Information about Mahatma Gandhi in Marathi | महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र

Mahatma Gandhi Information in Marathi: महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव हे मोहनदास करमचंद गांधी आहे. गांधीजींना बापू या नावाने देखील ओळखले जाते. गांधीजींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा राजकीय नेता म्हणून ओळखले जाते. बापूजींनी कायम अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करायची शिकवण दिली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधीजींचे योगदान हे खूप जास्त मोलाचे होते. या लेखातून महात्मा गांधीजींच्या विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया.

संपूर्ण नाव: मोहनदास करमचंद गांधी
जन्म: 2 ऑक्टोबर, 1869
जन्मस्थान: पोरबंदर, गुजरात, भारत
मृत्यू: 30 जानेवारी, 1948
मृत्यू स्थान: नवी दिल्ली
वडिलांचे नाव: करमचंद गांधी
आईचे नाव: पुतलीबाई
पत्नीचे नाव: कस्तुरबा गांधी
आपत्य: हरीलाल, मनिलाल, रामदास आणि देवदास
समाधी/स्मारक: राजघाट, दिल्ली
कार्य: भारताला स्वातंत्र्य, अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, सत्याग्रह


महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतावर असलेले ब्रिटिशांचे राज्य संपवण्यासाठी आणि गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी कायम कार्य केले. गांधीजींच्या सत्याच्या आणि अहिंसेच्या विचारधारेचा स्वीकार मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी आपल्या संघर्षासाठी केला. महात्मा गांधी यांनी भारतातच नव्हे तर आफ्रिकेत देखील जवळपास 20 वर्ष अन्याय आणि वांशिक भेदभावाविरोधात अहिंसेच्या मार्गाने संघर्ष केला. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे त्यांना भारतात आणि विदेशात देखील प्रसिद्धी मिळाली. गांधीजी हे बापू या नावाने प्रसिद्ध होते.

Mahatma Gandhi biography in Marathi | सुरुवातीचे जीवन आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

mahatma gandhi biography in marathi
Mahatma Gandhi biography in Marathi

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई गांधी होते. महात्मा गांधी यांचा विवाह हा वयाच्या मात्र 13 व्या वर्षीच झाला. बा कस्तुरबा या त्यांच्या अर्धांगिनी बनल्या. गांधीजींना आणि कस्तुरबा यांना चार आपत्य होती. हरीलाल, मनीलाल, रामदास आणि देवदास ही त्या चार मुलांची नावे होय.

लंडनला रवाना

1888 मध्ये महात्मा गांधीजी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला रवाना झाले.

दक्षिण आफ्रिका

मे 1893 मध्ये गांधीजी वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी वांशिक भेदभावाचा पहिल्यांदा अनुभव घेतला. जेव्हा ते एकदा ट्रेन मधील प्रथम श्रेणीच्या डब्यात बसले तेव्हा त्यांच्याकडे तिकीट असताना देखील त्यांना त्या डब्यातून बाहेर ढकलण्यात आले. कारण तो डबा फक्त गोऱ्या लोकांसाठी आरक्षित केलेला होता. कोणत्याही भारतीयाने किंवा काळ्या सावळ्या रंगाच्या माणसाने प्रथम श्रेणीतून प्रवास करणे शक्य नव्हते. या घटनेने गांधीजींवर खूप प्रभाव टाकला आणि त्याच वेळी गांधीजींनी या वांशिक भेदभावा विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बघितले की भारतीय नागरिकांसोबत आफ्रिकेत अशा प्रकारचा व्यवहार हा सामान्य होता. 22 मे 1894 रोजी गांधीजींनी नाटाल इंडियन काँग्रेसची स्थापना केली. याच माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला. खूप कमी काळात आफ्रिकेत गांधीजी भारतीय लोकसमुदयाचे नेतृत्व बनले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका | Mahatma Gandhi’s Struggle for Independence In Marathi 

Mahatma Gandhi's Struggle for Independence In Marathi
Mahatma Gandhi’s Struggle for Independence In Marathi

1915 मध्ये गांधीजी भारतात परत आले. त्यांनी त्यांच्या गुरुसमान असणाऱ्या श्री गोपालकृष्ण गोखले यांच्या समवेत इंडियन नेशनल काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. गांधीजींनी केलेले पहिले मोठे कार्य म्हणजे बिहार आणि गुजरात मधील चंपारण आणि खेडा येथील आंदोलन होय. गांधीजींनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन या सारख्या मोठ्या लढ्याचे देखील नेतृत्व केले.

