Information about Google in Marathi | Google बद्दल मनोरंजक तथ्य

मित्रांनो आजच्या या Information about Google in Marathi लेखामध्ये मी तुम्हाला google या कंपनी बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहे.

1. Google ही कंपनी प्रत्येक सेकंदाला सुमारे रु 1,30,900 कमावते.

2. आपणास काही शोधायचे असेल तर इंटरनेट वर न शोधता Google वर शोधा असे म्हणतात. या गोष्टीचा अर्थ असा आहे की आज गुगल इंटरनेटचा पर्याय बनत आहे. ह्या कंपनीची स्थापना १९९५ मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन या दोघांनी मिळून केली होती, ते सर्वप्रथम 1995 मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठात भेटले होते.

Google founder Larry Page and Sergey Brin
Google founder Larry Page and Sergey Brin

3. ‘Google’ प्रत्यक्षात Googol ची चुकीची Spelling आहे. Googol एक फार मोठी संख्या आहे , ज्यात १ पासून १०० पर्यंत सर्व संख्या येतात. Googol नाव आधीच वापरले गेले होते. त्यामुळे Google नावाची नोंद करण्यात आली.

4. 2010 पासून Google कंपनी प्रति आठवडा, सरासरी एक कंपनी खरेदी करत आहे.

5. 1998 मध्ये , Google डूडल प्रथमच दर्शकांना मुखपृष्ठावर दिसले. हे डूडल नेवाडा मधील बर्न सणात भाग घेतलेल्या लोकांविषयी होते. Google वर डूडल साठी एक खूप मोठा संघ काम करतो ज्याने आता पर्यंत एक हजाराहून अधिक डूडल पोस्ट केले आहेत. डूडल एक विशिष्ट प्रकारचा लोगो असतो जो Google वर कोणत्याही एक विशिष्ट दिवस किंवा एका मोठ्या व्यक्तीच्या जयंती निमित्त गूगलच्या मुखपृष्ठावर दिसते. जेंव्हा दिवाळी चा सण असतो तेंव्हा फटाके फोडण्याचा डूडल दर्शविला जातो.

6. 2004 मध्ये एक एप्रिल च्या दिवशी Google ने Gmail सुरू केले. अधिक स्टोरेज, जलद मेल पाठवण्याची क्षमता ह्यात पुरवण्यात येणार होती. सुरुवातीला Gmail खाते तयार करण्यासाठी आधी Google चे आमंत्रण गरजेचे होते परंतु ते अधिक प्रसिद्ध झाल्या नंतर ह्याची गरज पडेनाशी झाली.

7. 2004 मध्ये Google ने डिजिटल मॅपिंग कंपनी कीहोल विकत घेतली आणि 2005 मध्ये Google नकाशा आणि Google earth म्हणून एक नवीन अनुप्रयोग सुरू केला. ह्याचे एक वैशिष्ट्य असे आहे की, हे काही सेकंदात सर्व जग दाखवू शकते. Google earth हे टूल आता एवढे पुढे गेले आहे कि आता चंद्रापर्यंत सर्व गोष्टी दाखवते.

8. 2000 मध्ये Google ने AdWord ची सुरुवात केली. हा स्वयंसेवा कार्यक्रम आहे, ज्याच्या मदतीने एक व्यक्ती ऑनलाइन जाहिरात चालवू शकतो. ज्यामुळे कोणताही व्यक्ती घरी बसून एखादे प्रॉडक्ट किव्हा एखादी सर्विस लोकांपर्यंत पोचवू शकतो.

9. Google च्या Gphone येण्याविषयी अनेक अंदाज लावले गेले. त्यानंतर कंपनीने मोबाइल फोन मध्ये वापरतात ती Android सिस्टिम बनवली. जी आता सर्व फोन users वापरतात. या अँड्रॉइड ने स्मार्टफोन चा सुमारे 80 टक्के बाजार ताब्यात घेतला आहे ह्यावरून Android च्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येऊ शकतो. प्रत्येकी पाच स्मार्टफोन मध्ये आज चार स्मार्टफोन मध्ये android ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाते.

10 Google च्या मुख्यालयामध्ये 200 हुन अधिक शेळ्या गवत कापणीसाठी पाळल्या आहेत. Google स्वत: च्या कार्यालयच्या लॉन मध्ये गवताच्या कापणी साठी मशीनचा वापर केला जात नाही कारण मशीन वापरताना धूर आणि आवाज होतो आणि ह्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास होतो त्यामुळे त्यांनी शेळ्या पाळल्या आहेत.

11. Google चे search engine 100 दशलक्ष गिगाबाइट चे आहे. इतका डेटा जतन करण्यासाठी ते एक टेराबाइट च्या एक लाख ड्राईव्ह ची गरज पडेल.

ot contrib google Marathi varsa
information about google in Marathi

12 Google चे मुखपृष्ठ इतके रिकामे असण्याचे कारण हे आहे कि सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज ह्यांना HTML चे ज्ञान नव्हते,त्यामुळे तेव्हा त्यांना त्यांचा होमपेज इतका आकर्षित बनवता आला नाही. सुरवातीच्या काही दिवसात सर्च बार च्या खाली साधे बटन सुद्धा न्हवते, सर्च करण्यासाठी एंटर या बटणाचा वापर करावा लागत असे

13 Google ने आपल्या रस्त्यांच्या नकाशांसाठी 80 दशलक्ष 46 हजार किलोमीटर रस्त्यांचे अचूक फोटो घेतले आहेत.

14. जगातील या सर्वात महत्वाच्या कंपनीच्या वेबसाइट कोड मध्ये 23 मार्कअप एरर आहेत.

15 प्रत्येक आठवड्यास 20,000 पेक्षा अधिक लोक Google मध्ये नोकरी साठी अर्ज करतात.

16. २०२० मध्ये Google ची ९०% कमाई जी 146.92 अब्ज डॉलर्स होती ती फक्त जाहिरातींमधून आली होती.

17. Google कोणतेही नवीन प्रॉडक्ट घेऊन येते आणि कमी वेळात ते प्रसिद्ध होते. 2 सप्टेंबर 2008 मध्ये new open source हे वेब ब्राउझर लाँच केले , ज्याचे नाव Google Chrome होते, ते आल्यानंतर इंटरनेट वापरकर्त्यांना एक परिपूर्ण साधन भेटले.

18. 2006 ला Google ने ऑनलाइन व्हिडिओ शेरिंग साइट यूट्यूब खरेदी केली. यु ट्युब वर प्रत्येक मिनिटाच्या हिशोबाने 100 तासाचा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा आहे. जगातील प्रती लाखो चॅनेल यावर कार्यक्रम अपलोड करतात , ह्यामुळे जग आणखी जवळ आले.

Google marathi mahiti
Google marathi mahiti

19. दरवर्षी Google वर 5095100000000 शोध घेण्यात येतात अर्थात प्रति सेकंद Google मध्ये 70,000 पेक्षा अधिक शोध घेण्यात येतात.

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हा Information about Google in Marathi लेख वाचून गूगल या कंपनी बद्दल जाणून घ्यायला थोडी मदत झाली असेल.

तुम्हाला जा का या Google information in Marathi या लेखामध्ये काही चुकीचे किंव्हा अजून काही गूगल बद्दल माहिती सांगायची असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही वेळोवेळो आमचा हा लेख update करत असतो.

तसेच हा गूगल वरील मराठी लेख लेख वाचून तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर हा लेख Facebook किव्हा whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Information about Google in Marathi | Google बद्दल मनोरंजक तथ्य”

Leave a Comment