्ष २००४ विषय : “समाजातील वैज्ञानिक जागरुकता वाढविणे”.

वर्ष २००५ विषय : “भौतिकशास्त्र साजरा करणे”.

वर्ष २००६ विषय : “आमच्या भविष्यासाठी निसार्गचे पालनपोषण”.

वर्ष २००७ विषय : “एक दव पण अनेक पिक ”

वर्ष २००८ विषय : “पृथ्वी ग्रह समजून घेणे”

वर्ष २००९ विषय : “विज्ञानाचे जास्तीतजास्त विस्तार”

वर्ष २०१० विषय : “लैंगिक समानता, विज्ञान आणि निरंतर विकासासाठी तंत्रज्ञान”

वर्ष २०११ विषय : “दैनिक जीवनात रसायनशास्त्र”

वर्ष २०१२ विषय : “स्वच्छ उर्जा पर्याय आणि अणू सुरक्षा”

वर्ष २०१३ विषय : “आनुवंशिकरित्या सुधारित पीक आणि अन्न सुरक्षा”

वर्ष २०१४ विषय : “वैज्ञानिक शांतता वाढविणे”

वर्ष २०१५ विषय : “राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान”

वर्ष २०१६ विषय : “राष्ट्र विकासाकरिता वैज्ञानिक मुद्दे”

वर्ष २०१७ विषय : “विशेषत: अपंग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान”

वर्ष २०१८ ला असणारा विषय : “विज्ञान आणि तंत्रज्ञान भविष्यासाठी असणारे एक शाश्वत”

वर्ष 2019 – “जनतेसाठी विज्ञान.”

वर्ष 2020 – “विज्ञानातील महिला.”

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
हे देखील वाचा
Information About Science in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “राष्ट्रीय विज्ञान दिवस | 28th February National Science Day Information in Marathi”

Leave a Comment