मृत्यू | Mahatma Gandhi Punyatithi

Mahatma Gandhi Death Anniversary
Mahatma Gandhi Death Anniversary in Marathi

नथुराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या केली. गोडसे हे हिंदू राष्ट्रवादी आणि हिंदू महासभेचे सदस्य होते. त्याने गांधीजींवर पाकिस्तानची बाजू घेण्याचा आरोप लावला. गोडसे हे गांधीजींच्या अहिंसावादी तत्वाच्या विरोधात होते. महात्मा गांधी यांची हत्या ही नथुराम गोडसे यांनी बिरला हाऊस येथील प्रार्थना स्थळावर तीन गोळ्या चालवून केली होती. 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.

लेखन | Mahatma Gandhi book information in Marathi

गांधीजी एक समग्र लेखक होते. खालील काही पुस्तके ही गांधीजींनी लिहिलेली आहेत-
1)हिंद स्वराज्य (1909 मध्ये गुजराती मध्ये प्रकाशित)
2) गांधीजी अनेक हिंदी, गुजराती आणि इंग्रजी वृत्तपत्रांत संपादन करत होते. यात हिंदी आणि गुजराती मध्ये हरिजन तर इंग्रजी भाषेत यंग इंडिया आणि गुजराती भाषेत नवजीवन हे काही प्रमुख आहेत.
3) गांधीजींनी त्यांचे आत्मचरित्र “सत्य के प्रयोग” हे देखील लिहिले.
4) त्यांच्या इतरही कादंबऱ्यां मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह आणि हिंद स्वराज्य हे मुख्य आहेत.

पुरस्कार | Mahatma Gandhi award information in Marathi

1) टाईम मैगजीन ने 1930 साली बापूजींना मैन ऑफ द इयर सन्मान दिला.
2) 2011 मध्ये टाईम मैगजीनने गांधीजींना जगातील कायम प्रेरणा देणाऱ्या 25 राजकीय प्रेरणा स्रोतांमध्ये सामाविष्ठ केले.
3) गांधीजींना कधीच नोबेल पुरस्कार मिळाला नसला तरी देखील त्यांना 1937 ते 1948 या काळात 5 वेळा नामांकित केले आहे.
4) भारत सरकार प्रत्येक वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांना, जगातील नेतृत्वाना आणि नागरिकांना गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करत असते. दक्षिण आफ्रिकेत रंगभेदाच्या विरोधात संघर्ष करत असलेल्या नेल्सन मंडेला यांना या शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

चित्रपट | Mahatma Gandhi movie

गांधीजींच्या जीवनावर 1982 मध्ये चित्रपट बनला होता. यात बेन किंग्सले यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. इतकेच नाही तर या चित्रपटाला ऑस्कर मध्ये बेस्ट पिक्चर हा सन्मान देखील मिळाला होता.

सत्याग्रह

गांधीजींनी त्यांच्या अहिंसेच्या सिद्धांताला सत्याग्रहाचे रूप दिले होते. गांधीजींच्या सत्याग्रहानी अनेक मोठ्या व्यक्तींना प्रभावित केले. स्वतंत्रता, समानता आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांना धरूनच गांधीजी त्यांचे कार्य करत होते. गांधीजींच्या कार्यातून पुढे चांगले काम करणारे नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग हे प्रभावित होते. सत्याग्रह हा सत्य आणि अहिंसा या दोन मुद्द्यांवरच आधारित आहे.

हे देखील वाचा

महात्मा गांधीचे अनमोल विचार

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment