प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning | Mhani in Marathi


प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi Mhani | Mhani in Marathi - Part 3⇒ दुष्काळात तेरावा महिना
आधीच संकटात असताना आणखी संकट येणे.


⇒ आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड
स्वतः च स्वतः चे नुकसान करून घेणे.


⇒ आरोग्य हीच धनसंपत्ती
आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे.


⇒ ऐकावे जनाचे करावे मनाचे
लोकांचे मत जाणून घेऊन आपल्या मनाला पटेल तेच करने.


⇒ आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.


⇒ आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही
बाजूने अडचणीची स्थती निर्माण होणे.


⇒ घर पहावे बांधून, लग्न पहावे करून
अनुभवाने माणूस हुशार होणे.


⇒ आली अंगावर, घेतली शिंगावर
जश्यास तसे उत्तर देणे.


⇒ अपुऱ्या घड्याला डबडब फार
विद्वत्ता नसताना उगीव्ह बढाया मारणे.


⇒ असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी
सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षया करणे.


⇒घरोघरी मातीच्या चुली
सगळीकडे सर्वसाधारण एकच परिस्थिती असते.


⇒घर फिरले कि घराचे वासे फिरतात
घरातील कर्त्या माणसावर संकट आले कि , त्याचे आश्रितदेखील त्याच्यावर उलटतात.


⇒घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे
आपलेच काम आपल्याला भरपूर असताना त्यात इतरांच्या कामाची भर पडणे.


⇒चढेल तो पडेल
ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते, तोच शेवटी यशस्वी होतो. प्रयत्न करणाराला एखाद्या वेळी अपयश हे यायचेच.


⇒चालत्या गाडीला खीळ
सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे.


⇒चोराच्या मनात चांदणे
गुन्हा करणाऱ्याच्या मनात गुन्हा उघडकीस येईल कि काय याची सारखी भीती वाटत असते.


⇒चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
प्रत्येकाच्या आयुष्यात केंव्हातरी चांगले दिवस येतात.


⇒जशी देणावळ तशी धुणावळ
आपण जसे दुसऱ्याच्या उपयोगी पडतो तसे दुसरे आपल्या उपयोगी पडतात.


⇒कुठे जशी भोग तर तुझ्यापुढे उभा
ज्या संकटाला आपण भितो तेच संकट आपल्यापुढे उभे राहते.


⇒चिंती पार ते येई घरा
दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली कि आपलेच वाईट होते.


« 1 2 3 4 5 6 7 8 9 10

You May Also Like