Marathi Suvichar | मराठी सुविचार संग्रह | Suvichar in Marathi | Marathi suvichar sangrah

Suvichar Marathi: सुविचार, या शब्दात च विचार येतो आणि जिथे विचारांची गोष्ट येते, तिथे का नाही काही महान लोकांचे विचार वाचायचे… कारण ज्या लोकांनी आयुष्यात काही तरी करून दाखवले आहे, त्यांचे सुविचार आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील, सुविचार वाचल्यानंतर आपल्या मनाला नवी ऊर्जा प्राप्त होते, जे आपल्याला आपली सर्व कामे सकारात्मक उर्जेसह करण्यास प्रवृत्त करते…या लेखात आम्ही सुंदर Marathi Suvichar Collection तुमच्या साठी घेऊन आलो आहोत, जर का तुम्हाला हे Marathi suvichar sangrah आवडले तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की share करा.

We provide Inspiration, Love, Friendship, Shivaji Mararaj, Shayari, SMS, Wallpapers, Image Quotes in Marathi, wishes in marathi & All types of Marathi Suvichar. if you know any other Best Marathi Suvichar then you can email us at marathivarsa@gmail.com to get publish here.

Collection Of Best Marathi Suvichar| सर्वोत्कृष्ट मराठी अनमोल विचारांचा अप्रतिम संग्रह

Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

Motivational Quotes in marathi
Motivational Quotes in Marathi

“कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून
पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच
आपण पुढे जाऊ शकता. ”

“स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”. 👍

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.

प्रयत्न करत राहा कारण
अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.

प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून
गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.

अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.

उत्साह हेच सर्वकाही आहे
फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.👍

अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे.

“मी ‘कोणापेक्षा’ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!”

उठा ! जागृत व्हा !!
जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.

स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.

विचार करण्यासाठी वेळ द्या,
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले
तरी तक्रार करु नका, कारण ‘परमेश्वर’ हा असा दिग्दर्शक आहे
जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.

आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

मनुष्या जवळची नम्रता संपली कि,
त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,
त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे
“लोक काय म्हणतील?”

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.


Inspirational Quotes in Marathi / सर्वोत्तम प्रेरणादायक सुविचार मराठी 👍

देवा तुला किती परीक्षा घ्यायची आहे घे, पण मी जिंकल्याशिवाय
माघार घेणार नाही.

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हाकी तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका
शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे.

फक्त एकदा यशस्वी व्हा मगबघा तुमचा CALL न उचलणारे
हि दररोज CALL करतील.

एकाच प्रकारे विचार करून वेगवेगळे problem सुटत नाहीत
Think differrent.

पैसा हा हुशार माणसाचागुलाम असतो तर
मूर्ख माणसाचा मालक.

आलेले अपयश विसरा, येणाऱ्या यशावर
लक्ष केंद्रित करा!

मी नंतर करेल अस कोणताच श्रीमंत
व्यक्ती म्हणत नाही.

जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर,
हरायचा प्रश्नच येत नाही.
लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत त्यांना
जिंकून दाखवा.

प्रत्येक समस्येच्या आत
एक संधी आहे…

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची
वाट पाहत असतात.

जिंकणारे जिंकण्यासाठी खूप
वेळा हरलेले असतात.

ज्याला हरायची भीती आहे तो माणूस
कधीच जिंकू नाही शकत.

एक विजेता तोच हरणारा असतो ज्याने अजून एकदा
प्रयत्न केलेला असतो.

विजय मिळवण्याआधीतुम्ही स्वत:ला विजेता
म्हणून पाहिलं पाहिजे…

आपण जिंकणारच याच विचाराने
कामाला सुरवात करा.

प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकनारे
प्रयत्न सोडत नाही…

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक
गोष्ट वेगळेपणाने करतात.

लढायला शिका म्हणजे
गुलामीची वेळ येत नाही.

आपली वेळ आपल्याच हातात असते काटे तर
फक्त घड्याळाचे फिरतात.

मोठी साम्राज्य फक्त मेहनतीनेच स्थापित होतात,
कारणांनी नाही !!!

भूतकाळाचे कैदी बनूनका, भविष्याचे
निर्माते बना.

कारण देण्यापेक्षा झालेल्या चूका मान्य
करायला शिका.

माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त
विचाराने थकतो…

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली
पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

काही स्वप्न वयावरनाही तर जिद्दी वर
अवलंबून असतात.

जगायचं असेलतर स्वत:च वर्चस्व
निर्माण करा.

सगळ्यात मोठा सूड म्हणजे
प्रचंड यश.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

रिस्क घेणेच सगळ्यात मोठी
सुरुवात असते!

माघार घेणे आणि कारणे देणे बंद करा
यश तुमच्या सोबत असेल.

“दहा गोष्टींमध्ये “सामान्य” राहण्यापेक्षा एकाच गोष्टींमध्ये
“महान” बना.”

मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्या माणसाला
छोटा समजत नाही!

तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची
गरज लक्षात येईल.

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो कारण जंगलात
निवडणूक होतं नाहीत.


Motivational quotes in Marathi / Marathi Quotes Collection

लक्षात ठेवा काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे
तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

दुबळे लोक बदल घेतात बलवान माफ करतात
तर बुद्धिमान दुर्लक्ष करतात.

जीवन कितीही कठीण असले तरी
त्यामध्ये करण्यासारखे नेहमीच काहीतरी असते
ज्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते
त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते.

खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा
जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.

लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना
तिथून आपली सुरु झाली पाहिजे.

या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल तर
एकच मार्ग नेहमी बाकींच्यांपेक्षा दोन पाऊले पुढे राहायचं.

एक वेळ स्वतःची झोप कमी केलेली चालेल
पण स्वप्न कमी करू नका.

सगळ्याच गोष्टींमध्ये average बनण्यापेक्षा
एकाच कोणत्यातरी गोष्टीत master बना

इतिहास वाचण्याची नव्हे तर
इतिहास रचण्याची स्वप्ने पहा.

पिढीजात मिळालेला संपत्तीचा नव्हे तर
स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा गर्व असावा.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील
तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण
देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात.
तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.

पंखा वरती ठेव विश्वास घे भरारी झोकात
कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात.

हिम्मत एवढी मोठी ठेवा कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.

फक्त एकदा यशस्वी व्हा
मग बघा तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.

महत्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने
कोणत्या दिशेला चाललोय याला असत.

नशीबही हरायला तयार आहे फक्त
तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे.

कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.

खेळ असा दाखवा कि जिंकता आलं नाही
तरी आपली छाप सोडता आली पाहिजे.

मेहनतीच्या काळात कुणावर अवलंबून राहू नका
म्हणजे परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही.

तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असती तर
सगळे रात्रभर जागून त्याचीच वाट बघत असते ना.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे
हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

इज्जत मागून मिळत नाही तर ती कमवावी लागते
आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.

आयुष्य मगरीसारखं जगायचं
जेव्हा perfect झडप मारायची
असेल तेव्हाच हालचाल करायची.

देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातलं आहे
पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल!

दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःच साम्राज्य
तयार करून दुसर्यांना कामाला ठेवायचं.

स्वप्न मोठं ठेवा income
आपोआप मोठा होईल.

चार पैसे कमी कमवा पण आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे असं काहीतरी करा.

तुला हफ्त्याच्या शेवटी पार्टी करायची असते
म्हणून तू पैसे जमा करतोस आणि
मला माझं साम्राज्य उभा करायचंय
म्हणून मी पैसे जमा करतोय.

श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक विचार पण करू शकणार नाहीत.

आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील
त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे सामर्थ्य
तुमच्या मनगटात ठेवा!

जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते
तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरु करण्याची.

हजार लोकांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी
999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत.

तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत
आता मेहनत करा किंवा नंतर पच्छाताप करा.

प्रॅक्टिस अशी करा जस काय तुम्ही कधीच जिंकलात नाहीस
आणि परफॉर्मन्स असा द्या कि जस काही तुम्ही कधी हरलेच नाही.

एक वेळेस दहा काम करण्यापेक्षा
दहा वेळेस एकच काम करा
यश नक्कीच तुमच्या हातात येईल.

जगाला आवडेल ते कराल तर एक product म्हणून राहाल
आणि स्वतःला आवडेल ते कराल तर साला एक brand म्हणून जगाल.

जर तुम्हाला पाहून एखादी मुलगी रस्ता बदलत असेल
तर तुमच्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही.

जे काय कराचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा
कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही.


 Quotes on Life in Marathi | Whatsapp status on life in Marathi

जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.

जीवन म्हणजे काय?
कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही
तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे
पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.

जीवनात एकदा तरी
“वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
“चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.

जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे….
मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.

आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य,
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान
या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.👍

आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो
की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.

आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.

आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात.

“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.

कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात
तर ते दुर पळतात.

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून,
अनुभवातुन शिकण्यात आहे.

छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

जखम आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले

जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.

“जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती
आपला आत्मविश्वास आहे.”

“बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल…
टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्या शिवाय…
भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.”

“माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतो
माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो
कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.”

“अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. “

“आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका,
नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल.”

“आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते,
पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते.”

आयुष्यात दुखः कवटाळून बसू नका ते विसरा आणि सदैव हसत रहा.”

“आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.”

“तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.”

“जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.”

सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’ म्हणजे “तडजोड”

“जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वत: झिजा आणि इतरांना गंध द्या.”

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे,
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.

आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय,
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.

माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते,
व्हा जीवन जगण्याची कला कळते.

“प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचा आहे.”

“माणूस म्हणतो, पैसा आला कि मी काही तरी करेन,
पैसा म्हणतो तू काही तरी कर मगच मी येईन.”

“विचार श्रेष्ठ आणि शुध्द असतील
तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही.”

“वाचण्यासारख काही तरी लिहा,
किंवा ज्यावर लिहल जाईल अस काही तरी करा.”

“परिस्थिती गरीब असली तरी चालेल,
पण विचार भिकारी नसावेत.”

“आपल्या माणसांसोबत वेळ कळत नाही,
पण वेळेसोबत आपली माणस नक्कीच कळतात.”

“आपल्याला पाहिजे ते देव कधीच देत नसतो
आपल्यासाठी जे आवश्यक असते ते देव आपल्याला देत असतो.”

“हरलात तरी चालेल फक्त जिंकनाऱ्याने म्हटलं पाहिजे
हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.”


Educational Quotes in Marathi / शैक्षणिक सुविचार मराठी

पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा
दुसरा आनंद नाही.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत
डोकावून पाहण्याची संधी!

ज्ञान ही माहिती नसून ते परिवर्तन आहे.

सोन्याची किंमत होईल पण शिक्षण हे अमूल्य आहे.

शिक्षण हे खूप शक्तीशाली हत्यार आहे,
तुम्ही त्याने जग बदलू शकता.

शिक्षण ही चावी आहे
स्वातंत्र्याचे दरवाजे उघडण्याची.

चांगल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील
सर्वोत्तम बाहेर कसे आणावे हे माहिती असत.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
जो पियेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

शिक्षण म्हणजे केवळ डिग्रीचा कागद असतो,
पण खरं शिक्षण तर तुमच्या माणुसकीतून दिसत.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

शिक्षण ही ती कुऱ्हाड आहे जे अज्ञानाचे
जंगल तोडण्यास आपले सहकार्य करते.

शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे
तर बुद्धीला सत्याकडे
भावनेला माणुसकीकडे
शरीराला श्रमाकडे नेण्याचा
मार्ग म्हणजे शिक्षण.

सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा.

ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल.

शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे
आणि हृदयाला भावनेकडे वळविणे
म्हणजे शिक्षण होय.

शिकण्याची आवड निर्माण करा आपण असे केल्यास
एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल!

ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.

शिक्षक केवळ यशाचा मार्ग दर्शवू शकतो,
परंतु आपल्याला त्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.

यश साजरा करणे चांगले आहे,
परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे.


Love quotes in Marathi | प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार

स्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.💕

मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच आहे.💕

मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं कारण मी
थोडंस जरी रडलो ना तर घरचे हवं ते आणून द्यायचे.💕

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.💕

छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच Couples भांडतात
जे एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेमकरतात…💕

खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता..💕

प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट……
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.💕

देवाने मला माझा आयुष्यात आनंदी
राहण्यासाठी दिलेल बक्षीस आहेस तू…..💕

आपल्या GF ला MOVIE बघायला तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून जेजुरी ला घेऊन जायचं आहे.💕

कधी कधी असा विचार येतो की,
चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला.😘💕

का कोणास ठाऊक पण एवढं मात्र नक्की आहे
की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी ‘होय’ लपलेलं आहे.💕

प्रेम करा एकासोबतच करा आणि
आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक रहा.💕

प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग करणे महत्वाचे नाही,
कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी.💕

खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त
मज्जा तर तुझ्यासोबत भांडण्यात येते.💕

खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा समोरची
व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!💕

लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो
त्यांना कसं सांगू मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.💕

नको माधुरी दिक्षित नको जुही चावला..
तु हो म्हणलीसं की मला देवचं पावला…

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.💕

एकमेकांची चूक विसरून
एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम…💕

प्रेमात प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे,
शारीरिक संबंधासाठी प्रेम नसावं…💕

राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.👩‍❤‍👩

कुणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं प्रेम…💕

जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते
फक्त तीच व्यक्ती तुम्हाला
वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल
बाकी दुनिया फक्त मजा घेईल.💕

💕Crush, Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते.💕

त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका
जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या
सवयी बदलतो
तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि
तुमच्यासाठी खूप Serious असतो.💕

सगळ्या गोष्टी Limit मध्ये आवडतात
पण तुच एक आहेस की Unlimited आवडतोस…💕

Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची गरज नसते हो…
गरज असते ती प्रेम, विश्वास आणि Respect ची.💕

बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त हसत बोलण्याचा असतो…
बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला प्रेम समजून बसतात.💕

खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये
दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात.💕

मनातलं बोलायला धाडस लागत पण
न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या
प्रेमात पडाव लागत..💕

आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं
असेल तर लाइफ बनते अणि खोटं
असेल तर अनुभव मिळतो….💕

तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे
हे माहित नाही…
पण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस
तेव्हा खरंच मला करमत नाही.💕

मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक
एवढाच की…
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने
कधी रडवले नाही. 💕

आता तर सवय झाली आहे तुझ्या वागण्याची
तू त्रास दिलास तरी चेहऱ्यावर SMILE चं येते.💕

तसं तर मी कोणाला Follow पण करत नाही
पण तुझ्या नजरेनं मला नोकर बनवलं आहे.💕

खडूस किती वेळा सांगू तुला
साडी घातल्यावर केस मोकळे
नको सोडत जाऊस
Heart Attack आला तर मरेल ना मी..💕

खूप प्रेम आहे तुझ्यावर प्लीज
कदी बदलू नको सहन नाही होणार.💕

जर दोघे मनापासून खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना
कोणीच अडवू शकत नाही मग ती जात असो किंवा घरचे.💕

‘तुझं माझं प्रेम लाईव बिलासारखं आहे
दिवसेंदिवस वाढतच चाललंया.💕

किती Lucky असतं ना ते Couples
ज्यांना आपल Future
काय आहे माहीत असत तरी ते
एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात.💕

चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम होत नाही,
त्यासाठी जाणीव असावी लागते प्रेमाची.💕

खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला
तुझा समोर झुकायला कमीपणा नाही गं वाटत मला..💕

मी बोललेला शब्द तुझा मनाला लागला आहे
का तुझ मन कोणामध्ये लागल आहे.💕

खडूस तू समोर दिसलीस की,
फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं.💕

तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल…..💕

हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा,
डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात.💕

झोप उडवून मला म्हणते झोप आता उदया बोलू
तुच सांग मला आता मी उद्या पर्यंत काय करु.

प्रेम असेल तर राग येणारच कारण
राग हा हक्काच्या माणसावरच येतो.💕

चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही समजू शकेल,
जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत राहण्याचं कारण ओळखेल.


Aai baba Marathi Suvichar Quotes Status / आई-बाबा सुविचार

‘आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलतं
तरीही आई वडील गुरू यांच्या
आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा”..

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.

आयुष्यात आई आणि वडील यांना
कधीच विसरु नका.

जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे
सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण
मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे.

आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली, बाबानी शब्दांचा अर्थ समजवला,
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली, बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे.

एका आठवड्याचे ‘सात’ वारअसतात.
‘आठवा’ वार आहे “परिवार”,
तो ठिक असेल तर सातहीवार ‘सुखाचे’ जातील!!

हजारो माणसे मिळतील आयुष्यात
पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे
आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा…. पण,
कोणत्याही गोष्टीसाठी, आई-वडिलांना सोडू नका….

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा
लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
….तो एक बाप असतो…..

आई कोणिच नाही ग येथे आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ आसरा मनाला देणार
मायेन रोज कुशित घेऊन झोपणार

मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!

आई”म्हणजे भेटीला आलेला देव,
“पत्नी”म्हणजे देवाने दिलेली भेट आणि
”मित्र”म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट….

आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!

!! आईच्या !! गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली मिठी
हा तिच्यासाठी नॆकलॆस पॆक्शाही मॊठा दागिणा आह

आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।

जीवनात दोनच गोष्टी मागा
आई शिवाय घर नको आणि
कोणतीही आई बेघर नको

लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो
आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत म्हणून
भावंडाबरोबर भांडत असतो

आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही
आणि तिच्यासारखा खंभीर पाठीराखा कोणी नाही

आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते

नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा
जिने तुम्हाला जन्म दिला आणि
जिने फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय

पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो
पण एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुसंकृत होते

वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत,
पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असत

वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या
‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला जोडण्यासाठी
‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो

तुमच चांगल व्हाव अस
फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत.

स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला ‘आई म्हणतात.,
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला ‘बाप म्हणतात.🍁

आईच्या ममतेचा आणि
बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही..

संघर्ष हा वडीलाकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे।
बाकी सगळं दुनिया शिकवते!

विश्वास बापावर ठेवा
आणि प्रेम आईवर करा
ना कधी धोका भेटेल
ना कधी मन तुटेल…

ज्याला आईबापाच्या
कष्टाची जाणीव असते ना
तो कधीच वाईट मार्गाला
जात नाही….

आयुष्याच्या लढाईत ‘बाबा’ नावाची ‘तलवार’
आणि ‘आई’ नावाची ‘ढाल’
सोबत असली की ‘संघर्षाला’
सहज हरवता येते.🍁


Leave a Comment