प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning | Mhani in Marathi


प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi Mhani | Mhani in Marathi - Part 6⇒ हातघाई वर येणे
"उतावीळ होणे."


⇒ हातात कंकण बांधणे
"प्रतिज्ञा करणे."


⇒ हातपाय हलविणे
"काहीतरी प्रयत्न करणे."


⇒ हातापाया पडणे
"विनवणी करणे"


⇒ हव्यास धरणे
"उत्कट इच्छा धरणे"


⇒ हुतात्मा होणे
"उच्च ध्येयायासाठी बलिदान करणे."


⇒ हायसे वाटणे
"समाधान वाटणे."


⇒ अंग टाकणे
"अगदी कृश होणे."


⇒ अंग धरणे
"बाळसे धरणे."


⇒ उरात धडकी भरणे
"अतिशय भीती वाटणे."


⇒ उरी फुटणे
"मनाला सहन न होण्यासारखा धक्का बसणे."


⇒ हात ओला करणे
"जेवायला घालणे"


⇒ हात पसरणे
"याचना करणे"


⇒ हात गगनाला पोहोचणे
"गर्व होणे."


⇒ हात टाकणे
"मारणे"


⇒ हात मारणे
"ताव मारणे, फायदा करून घेणे."


⇒ हात चालणे
"पैसा मिळणे"


⇒ हात देणे
" मदत करणे."


⇒ हरभऱ्याच्या झाडावर चढविणे
"खोटी स्तुती करणे."


⇒ हात आखडता घेणे
"देण्याचे प्रमाण कमी करणे."


⇒ हातपाय गाळणे
"नाउमेद होणे."


⇒ हाडे खिळखिळी करणे
"अतिशय त्रास देणे."


⇒ सोक्षमोक्ष लावणे
"शेवट करणे."


⇒ संगनमत करणे
"एकमेकांशी बेत ठरविणे"


⇒ हातावर तुरी देणे
"फसवून पळून जाणे"


⇒ हातावर शीर घेणे
"जीवावर उदार होणे"


⇒योगक्षेम चालविणे
"चरितार्थ चालविणे"


⇒ रक्ताचे पाणी करणे
"अतिशय श्रम करणे."


⇒ रामराम ठोकणे
"कायमचा निरोप घेणे"


⇒ रामायण लावणे
"लांबड लावणे"


⇒ राम नसणे
"अर्थ नसणे"


⇒ रेवडी उडविणे
"फजिती करणे"


⇒ रंग दिसणे
"संभव असणे"


⇒ लाचार होणे
"निरुपाय होऊन शरण जाणे."


⇒ लांडगेतोड करणे
"शत्रूवर तुटून पडणे."


⇒ वाचनाला जागणे
"दिलेला शब्द पाळणे."


⇒ वाण पडणे
"कमी पडणे."


⇒ वाघाचे कातडे पांघरणे
"मुद्दाम ढोंग करणे."


⇒ वेसन घालणे
"मर्यादा घालणे"


⇒ वेड लागणे
"नाद लागणे"


⇒ वेड घेऊन पेडगावास जाणे
"मुद्दाम ढोंग करणे."


⇒ वनवास भोगणे
"हालअपेष्टा भोगणे"


⇒ वाटेला जाणे
"खोडी काढणे."


⇒ विकोपास जाणे
"अतिरेक होणे, मर्यादेबाहेत जाणे."


⇒ विधिनिषेध न बाळगणे
"कसलाच धरबंद नसणे."


⇒ विरंगुळा मिळणे
"मन रमणे, समाधान वाटणे."


⇒ शब्द खाली पडू न देणे
"मनाप्रमाणे वागणे."


⇒ शंभर वर्षे भरणे
"नाशाची वेळ येणे."


⇒ शिकस्त करणे
"खूप प्रयत्न करणे."


⇒ शोभा होणे
"फजिती करणे."


⇒ सही फिरणे
"प्रतिकूल वेळ येणे."


⇒ सळो कि पळो करून सोडणे
"अतिशय त्रास देणे."


⇒ सतीचे वाण घेणे
"अतिशय अवघड गोष्ट करण्याची जबाबदारी स्वीकारणे."


⇒ साखर पेरणे
"गोड गोड बोलून आपलेसे करण्याचा प्रयत्न करणे."


⇒ तोंडात साखर घालणे
"आनंदाने तोंड गोड करणे."


⇒ सोन्याचा धूर निघणे
"खूप संपत्ती असणे."


⇒ स्वर्ग दोन बोटे उरणे
"गर्व होणे."


« 1 2 3 4 5 6 7 8 9 10

You May Also Like

s