प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning | Mhani in Marathi


प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi Mhani | Mhani in Marathi - Part 7⇒ रसातळाला जाणे
"नाश होणे."


⇒ राम नसणे
"अर्थ नसणे."


⇒ माणसे जोडणे
"माणसे आपलीशी करणे."


⇒ मानगुटीस बसणे
"अगदी पिच्छा पुरविणे."


⇒ मागमूस नसणे
"ठावठिकाणा नसणे."


⇒ मिंधे बनणे
"लाचार बनणे."


⇒ मुभा असणे
"परवानगी असणे, मोकळीक असणे."


⇒ मुसंडी मारणे
"एकदम धडक मारणे."


⇒ मृत्युच्या दाढेत लोटणे
"मरण जवळ करणे."


⇒ राम म्हणणे
"मरणे."


⇒ मिशीला पीळ देणे
"बढाई मारणे."


⇒ मुठीत ठेवणे
"ताब्यात ठेवणे."


⇒ मूठमाती देणे
"शेवट करणे."


⇒ मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे
"अशक्य गोष्ट करू पाहणे."


⇒ मिशांना तूप लावणे
"उगीच ऐट करणे."


⇒ बाजार आटोपणे
"सर्वकाही संपणे."


⇒ बाजारच्या भाकरी भाजणे
"दुसऱ्याच्या उठाठेवी करणे."


⇒ बाहुलीप्रमाणे नाचविणे
"आपल्या तंत्राप्रमाणे वागविणे."


⇒ भिडेला बळी पडणे
"आग्रहापुढे मान तुकाविणे."


⇒ भिक घालणे
"जुमानणे."


⇒ भिकेचे डोहाळे लागणे
"दारिद्रीपणाने वागणे."


⇒ मन जाणे
"इच्छा होणे."


⇒ मनात भरणे
"पसंत पडणे."


⇒ मन खाणे
"मनाला टोचणी लागणे."


⇒ मनातल्या मनात जळणे
"जळफळणे."


⇒ मान ताठ ठेवणे
"अभिमानाने जगणे, बोलणे."


⇒ मनात मांडे खाणे
"मनोराज्य करणे."


⇒ मन घालणे
"लक्ष देणे."


⇒ माती करणे
"नाश करणे."


⇒ माशा मारीत बसणे
"कसातरी वेळ घालविणे."


⇒ पाणी मुरणे
"भानगड असणे."


⇒ पाणी दाखविणे
"कर्तबगारीची जाणीव करून देणे."


⇒ कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसणे
"अंदाधुंदी असणे."


⇒ तोंडाला पाणी सुटणे
"आशा उत्पन्न करणे."


⇒ बोलाफुलाची गाठ पडणे
"सहजासहजी एकवेळ येणे."


⇒ बोटे मोडणे
"चडफडणे."


⇒ बारा वाजणे
"नाश करणे."


⇒ बलिदान करणे
"प्राण अर्पण करणे."


⇒ बिमोड करणे
"नायनाट करणे."


⇒ बेभान होणे
"आवेश अनावर होणे."


⇒ पोटात शूळ उठणे
"मत्सर वाटणे."


⇒ पोट बांधणे
"उपाशी राहणे."


⇒ पाठीमागे भुंगा लावणे
"एकसारखा त्रास देणे."


⇒ पायरीला पाय लावणे
"दर्जा सोडून वागणे."


⇒ पराचा कावळा करणे
"एखादी गोष्ट फुगवून सांगणे."


« 1 2 3 4 5 6 7 8 9 10

You May Also Like