What is Coronavirus in Marathi? Symptoms of Corona Virus In Marathi | कोरोना व्हायरस

चीन मध्ये आणि चीन पासून पसरलेला कोरोना विषाणू हा भारतासोबतच जगातील इतर अनेक जवळच्या देशांमध्ये हाहाःकार माजवत आहे . हा विषाणू भारत, अमेरिका, तिब्बत, थाईलैंड, जापान आणि मंगोलियामधील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे . मुंबई नंतर राजस्थान आणि बिहारमध्येही coronavirus आढळला आहे. बिहारमध्ये या विषाणूंमुळे परिणाम झालेला रुग्ण आढळला आहे .

चीनमधून परत आलेल्या एका मुलीमध्ये कोरोना विषाणूचे लक्षण दिसून आले आहेत व तिच्यावर आता उपचार चालू आहेत. जयपूरमध्ये देखील एका स्टूडेंटमध्ये कोरोना विषाणूचे लक्षण आढळून आले आहे. या खतरनाक विषाणूमुळे चीनमधील १३२ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ६००० आसपास लोकांमध्ये Coronavirus affect झालेले आढळून आले आहे.

Corona information in Marathi
Corona information in Marathi

सीएनएनच्या अहवालाचा अनुभव, 461 रुग्णांची तब्येतीची तीव्रता दिसून येते. कोरोना व्हायरस २०१९ वर्षाच्या डिसेंबर महिन्यात पहिल्यादा चीनच्या वुहान शहरात पसरला. तेंव्हापासून हा व्हायरस चीन मध्ये अगदी तेजीने पसरत गेला आणि तेथिल लोकांवर परिणाम करत गेला. . वुहान नंतर हा विषाणू बीजिंग, शंघाई, मकाओ आणि हांगकांग मध्ये पसरला आणि तेथील लोकांना संक्रमित केले . चीनच्या राष्ट्रीय आरोग्याविषयी सल्लागारांना असे म्हटले आहे की या विषाणूचा संसर्ग काळ 10 दिवसांचा आहे आणि ह्या १० दिवसात बचावासाठी विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जपान मध्ये प्रथम या विषाणूपासून संक्रमित झालेल्या दोन रुग्णाची तपासणी झालेली आहे . खरतर , चीन आणि वुहान मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांमुळे हा विषाणू इतर देशांमध्ये पसरत चालला आहे . हॉगकॉग आणि भारत मध्ये चीन मधून प्रवास करणाऱ्या प्रवासामुळे भारतात देखील आता हा virus आढळून आला आहे . त्यामुळेच चीनने आपल्या 12 शहरांमधील जवळ जवळ 3.5 कोटी पेक्षा जास्त रहिवाशांच्या प्रवासात प्रबंध आणला आहे.

काय आहे corona virus ?

कोरोना व्हायरस एक प्रकारचा संक्रमित (संसर्गजन्य ) व्हायरस आहे. जागतिक आरोग्य संघटनने या विषाणूं बद्दल चेतावणी दिली आहे. हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो. जगाच्या तमाम देशात हा विषाणू चीन मधून येणाऱ्या यात्रींमुळे पसरत आहे . या विषाणूचे लक्षण निमोनियासारखे आहे. हा व्हायरस कोरोनो व्हायरस कुटुंबाशी संबंध ठेवण्यारा विषाणू आहे.

कोरना व्हायरस प्राण्यांमध्ये देखील आढळला जातो. समुद्री जीव-जंतु मुळे हा व्हायरस चीनमधील लोकांमध्ये पसरला गेला. दक्षिण चीनमधील समुद्राच्या आसपासचे लोक सर्वात आधी या विषाणूचा परिणामांचे शिकार झाले , ज्यात वुहान शहर देखील होता. दक्षिण चीनच्या बाजारपेठेत अधिक प्रमाणात समुद्रातील जीव मिळतात. ह्या बाजारात जिवंत समुद्री जीव त्यायांचे मांस देखील मिळते .इथूनच हा ह्यायरस लोकांमध्ये पसरला

