How Japanese people keep themselves fit in | जपानी लोक स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवतात

जपान हा देश जगात सगळ्यात तेजीने विकास करणारा देश आहे आणि इथल्या लोकांचे आयुर्मान हे इतर देशातील लोकांपेक्षा जास्त असते. एका सर्वेक्षण नुसार येथील बरीच लोक ९० वर्षा पेक्षा जास्त जगतात. जपानी संस्कृती हि एक प्राचीन संस्कृती आहे. प्रत्येक देशाने आपल्या परंपरेच्या माध्यमातून जगाला काही ना काही शिकवले आहे, जसे भारताने जगाला योगा व आयुर्वेद दिला आहे. तसेच जपान ने हि जगाला खूप काही दिलेय. जपानी लोकांचे आयुर्मान हे इतराच्या तुलनेत जास्त असते जपानी लोक खूप तंदुरुस्त असतात.

जपानी लोक स्वतःला तंदुसुस्त कसे ठेवतात

ग्रीन टी हा चहा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. पण हा इतर चहा सारखा स्वादिष्ट नसतो. परंतु याच्यात खूप सारे गुण असतात. हा चहा आपल्या आरोग्य साठी फायदेमंद आहे कारण ग्रीन टी मध्ये एन्टीऔक्सिडेंट तत्व असतात आणि याचे खूप फायदे असतात. यामुळे चेहऱ्यावर कोणत्या हि प्रकारचे डाग होत नाहीत आणि त्वचेवर सुरकुत्या देखील लवकर पडत नाहीत. हा चहा रोज प्यायल्याने आपले वजन नियंत्रणात राहते. त्याच प्रकारे यामुळे हृद्य-रोग आणि कॅन्सर सारख्या आजारांचा धोका टळतो. जपानी लोक दिवसातून कमीत कमी २ वेळा ग्रीन टी पितात. ग्रीन टी प्यायल्याने आपले वजन वाढत नाही आणि इतर आजारानं पासून दूर राहतात.

सी फूड म्हणजे समुद्रतून मिळणारे मासे खाऊन जपानी लोक स्वतःला तरुण आणि तंदुरुस्त ठेवतात. जपानी लोक चिकन आणि मटन देखील आवडीने खातात. त्यांच्यानुसार लाल मांस खाल्याने शरीरात cholesterol वाढते व वजन देखील वाढते. यामुळे खूप साऱ्या समस्या होतात. ब्लड शुगर वाढणे, ह्रदयरोग आणि इतर समस्या उद्भवतात ज्या मुळे आपल्या शरीराला खूप नुकसान होत. समुद्रात मिळणारा तारा मासा तसेच अन्य समुद्री जीव आपल्या शरीराला शक्ती देतात ज्यामुळे आपण सुरक्षित राहतो. जपानी लोक लाल मांस खाण्या पेक्षा समुद्री मासे खाणे जास्त पसंद करतात.

साल्मोन मासा, ट्युना फिश आणि श्रीम्प यामध्ये प्रोटीन आणि ओमेगा चांगल्या मात्रेत आढळते. आंबवलेले पदार्थ(fermented food) किम्ची, मिसो, sauerkraut कोम्बच आणि केफिर, टेम्पेह हे काही आंबवलेले पदार्थ जपानी लोक आवडीने खातात. आंबवलेले पदार्थांमध्ये विटामिन आणि एन्जाइम असतात जे आपल्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी मदत करतात. आंबवलेले पदार्थांमध्ये असे काही bacteria असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतात यामुळे आपण जास्त काळा साठी तरुण दिसतो. आंबवलेल्या पदार्थांमध्ये एनजाइम, विट्यामीन आणि प्रोबायोटीक्स असतात ज्यामुळे निरोगीपणा वाढतो. असे मानले जाते कि जे लोक नियमित पणे व्यायाम करतात आणि चालण्याचा व्यायाम करतात त्यांना तणाव आणि चिंता कमी असते आणि त्याच बरोबर त्यांचे वजन संतुलित राहते, चालण्याने वजन कमी होतो यामुळे त्यांना जाडेपणाची समस्या होत नाही.

मार्शल आर्ट अशी कला आहे ज्याच्यात जर कोणती व्यक्ती तरबेज असेल तर तो स्वतःची रक्षा करू शकतो. जपान मध्ये जवळ जवळ सगळेच लोक मार्शल आर्ट शिकतात. त्यात पुरुष आणि महिला तसेच लहान मुल या सगळ्यांचा समावेश असतो यामुळे जपानी लोक निरोगी आणि तंदुरुस्त असतात. मार्शल आर्ट मध्ये जुडो, कराटे आणि अकिरा या सारख्या कलांचा समावेश असतो आणि यामुळे जपानी लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहतात. मार्शल आर्ट मुळे मानसिक शक्ती, शरीराची लवचिकता आणि सहनशीलता मजबूत होते यामुळे जपानी लोकांचे आयुर्मान जास्त असते.

आहार आपल्याला वाटत असेल कि जास्त खाण्यामुळे वजन वाढत असेल पण असे नाही कारण जपानी लोक दिवसातून ५ ते ६ वेळा थोडा थोडा आहार घेतात. अन्य देशांच्या तुलनेत हा आहार जास्त वाटतो. असा आहार घेण्यामागे एक कारण आहे, थोडा थोडा आहार दिवसातून ५ ते ६ वेळा घेतल्याने आपला वजन वाढत नाही आणि जाडेपणाची समस्या होत नाही यामुळे आपण आपले शरीर संतुलित ठेऊ शकतो यामुळे आपले आयुर्मान वाढते.

मेडीटेशनएक अशी कला आहे ज्यामुळे आपण आपले मन शांत ठेऊ शकतो. जपानी लोक मेडीटेशन ला आपल्या जीवन शैलीचा एक भाग मानतात. जपान मध्ये लहान- मोठे, महिला, पुरुष तसेच वृद्ध सगेळेच मेडीटेशन करतात. कारण यामुळे आपले मन शांत राहते, तणाव कमी होतो, चिंता दूर होतात, यामुळे आपले आयुर्मान वाढते आणि आपल्या जीवनात प्रसन्नता येते. म्हणून प्रत्येकाला मेडीटेशन करायला हवा यामुळे आपन सुखी जीवनाचा आनंद घेऊ शकता.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment