प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning | Mhani in Marathi


प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi Mhani | Mhani in Marathi - Part 5⇒ अघळ पघळ अन घाल गोंधळ.
"मोठमोठ्या गोष्टी करणारा व्यक्ती कामात आळशी असतो."


⇒ अचाट खाणे अन मसणात जाणे.
"वाजवीपेक्षा जास्त जेवण करीत राहिले तर आपल्याच तब्येतीवर वाईट परिणाम होतो."


⇒ अटकाव नाही तेथे धुडगूस.
"जेथे प्रतिबंध नही तेथे गोंधळ होतो."


⇒अटक्याचा सौदा आणि येरझारा चौदा.
"एखाद्या छोट्या कामासाठी उगीचच जास्त मेहनत करावी लागणे."


⇒अठरा विश्व दारिद्र.
"अतिशय गरिबी."


⇒ अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर.
"क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च."


⇒ अति झाले अन आसू आले.
"एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला कि ती दु:खदायी ठरते."


⇒ अती उदार तो सदा नादार.
"आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला कि सतत आर्थिक चणचण निर्माण होते."


⇒ अढिच्या दिढि सावकाराची शिडी.
"अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो."

⇒ अस्तुरीचा बात अन इडयाले नको काथ.
" मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात."


⇒ असेल तेंव्हा दिवाळी, नसेल तेंव्हा शिमगा.
"अनुकुलता असेल तेंव्हा चैन आणि नसेल तेंव्हा उपवास करण्याची पाळी."


⇒ असेल ते मितवा, नसेल ते भेटवा.
"जे सहज मिळत असेल त्याला नकार देणे व मिळण्यासारखे नसेल त्याची इच्छा धरणे."


⇒ असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती.
"नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो."


⇒ असून नसून सारखा.
"असला किंव्हा नसला तरी काही फरक पडत नाही."


⇒ असून अडचण नसून खोळंबा.
"जर सोबत असेल तर तरी त्रास आणि नसेल सोबत तरी त्रास."


⇒ असतील शिते तर जमतील भुते.
"एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा त्याच्याकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात."


⇒असतील मुली तर पेटतील चुली.
" संतती असल्यास हिस्सेवात होतीलच."


⇒अल्प बुद्धी, बहु गर्वी.
"कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो."


⇒ अर्धी टाकून सगळीकडे धावू नये.
"संबध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये."


⇒ अर्थी दान महापुण्य.
"गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते."


⇒ अरे माझ्या कर्मा, कुठे गेला धर्मा!
"आपण चुका करून वर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे."


⇒ अभी दिल्ली बहुत दूर है!
"आपण केलेल्या कामाच्या मानानं खूप काम, खूप काही साध्य करायचं बाकी असणे. "


⇒ अपापाचा माल गपापा.
"लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते."


⇒ अपमानाची पोळी, सर्वांग जाळी.
"स्वाभिमानी माणूस स्वतःचा अपमान कधीही सहन करीत नाही. "


⇒ अन्नाचा येतो वास, कोरीच घेते घास.
"अन्न न खाणे पण त्यात मन असणे."


⇒ अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही.
"सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धटपणाने तो आपला शत्रू बनतो."


⇒ अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे.
"फुकट तर जेवायचे वर पुन्हा मिजास दाखवायची."


⇒ अन्न तारी, अन्न मारी.
"पचेल तेवढे खाल्ले तर शरीर सुदृढ बनते, पण वाजवीपेक्षा जास्त आहार शरीरास अपायकारक असतो."


⇒ अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये.
"अपरिचित माणसाशी फार सलगी करू नये."


⇒ अनोळखी उपाख्या आणि नऊ पट होम.
"अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते."


⇒ अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली.
"अनुभवानेच ज्ञान प्राप्त होते."


« 1 2 3 4 5 6 7 8 9 10

You May Also Like