प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning | Mhani in Marathi


प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi Mhani | mhani in marathi - part 10


⇒ पायाशी लोटांगण घालणे
"शरण येणे."


⇒ पादाक्रांत करणे
"जिंकणे."


⇒ पोटाशी धरणे
"ममतेने वागविणे."


⇒ मन मोठे करणे
"उदारपणा दाखविणे."


⇒ मन विरघळणे
"दया उत्पन्न होणे."


⇒ मन मोडणे
"मनाविरुद्ध वागणे "


⇒ मान टाकणे
"निर्बल होणे."


⇒ मान तुकवणे
"ऐकणे."


⇒ प्राण कंठाशी येणे
"जीव कासावीस होणे."


⇒ प्राण पणाला लावणे
"जीवावर उदार होणे, मृत्यूची परवा न करणे."


⇒ हाडाला खिलणे
"पक्का होणे."


⇒ तोंड दाखवणे
" भेटणे, समोर येणे."


⇒ तोंड लागणे
"सुरवात होणे."


⇒ तोंडपाटीलकी करणे
"काहीही कृती न करता नुसती बडबड करणे."


⇒ दातओठ खाणे
"अतिशय संतापणे"


⇒ दातखिळी बसणे
"गप्प बसणे, निरुत्तर होणे."


⇒ दात विचाकणे
" याचना करणे."


⇒ नजरेत भरणे
"आवडणे"


⇒ देह कारणी लावणे
"चांगल्या कामासाठी देह झिजवणे."


⇒ देहभान हरपणे
"स्वतः ला विसरून जाणे "


⇒ नाक खाली ठेवणे
"गर्व नाहीसा होणे."


⇒ नाक ठेचणे
"खोड मोडणे."


⇒ पाठीस लागणे
"एकसारखा पिच्छा पुरवणे."


⇒ पाय काढणे
"निसटणे"


⇒ पायांनी चालत येणे
"विनाकष्ट प्राप्त होणे"


⇒ काळजाने ठाव सोडणे
" धीर खचणे."


⇒ गळ्याला तात लावणे
"फार मोठ्या संकटात लोटणे."


⇒ गळा मोकळा करणे
"संकटातून मोकळे करणे."


⇒ गळी उतरणे
"मनावर बिंबणे "


⇒ छातीचा कोट करणे
"धैर्याने तोंड देणे. "


⇒ जीभ चाटणे
"आशाळभूतपणे पाहणे."


⇒ जिभेवर असणे
"पूर्णपणे माहित असणे."


⇒ जीव लावणे
"माया लावणे."


⇒ जीवावर बेताने
"जीव धोक्यात येणे."


⇒ जीवाची तमा न करणे
"प्राणाची परवा न करणे."


« 1 2 3 4 5 6 7 8 9 10

You May Also Like