Information about Japan in Marathi | जपान बद्दल काही आश्चर्यकारक माहिती

Information about Japan in Marathi | जपान बद्दल काही आश्चर्यकारक माहिती

सर्वात कष्टकरी देश म्हणजे जपान. हा देश सुमारे ६८०० बेटांपासून बनला आहे. या देशाचे नाव कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. कुठलीही नवीन गोष्ट करण्यास हा देश नेहमी पुढाकार घेतो. जपानमध्ये लोक इतके मेहनती आहेत की आपण अंदाज देखील लावू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया जपान देशाची काही माहिती…

१) जपानमध्ये दरवर्षी सुमारे १५०० भूकंप येतात, म्हणजे प्रति दिवस चार भूकंप इथे येतात.

2) जपान हे एकमेव असे देश आहे जिथे मुस्लिमांना जपानचे नागरिकत्व मिळत नाही. मुस्लिमांना जपानमध्ये घर देखील भाड्याने मिळत नाही.

३) जपानच्या कोणत्याही विद्यापीठात अरबी किंवा इतर कोणतीही इस्लामिक भाषा शिकवली जात नाही.

४) प्रत्येक जपानचा नागरिक जेव्हा आपल्या कुत्र्याला घेऊन घराबाहेर निघतो तेव्हा तो स्वतः जवळ एक विशेष पिशवी ठेवतो ज्यामधे ते कुत्र्याचे मल एकत्र करतात.

५) जपानमध्ये मुलं दहा वर्षांची होईपर्यंत त्यांना कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही.

६) जपानमध्ये, शाळेत मुले आणि शिक्षक एकत्र येऊन आपआपले वर्ग साफ करतात.

७) जपानच्या लोकांचे सरासरी जगण्याचे वय सर्वात जास्त आहे (८२ वर्ष). जपान मध्ये शंभर वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ५० हजार लोक आहेत.

८) जपानमध्ये दरवर्षी शेकडो भूकंप होऊन देखील जपान ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची बळकट आर्थिक स्थिती असलेला देश आहे.

९) सुमो(Sumo) हा जपानचा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे याशिवाय बेसबॉल देखील खूप लोकप्रिय आहे.

१०) जपान मध्ये प्रकाशित झालेली २०% पुस्तके ‘कॉमिक बुक्स’ आहेत.

११) नव्या वर्षाला म्हणजे एक जानेवारीला जपानच्या मंदिरात १०८ घंटा वाजवून नववर्षाचा उत्सव साजरा केला जातो.

१२) जपानचे लोक वेळेचे खूप समयनिष्ठ आहेत की तिथे रेल्वे जास्तीत जास्त आठरा सेकंद विलंबाने येते.

१३) २०१५ पर्यंत जपानमधे उशिरापर्यंत नृत्य व नाच करण्यास मनाई होती.

१४) काळी मांजर जपानमध्ये भाग्यवान समजली जाते.

१५) व्हेंडींग मशीन ही एक अशी मशीन आहे ज्यात नाणी घातल्याने वस्तू बाहेर येते जसे की अंडी, नूडल्स, केळी इत्यादी. जेव्हा आपण जपानमध्ये जाल तेव्हा आपल्याला हे यंत्र सर्वत्र आढळून येईल. जपान मध्ये जवळपास ५५ लाख व्हेंडींग मशीन आहेत.

१६) जपान मध्ये एक इमारत अशी देखील आहे ज्या इमारतीच्या मधून महामार्ग जातो.

१७) जपान चारही बाजूंनी समुद्राने व्यापलेला देश असूनही २७% मासे इथे इतर देशांमधून विकत आणले जातात.

१८) जपानमध्ये ९०% स्मार्टफोन हे जलरोधक असतात कारण जपानमधलीधील लोक अंघोळ करता करता देखील फोन वापरतात.

१९) जपानमध्ये ७० प्रकारचे “Fanta” उपलब्ध आहेत.

२०) जपानमध्ये बहुतेक रस्ते अशा आहेत की त्या रस्त्यांना नावाच नाही.

२१) जपान मधे सॉरी म्हणण्याचे वीसपेक्षा जास्त प्रकार आहेत.

२२) जपान जगातील सर्वात मोठा ऑटोमोबाइल बनवणारा देश आहे.

२३) २०११ साली जपान मधे झालेला भुकंप हा आजपर्यंतचा सर्वात भयानक आणि जलद भूकंप होता. या भूकंपामुळे पृथ्वीची गती १.८ मायक्रो सेकन्द ने वाढली.

२४) जपान जगातील हा एकमेव असा देश आहे ज्याच्यावर अॅटम बॉम्बचा हल्ला झालेला. तुम्हाला माहीतच असेल की अमेरिकेने ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ मधे हिरोशिमा व नागासाकीवर बॉम्ब हल्ला केलेला. या बॉम्बचे नाव ‘लिटल बॉय’ आणि ‘फेंट मॅन’ असे देण्यात आले होते.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment