Family Jokes in Marathi | फॅमिली मराठी जोक्स

Family Jokes in Marathi | फॅमिली मराठी जोक्स

family jokes in Marathi family jokes in MarathiIf you Looking for Family Jokes in Marathi then you have come to the right website. In this article we have shared all 250+ Family Marathi Jokes in Marathi.

पप्पा – आज चिकन आणलाय पण लिंबू नाही…
.
.
.
.
.
झम्प्या: जाऊ द्या न आता,नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन


पूजा ने चहा सोबत खाल्ली मस्का खारी वाह वाह
पूजा ने चहा सोबत खाल्ली मस्का खारी
.
.
.
.
.
आणि म्हणते कशी आपला हात भारी,
आपली लात भारी, च्यामायला आपलं सगळंच लई भारी


दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले.

बाबा- “वेटर एक बियर🍻 और एक आईसक्रीम🍧 लाओ!!”

मुलगा – “आईसक्रीम का बाबा..??
तुम्ही पण बियर घ्या ना..”

बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?


कड़क जोक

मी: hey dad wassup??
पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?

मी: ok ठीक आहे . मला जरा गरमकेंद्रबिंदु देता का ?
पप्पा: हे काय असत आता ?

मी: hotspot हो पप्पा
पप्पानी spot hot होइपर्यन्त धुतला


सासरेबुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय,

ते जावयाला फोन लावतात,

“काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?”

जावई – “स्वयंपाक करतंय, फोन देऊ का”..


बाप: बाळा , मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे…
ती रूपवतीआहे
भाग्यवती आहै
गुणवती आहै
ज्ञानवती आहै
समज सरस्वती आहै…!

बाळ: पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे


आई: बेटा तु केस का कापत नाही ?

मुलगा: फॅशन आहे आई.
.
.
.
.
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला


पिंकीला बघायला एक मुलगा येतो,

मुलगा: तु दिसायला सुंदर आहेस,

पिंकी: धन्यवाद!

मुलगा: पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची?

आता मात्र आपल्या पिंकीची जाम सटकते,

पिंकी: माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे,

पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची..


आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”

बंड्या: “लिहायला शिकवले.”

आई: “अरे वा छान! काय लिहले?”

बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….”


सैराट मधे पण *मामा* न जिव घेतला…..

बाहुबली मधे पण *मामा* नीच मारले…..

मी विचार करतोय यावर्षी *मामाच्या* घरी जायच की नाय्….


जर तुमचा भाऊ/बहीण सकाळी झोपेतून उठत नसतील
तर सरळ त्याच्या/तिच्या कानात जाऊन बोलायचं…
.
.
.
.
बाबा तुझा मोबाईल चेक करताय बघा तुफान येईल तुफान


बंड्या =पप्पा विजेच्या तारा एवढ्या वर का असतात.

.
.
.
.
वडील: कारण, बायकांनी तारांवर कपडे वाळत घालू नये म्हणून.


#बाबा: #पोरी,मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?

मुलगी: काही नाही.
आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?

बाबा: योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा.
फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!


एका लहान मुलाने त्याच्या बाबांना विचारले,
बाबा सांगा ना ….माझा जन्म कसा झाला ?
.
.
.
.
त्याचे बाबा म्हणतात अरे कार्ट्या तुला किती वेळा सांगितलाय..

तुझा रीतसर जन्म झालेला आहे..
आम्ही तुला कोणत्याही website वरून फुकटात download नाही केले….


मुलगा: तु… मला सांगितले नाही कि,

“तुझ्या अंगात देवी येते ते..”

मुलगी: What??

मुलगा: तुझे केस विस्कटलेले DP बघितला !

मुलगी: नालायका आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो !


सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?

सासूबाई: नको बाई, मला कुठे “सात समुंदर “वर नाचता येतंय


पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे तर

सासू आणि सूनेची जुळली पाहिजे…

संसार सुखाचाच होईल…

मुलगा कशाही परिस्थितीत जुळवून घेतो..बिच्चारा!


एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी घरात बसलेली असते
.
.
शेजारच्या काकू येऊन तिला विचारतात काय ग पुढे काय करणार।
.
.
मुलगी: काय नाही कुकर च्या तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करणार!!


*सूचना*

जर आपण सहकुटुंब शनिवारी-रविवारी कुठे फिरायला गेलात
तर आपले तिथले फोटो फेसबुक व्हाट्सप वर टाकू नये त्यामुळे

जे कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडणं होतात

अखिल भारतीय घरी आराम करणारी संघटना


प्रियकर: प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो


गण्या- आई, मला खुपच थंडी वाजतेय..

आई – मग तुला स्वेटर देऊ का???

-स्वेटर नको,
बाबांना सांगून लग्नाचंच बघ ना.
आईनं पालता घालून तुडवला.


सर्वात कमी शब्दांचा पण अतिशय (हास्य)स्फोटक विनोद…

.
.
सासरे (फोनवर): काय जावईबापू… काय करताय?

जावई: सहन!


सासरे जावयाला समजावत असतात

सासरे: तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई: हो
सासरे: किती?
जावई: आठवड्यातून तीनदा
सासरे: किती वर्ष झाली पितोय?
जावई: 30 वर्ष

सासरे: एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई: 500 रु
सासरे: म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000
हेच पैसे तू fix deposit मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 60,00,000 झाले असते,
एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती जावई: तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे: नाही,अजिबात नाही

जावई: मग तुमची मर्सिडीज कुठे आहे?


एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,

तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते.
आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर….

सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय…

आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत..

सूनबाई, दवाखान्यात


बरं झालं बोर्डच्या रिझल्ट मध्ये Exit poll नाही ते

नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती….


जज: बाई, तुला नक्की मुल किती?

बाई: ७
जज: पहिल्याच नाव?
बाई: बाळू

जज: दुसरा?
बाई: त्याच पण बाळू …..सगळे शांत

जज: तिसरा?
बाई: त्याच पण बाळू …….कोर्टात हशा

जज: चवथा?
बाई: त्याच पण बाळू ….सन्नाटा…जज चिडले

जज: पाचवा?
बाई: त्याच पण बाळू ………सारे अस्वस्थ

जज: सहावा?
बाई: त्याच पण बाळू …जज संतापून लालबुंद…….

जज: आणि सातवा?
बाई: त्याच पण बाळू …….।

जज: सात ही मुलांचे नाव एकच? काय थट्टा आहे का?
बाई: ……लाजत लाजत….ईश्य असं काय?

नाव तेच असल तरीही आडनाव सगळ्यांचं वेगळ वेगळ आहे की!
जज अजुनही कोमात आहेत ….


मुलगा आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळी कडे
पसरलाय त्याची मला पण लागण झालीय.

.
.
.
.
आई बाळा काळजी करु नकोस माझ्याकडे चप्पल नावाचा
अँन्टीव्हायरस आहे ते काम करेल.


एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.

बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!:-


गण्या: आजी, मी पळण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला.
सगळी तयारी पूर्ण झाली फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.

असे म्हणून गण्या आजीच्या पाया पडतो.

आजी: सावकाश पळ रे बाबा!


शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं?

बंड्या: माहीत नाही.

शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते?

बंड्या: शेजारच्यांकडून..


बसमध्ये कनडक्टर: बाई मुलांचं वय किती?????

बाई: धाकटा २ वर्ष, मधला २.५ वर्ष, थोरला ३ वर्ष……..

बस कनडक्टर: बाई वय भले हि कमी सांगा पण गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा……

बाई: मधला जावेचा आहे मुडद्या..


