प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning | Mhani in Marathi


प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi Mhani | Mhani in Marathi - Part 2


⇒जित्याची खोड मेल्याशिवाय जात नही
अंगी पूर्ण बाणलेल्या सवयी जन्मभर जात नाहीत.


⇒जी खोड बाळा ती जन्म काळा
जन्मजात अंगी असलेले गुण किव्हा दुर्गुण जन्मभर जात नाहीत.


⇒जेवीन तर तुपाशी नाहीतर उपाशी
मिळाले तर चांगले पाहिजे नाहीतर मुळीच नको.


⇒जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे
एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष करू लागल्याशिवाय त्यामधील अडचणी कळून येत नाहीत.


⇒जाळात राहून माशाशी वैर कशाला
"समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.".


⇒ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी
उपकारकर्त्याच्या बाजूने बोलावे.


⇒ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी
एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात..


⇒खाण तशी माती
आई-वडिलांप्रमाणेच मुले असतात..


⇒केळीवर नारळी अन घात चंद्रमौळी
अत्यंत गरीब परिस्थिती असणे.


⇒ज्याचे कुडे त्याचे पुढे
दुसऱ्याचे वाईट इच्छिनाऱ्याचेच वाईट होते .⇒ असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी
स्वतः आळशी पणाने काहीही उद्योग न करता दैवावर विसंबून सर्व सुखे मिळण्याची अपेक्षा धरणे .


⇒ आयजीच्या जीवावर बायजी उदार
दुसर्यांकडून मागून घेऊन अन्य वक्तीला देऊ करणे आणि वर स्वतःला दानशूर म्हणून घेणे .


⇒ गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मग मोडून खाल्ली
एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झाला तर ठीक,नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे.


⇒ तोबरयाला पुढे ,लगमला मागे
फायद्याचा वेळी पुढे पुढे, कामाच्या वेळी मात्र मागे मागे .


⇒ अडला हरी गाढवाचे पाय धरी
अडचणीच्या वेळी कुणाचीही मदत घ्यावी लागते


⇒ अती केला अनं मसनात गेला
कुठलीही गोष्ट मर्यादित करावी , अन्यथा तिचा शेवट होतो .


⇒ वासरात लंगडी गाय शहाणी
वेड्या लोकात थोडीफार जर बुद्धी असला तरी तो शहाणा समजला जातो .


⇒ अती तिथं माती
कुठलीही गोष्ट अति केली कि तिचा शेवट निश्चित.


⇒ अती राग भिक माग
जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते.


« 1 2 3 4 5 6 7 8 9 »

You May Also Like