Marathi Chavat Ukhane | मराठी चावट उखाणे 2021

आतापर्यंत आपण नवरा-नवरीचे वेगवेगळे उखाणे पहिले, आता जरा थोडे वेगेळे, हटके, मजेदार Marathi Chavat Ukhane पाहूया.

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

डाळित डाळ तुरीची डाळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास,
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
***** रावं बिड्या पितात संडासात बसून

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!

***रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!

सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
***** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर

चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

आंब्यात आंबा हापुस आंबा अन,
आमची **** म्हणजे जगदंबा

साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
**** ने मला पावडर लाऊन फसवले

चांदिच्या परातीत केशराचे पेढे
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.

नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
***** चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका.

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.

यशोमती मैया से बोले नंदलाला
*** च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत ****राव , मग कशाला हवा हमाल

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर ,
श्याम रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
***** माझी बायको आहे मोठी लुच्ची

भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
**** च्या जीवावर करते मी मजा

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
***** राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल

Marathi Ukhane is the very familiar term in Maharashtra State. This is one of the marriage tradition i.e. ‘Ukhane‘ takes place in All part of Maharashtra. In this tradition bride introduces her husband by taking her name in some poetic Marathi language.

If you have any other unique “Marathi Ukhane”, please submit to us with via Comment Section. We would like to share those best ukhane in our ukhane lekh(Articles) with your name.

Leave a Comment