प्रसिद्ध मराठी म्हणी भाग ८
⇒ दुवा देणे
"भले म्हणणे."
⇒ दु:ख वेशीला टांगणे
"संकटे लोकांपुढे मांडणे."
⇒ दगाबाजी करणे
"विश्वासघात करणे."
⇒ दुधात साखर पडणे
"आनंदात आणखी आनंदाची भर पडणे."
⇒ दात घशात उतरविणे
"पराभव करणे."
⇒ दगडाखाली हात सापडणे
"अडचणीत येणे."
⇒ दगडाला शेंदूर फासणे
"उगीचच एकाद्याला महत्व देणे."
⇒ दु:खावर डागण्या देणे
"दु:खी माणसाला टोचून बोलणे."
⇒ धूळ चारणे
"मान-भंग करणे."
⇒ धुळीस मिळणे
"नाश होणे."
⇒ धावे दणाणने
"फार भीती वाटणे."
⇒ धाब्यावर बसविणे
"बाजूस सारणे."
⇒ धूळ खात पडणे
"वाया जाणे."
⇒ नाक उंच करून बोलणे
"अभिमानाने बोलणे."
⇒ ताव मारणे
"भरपूर खाणे."
⇒ तोंड सोडणे
"वाटेल तसे बोलणे, उपशब्द बोलणे."
⇒ तोंड वासून पाहणे
"आश्चर्याने पाहणे."
⇒ तोंडाला कुलूप लावणे
"गप्प बसणे."
⇒ तोंडचे पाणी पळणे
"खूप भीती वाटणे."
⇒ तोंडात मारून घेणे
"पश्चाताप होणे."
⇒ तोंड काळे करणे
"निघून जाणे."
⇒ तोंडत शेण घालणे
"समाजात छी: थू होणे."
⇒ तोफेच्या तोंडी देणे
"संकटात लोटणे."
⇒ तोंडघशी पाडणे
"विश्वासघात करणे."
⇒ तुपाच्या आशेने उष्ट खाणे
"फायद्यासाठी अपमान सहन करणे."
⇒ तंबी देणे
"धाक घालणे."
⇒ थंड फराळ करणे
"उपाशी राहणे."
⇒ थैमान घालणे
"धिंगाणा घालणे."
⇒ दात पाडणे
"फजिती करणे."
⇒ टाळूवरून हात फिरवणे
"पूर्ण वाटोळे करणे."
⇒ टाळूवरचे लोणी खाणे
"खरा फायदा उपटणे."
⇒ टक्केटोणपे खाणे
"चांगल्या वाईट अनुभवांनी शहाणे होणे."
⇒ टेंभा मिरविणे
"बडेजाव दाखविणे."
⇒ टिवल्याबावल्या करणे
"कसातरी वेळ घालविणे."
⇒ ठाण मांडणे
"निर्धार करणे."
⇒ डोके खाजाविणे
"युक्ती शोधणे."
⇒ डोके देणे
"धीराने तोंड देणे."
⇒ डोके भडकणे
"संतापणे."
⇒ डोक्यावर बसणे
"फाजील मान देणे."
⇒ डोक्यात भरविणे
"भरीस घालणे."
⇒ डोळ्यावर धूर येणे
"सत्तेचा अगर संपत्तीचा गर्व होणे."
⇒ डोळे उघडणे
"पश्चाताप होणे."
Add a Comment