Corona Virus in Marathi
Corona Virus in Marathi

कोरोना व्हायरसचे लक्षण (Corona Virus Symptoms ):

१. ताप
२. श्वास घेण्यास त्रास
३. सर्दी-जुकाम
४. खोकला
५. नाक सतत वाहने
६. डोके दुखणे
७. ऑर्गन फेल्युअर (अंगांचे काम करणे बंद)

कोरोना व्हायरस मध्ये कोणत्याही प्रकारची एंटीबायोटिक काम करत नाही. फ्लू मध्ये वापरले जाणारे देखील एंटीबायोटिक या व्हायरसमध्ये काम करत नाही. प्राण्यांद्वारे पसरला जाणारा कोरोना विषाणू सिवीर एक्यूट रेस्परटॉरी सिंड्रोम (गंभीर श्वसन लक्षण) आणि मिडिल इस्टर्न रेस्परटॉरी सिंड्रोम दोन्ही प्रकारचे आहेत . मिडिल इस्टर्न रेस्परटॉरी सिंड्रोम (मेर्स)हा अफ्रीकी आणि शियाई उंटांद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात .
वटवाघूळ हा असा जीव आहे ज्यात सिवीर एक्यूट रेस्परटॉरी सिंड्रोम (गंभीर श्वसन लक्षण) आणि मिडिल इस्टर्न रेस्परटॉरी सिंड्रोम अश्या दोन्ही प्रकारचे कोरोनो व्हायरस आहेत .

What is corona virus in Marathi
What is corona virus in Marathi

परंतु अद्यापही कळले नाही कि , हा कोरोनो व्हायरस नक्की कोणामुळे मानवी शरीरात पसरतो ?>सापांमुळे कि वटवाघूळ मुळे कारण ह्या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे CORONA Virus आढळतात . चीनमध्ये पहिल्यांदा सिवीर एक्यूट रेस्परटॉरी सिंड्रोम (गंभीर श्वसन लक्षण) हा virus वर्ष 2002 मध्ये पसरला होता. त्यावेळी हा विषाणू 37 देशांमध्ये आढळला होता आणि आठ हजारांहून अधिक लोक संक्रमित झाले होते आणि 750 पेक्षा जास्त मृत्यू झाले.

corona3 Marathi varsa

कोरोना व्हायरस चीन बाहेर देखील प्राणघातक आहे का ?

corona5 Marathi varsa

चीन बाहेर देखील हा विषाणू आढळत चालला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या रविवारी ह्या विषाणूमुळे संक्रमित झालेला ५वा रुग्ण मिळाला . सिंगापूरच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की तेथे कोरोना विषाणूपासून चार रुग्णाची तपासणी झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये देखील या विषाणूंपासून संक्रमित चार लोकांची तपासणी चालू आहे. . त्याचबरोबर फ्रांस आणि नेपाळ मध्ये देखील याचे काही रुग्ण आढळले आहे . अशा प्रकारचे व्हायरस चीन बाहेर देखील जगाच्या अनेक देशांत त्रासदायक घटना घडत आहेत.

कोरोना व्हायरसच्या पसारापासून घ्यायची काळजी :

१) आजारी लोकांची योग्य काळजी घ्या.
२) रेस्पिरेटरी म्हणजे श्वासासंबंधित त्रास असलेला कोणत्याही व्यक्ती पासून दूर राहा.
३) ज्या देशात ह्या विषाणू चा प्रकोप आढळत आहे त्या ठिकाणी प्रवास करणे टाळा.
४) हात पाय स्वछ धुणे आणि स्वच्छतेची कलगी घेणे
५) खोकताना तसेच शिंक देताना आपला तोंड योग्य प्रकारे झाकून घेणे .
६) आपल्या हाताने किंव्हा बोटानी सतत तोंडाला, नाकाला, डोळ्यांना स्पर्श न करणे .
७) सार्वजनिक स्थाने, सार्वजनिक जागी असलेल्या वस्तूना स्पर्श न करणे तसेच अश्या ठिकाणी कोणालाही हात मिळवणे किंव्हा स्पर्श करणे टाळणे

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment