बेस्ट मराठी विनोद । Best Marathi Vinod


गण्या च्या गर्लफ्रेंड ने त्याला पत्र लिहले, माज्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे.
"तो तुज़्यापेक्षा चांगला आहे , मी त्याची पत्त्नी बनणार आहे,
मी तुला दिलेला, माजा फोटो मला परत दे".

गण्या नी आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडच्या ३० फ़ोटोज़ जमा केल्या,
त्यामधे तिचा फोटो ...ठेउन तिला पत्र लिहले.

"या फोटो मधून तुजा फोटो काढून घे, मला तुजा चेहरा आठवत नाही .....

डॉक्टर संताला तुमची किडणी फेल झाली आहे.
संता आधी खुप रडतो नंतर डोळे पुसत
.
.
.
.
कीती मार्कांनी......

पक्या बाईक वरून एका मुलीला बघत जात असतो....

तेवढ्यात बाईक वरून तो पडतो....

तेवढ्यात ती मुलगी हसू लागते आणि बोलते, समोर बघून चालवायला काय होत...

पक्या उठतो आणि बोलतो, "आग ए म्हशे, हि हि हि हि काय करते...
माझी बाईक वरून उतरायची स्टाइल आहे ती...."

संता, बंता, कांता....तीघ बेड वर झोपले असतात....

खूप अडचण होत असते म्हणून बंता उठून खाली जमिनीवर झोपायला जातो...

संता उठतो आणि म्हणतो,
''अरे मित्र बंता, ये रे वर, आता जागा झालीये.......'' :D :

कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात....त्यांना भेटायचं असतं...

मुलगी: पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये...
मुलगी नाणं खाली फेकते..... पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो...
मुलगी: एवढा उशीर का केलास???

मुलगा: मी ते नाणं शोधत होतो....पण सापडलच नाही.
मुलगी: अरे मूर्खा....सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं...मी घेतलं ते ओढून :P

एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..

भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई बाबा उठतील..

पोरगा: इतक्या रात्री कोण जागं असणार आहे?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते..
"बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या ...:)

एक अनोळखी कॉल

तो: हे तुला bf आहे का ??
ती: हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो: मी तुझा भाऊ बोलतोय ....वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे

थोड्या वेळानंतर आणखीन एक अनोळखी कॉल

तो: हे तुला bf आहे का ??
ती: नाही नाही मला नाहीये...:x
तो: मी तुझा bf बोलतोय...तू आज माझ हृदय तोडलीस...
ती: नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ....
मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय

तो: आता पकडली गेलीस ....मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो

बाई शाळेत शिकवत होत्या..

बाई – एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता..
(मध्येच चिंगी ओरडली) – बाई !! हा चम्या माझा टिफिन उघडतोय..
बाई – चम्या !!!

मार खाशील परत असं केलंस तर....बरं तर मी कुठे होते?

चम्या – अकबर च्या पलंगावर.....

विचार करा तुम्ही कॉम्पुटर समोर बसलाआहात,
तर कॉम्पुटर काय विचार करत असेल, तुम्हाला माहित आहे..?

...."INTEL INSIDE AND MENTAL OUTSIDE"
हा हा हा!!!

थांबा हसू नका अजून विनोद संपला नाही.
समजा तुम्ही फ्रीज समोर उभे आहात
तर फ्रीज काय विचार करत असेल तुम्हाला माहित आहे..?
...."COOL INSIDE AND FOOL OUTSIDE"
आता हसा..

एखाद्या मुलीचं हृदय किंवा मन केव्हा तुटतं ???

सांगा सांगा...

जेव्हा सेम तिच्यासारखा ड्रेस तिच्याच
एरिया मधल्या कामवालीने घातलेला ती बघते..

झंप्याची बायको - कुठे आहेस रे?

झंप्या: अगं तुला त्या ज्वेलर चं दुकान आठवतं?

ज्या दुकानातला एक डायमंड नेकलेस तुला आवडला होता
आणि मी बोललो होतो कि एक दिवस तुला हा हार नक्की घेऊन देईन..

झंप्याची बायको (अफाट खुश होऊन) - हो हो जान !! आठवतं ना...

झंप्या: बस त्या दुकानासमोर सामोसे खातोय..येतो १० मिनिटात...:P

शिक्षिका: चल बंडू, ह्या नकाशामध्ये "अमेरिका" कुठे आहे दाखव....

बंडू उभा राहतो आणि नकाशात बोट दाखवून म्हणतो, "हे बघा अमेरिका.."

शिक्षिका: शाबास बंडू, मुलांनो आता सांगा, अमेरिकेचा शोध कोणी लावला???
.
.
.
.
सर्व जन एकदम ओरडतात, "बंडूने...." :D :D

मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर
मंग्या ने आपल्या मनातील भाव अश्या प्रकारे व्यक्त केले.
.
.
.
.
" चेहरा तुझा खास नाही, शरीरावर तुझ्या मांस नाही,
प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत पण
जगण्याची तुझी आस नाही "

विशाल: साहेब मला दुपारनंतर सुट्टी पाहिजे होती..

साहेब: बिलकुल मिळणार नाही..कशाला हवी नेहमी नेहमी सुट्टी ?

विशाल: साहेब बायको माहेरहून परत येत आहे...तिला घ्यायला बस स्टोप लं जायचय..

साहेब: अरेरे...अगोदर सांगायचे ना, असं कर तू उद्या पण येवू नको...
इतक्या दुखा:त तुला त्रास देणं योग्य दिसत नाही.

चंप्या एकदा बस मध्ये दरवाज्याजवळ उभा होता. तिकडे बस कंडक्टर आला.

बस कंडक्टर: तू दरवाज्याजवळ का उभा आहेस........??
तुझे वडील काय वाचम्यान आहे का ??
.
.
.
.
चंप्या: कंडक्टर महाशय, तुम्ही नेहमी चिल्लर का मागत असता......?
तुमचे वडील काय भिकारी आहेत?

चंप्या रॉक्स.. कंडक्टर शॉक्स..!!

मास्तर: शून्या पेक्षा लहान संख्या कोणती?

बंडया: टींब.

मास्तर वारले काल

एका कंजुस माणसाला इलेक्ट्रीक शॉक बसतो...

त्याची बायको: तुम्ही ठीक तर आहे ना?

कंजुस: मी ठीक आहे, तु आधी मीटर बघ, कीती unit वाढले.......

झम्प्या: कुठे चाल्लिस?

झंपि: जीव द्यायला

झम्प्या: मग एवढा मेक अप करून

झंपि: मग काय उद्या पेपरात फोटो नाही का येणार...

संता ने मोबाईल चा टॉवर पहिला....
आणि त्यावर पेटनारी लाल लाईट त्याने पहिली.....


बाजुच्याला म्हणाला: खरच इंडिया पुढे जात आहे...
विमानांसाठी पण ट्राफिक सिग्नल लावलेत...

एक माणूस फुल्ल दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो
त्याला वाटते बायको आता रागवणार म्हनून तो बायको साठी
फुले घेऊन यायचे ठरवतो ..तो दरवाजा वाजवतो.

बायको: कोण आहे ?

नवरा: अग मी आहे. मी एका सुंदरीसाठी फुले आणले आहे..

बायको खुश होऊन दरवाजा उघडते आणि विचारते: फुले कुठेत
.

.
.
.
.
नवरा : सुंदरी कुठे ..?

​ चम्प्याच्या शाळेत फोटोसेशन होणार होतं..
त्यासाठी त्याच्या टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या..

"हे बघा.. उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं..
म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटो कडे बघाल.. तेव्हा म्हणाल..

'तो बघा झंप्या.. आता डॉक्टर झालाय..;

ती बघा चिंगी.. आता हेरोईन झालीये..'..."चम्प्या मध्येच बोलला,

"त्या बघा टीचर.. आता देवाघरी गेल्या..

आई: बाळा, तू हात धुतलेस, तर एक लाडू देईन...
आणि पाय धुतलेस तर दोन लाडू देईन!!

गंपू: आई, तू डबाच खाली काढून ठेव, मी आंघोळ करून येतो!!! :

एकदा ऑफिसमध्ये झंप्याने चुकून बॉसच्या केबिनमध्ये फोन लावला.

झंप्या: ए...दोन मिनिटांत माझ्या टेबलवर कॉफी आणि बिस्कीटचा पुडा पाठवून दे.
बॉस: (चिडून) व्हॉट नॉनसेन्स...तुम्हाला माहितीय का तुम्ही कुणाशी बोलताय ते?

झंप्या: नाही.
बॉस: मी या ऑफिसचा बॉस बोलतोय.

झंप्या: पण, तुम्हाला माहितीय का तुम्ही कुणाशी बोलताय ते?
बॉस: नाही.

झंप्या: थँक गॉड...बाय.... फोन कट..

गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....

गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....
मला घरी यायला वेळ लागेल...

गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....
दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..

सगळे सापडले...


मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो......

स्त्री प्रवासी - कंडक्टर दिड टिकीट द्या
कंडक्टर - ते कसे..?

स्त्री प्रवासी - माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे
कंडक्टर - तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील
स्त्री प्रवासी - ते कसे..?

कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे आणि
तुम्ही दीड शहाण्या आहे म्हणुन असे एकुण दोन फुल......

एक माणूस नागडा जंगलात फिरत असतो....

हत्ती चा कळप त्याच्या समोर अचानक येतो....
सर्व हत्ती हसू लागतात, माणूस बोलतो, "का रे हसताय??"

१ हत्ती म्हणतो, "तुला सोंड खाली आहे..... ती पण एवढूशी....."

गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो
आणि विचारतो तुला आई ओरडत नाही का?
ती मुलगी: हो,


आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून...!!

मुलगा देवाला

मुलगा: देवा.. भारत ते अमेरीका रोङ बनव ना..
देव: (थोङा विचार करुन) नाही रे मुला..
नाही जमनार खुप म्हणजे खुप अवघङ आहे. दुसरं काही माग.

मुलगा: (थोङा विचार करुन) ठिक आहे...मग मुलींना अस बनव की...
त्या एकाच boyfriend बरोबर सिनसीअर राहतील.

देव: (क्षणाचाही विलंब न लावता)
मुला सांग तुला भारत ते अमेरीका रोङ दोन पदरी पाहीजे का चार पदरी पाहीजे?

झंप्याच्या डाईनिंग रूम मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप ३ तास झाले संपेना तेंव्हा...

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो
तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो....

. कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही
आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत

मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?

मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply
देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?

मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस?
मुलगी: ३४ चा, आणि तू ?

मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला....!!!!

एक ६ फूट उंच पहिलवान माणूसबस मधून जात असतो.
कंडक्टर: भाऊ साहेब तिकीट घेता ना ?

पहिलवान: मी तिकीट नाही घेत कधी.........
कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली
कि त्याने जिम जॉईन केली..

असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची
पण बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..

दुसर्या दिवशी..
कंडक्टर:- भाऊ तिकीट घ्या ..

पहिलवान: नाही

कंडक्टर: तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?

पहिलवान: पास आहे माझ्याकडे..

एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले
अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने??

पहिली मुंगी म्हणाली:- अगं हॉस्पिटलला चाललेय......

दुसरी मुंगी: का काय झालंय??

पहिली मुंगी: अगं हत्तीदादा आजारी आहेत ना.
त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते.....

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.

बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
नवरा: काय झालं? काय झालं?

बायको: काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.
आधी गोळी घ्या न मग झोपा.

आजचा उपदेश:

जर कोनी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला, तर...
.
.
.
.
आपन पन त्याला दाखवुन द्यायच,
की दरवाज्याला"दोन" कड्या असतात...


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7 8

You May Also Like

Add a Comment