प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning | Mhani in Marathi


प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi Mhani | Mhani in Marathi - Part 9⇒कोंबडे झुंजवणे
"भांडण लावून मजा पाहणे."


⇒काळजाचे पाणी होणे
"अतिशय घाबरणे."


⇒कोंड्याचा मांडा करणे
"आहे त्यातून चांगले निर्माण करणे."


⇒खस्ता खाणे
"कष्ट करावे लागणे."


⇒खडे फोडणे
"व्यर्थ दोष देणे."


⇒खापर फोडणे
"दोष देणे."


⇒खनपटीस बसणे
"एखाद्या गोष्टीच्या मागे सारखे लागणे."


⇒खाल्ल्या घराचे वासे मोजणे
"एखाद्याने केलेले उपकार न स्मरणे."


⇒खिसा गरम करणे
"पैसा मिळवणे."


⇒गय करणे
"अपराध्यास सोडून देणे, क्षमा करणे."


⇒गळ घालणे
"आग्रह धरणे."


⇒गयावया करणे
"काकळूतीस येणे."


⇒गहजब करणे
"फार बोभाटा करणे."


⇒गळ्यातला ताईत होणे
"अत्यंत प्रिय होणे."


⇒ग्रहण सुटणे
"काळजी नाहीसी होणे."


⇒गाढवाचा नांगर फिरवणे
"पूर्ण वाटोळे करणे."


⇒गंगेत घोडे न्हाणे
"काम तडीस जाणे."


⇒गाई पाण्यावर येणे
"रडायला येणे."


⇒घर बसणे
"एखाद्या कुटुंबाचा पूर्ण नाश होणे."


⇒घरावर तुळशीपत्र ठेवणे
"घराची आशा सोडणे."


⇒गुजराण करणे
"कसेतरी पोट भरणे."


⇒घर धुवून नेणे
"घरातील बहुतेक वस्तू नेणे."


⇒घोडे मारणे
"आगळीक करणे."


⇒घोडा मैदान जवळ येणे
"कसोटीची वेळ जवळ येणे."


⇒चटका बसणे
"दु:ख होणे."


⇒चकार शब्द न काढणे
"काहीही न बोलणे."


⇒चटणी होणे
"नाश होणे."


⇒चीज करणे
"सार्थक करणे."


⇒चौदावे रत्न दाखविणे
"खूप मार देणे."


⇒छक्केपंजे करणे
"हातचलाखीने फसवणे."


⇒छाती फाटणे
"भयंकर घाबरणे."


⇒जीवनयात्रा संपणे
"मृत्यू पावणे."


⇒जीव मेटाकुटीस येणे
"फार त्रास होणे.


⇒जीव टांगणे
"काळजीत पडणे."


⇒जिवाचे रान करणे
"खूप कष्ट करणे."


⇒जीभ चावणे
"चापापणे."


⇒जिवाची मुंबई करणे
"चैन करणे."


⇒जीव भांड्यात पडणे
"काळजीतून मुक्त होणे."


⇒जिभेला हाड नसणे
"वाटेल तसे बोलणे."


⇒जीव लावले
"लळा लावणे."


⇒जेरीस आणणे
"शरण यायला भाग पाडणे."


⇒झाडा देणे
"परिणाम भोगणे."


⇒झुंबड उठणे
"गर्दी होणे."


« 1 2 3 4 5 6 7 8 9 10

You May Also Like