!!!! मराठा मंङळ कॉलेजच्या पालकांसाठी महत्त्वाची सुचना !!!!
सर्व पालकांना विनंती आहे की येत्या १४ फेब्रुवारीला तारखेला
1 – Cake Walk
2 – Friends Corner
3 – LA Camp
4 – KFC
5 – US Pizza
6 – Dominos
एखादी चक्कर मारावी….
कदाचित तुम्हाला तुमच्या होणाऱ्या सुनेची,
किंवा होणाऱ्या जावयाची भेट होऊ शकते…..


सगळ्या जोक्सचा बाप

मुलगा: आई मी अभ्यास करता करता TV बघू का ?

आई: बघ पण चालू नको करू.


बंटी अभ्यास करीत बसलेला असतो..
पाहुणे घरी येतात,

बंटीला विचारतात ” बंटी बाबा घरी आहेत का?”

बंटी” मग मी काय येडा म्हणुन अभ्यासाला बसलोय का?”


मुलगी : मी शेजारच्या पांडूवर प्रेम करते..
आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे..!!!

बाप : धन्यवाद..!!!
माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल..

मुलगी : अहो.. बाबा मी पत्र वाचते आहे..!!!
” बहुतेक.. आई पळाली..!!! ”


आताच्या लेकरांना सर्व आठवणीत ठेवण्यासाठी बदाम वगैरे खाऊ घालतात..

आपला काळ बरा होता दोन रट्ट्यात सगळं आठवत होतं..


सासऱ्याचा चहा पिऊन झाल्यावर सून चहा चा कप न्यायला येते.

कप उचलायला वाकणार तेवढ्यात जोरात पादते
आणि बिचारी लाजून कप न उचलताच किचन मधे पळून जाते.

हे पाहून सासरा सुनेला परत बोलवतो आणि विचारतो

सुनबाई, तुझं इथे काही काम होत कि फक्त पादायलाच आली होतीस


तू सध्या काय करतोयस..?
.
.
.
आणि पुढे काय करणार आहेस..?

.
.
.
असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात,
.
.
.
जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत
आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..!


सारिता सकाळी सकाळी समोरच्या ताईंशी बोलत होती…

“रोज रोज गाय आणि कुत्रा कुठे शोधणार ????

म्हणून रोज सकाळी पहिली पोळी मी खाते आणि शेवटची पोळी यांना टिफिनमध्ये देते …..”


(कुटूंब न्यायालयात )

न्यायाधीश: दोन्ही बाजू नीट तपासून पाहिल्यानंतर
मी तुझ्या बायकोला दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे …

गण्या: खूप खूप धन्यवाद जजसाहेब…
आपण खूप दयाळू आहात .

जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मीदेखील तिला थोडेफार पैसे देत जाईन.. !!!

जज ने हातोडा फेकून मारला


आर्ची ची आई: ये कुठे निघालीस?

आर्ची: परशा कडे
आर्चीची आई: अजुन भुत उतरल नाही का परश्याचे?

आर्ची: आता ग बया बहिरी बिईरी झाली का काय……

म्या परसाकडे चालली हाय

अन तूले परश्या कडे ऐकू येते

मराठीत सांगितलेलं कळत नाही का इग्लिश मध्ये सांगु

*हागाय…… हागाय*


मुलगी : आई राम कदम आले आहेत निवडणुक प्रचाराला..

आई : पहिली तु आत हो..

बाबा : तु पण आत हो ग त्याचा काय भरोसा नाय!!


बायकोच्या शाब्दिक चाबकाचे फटके खात खात…

संसाराची गाडी पळवणा-या सर्व खिल्लारी बैलांना

पोळ्याच्या हार्दिक..हार्दिक शुभेच्या….


सुप्रीम कोर्टाने विवाह बाह्य संबंध गुन्हा नाही म्हणून मान्यता दिली,

तरीही शेजारीण नाही म्हणते.

*हा न्यायालयाचा अपमान आहे, महोदय.*


मुलगा: आई दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेणार

आई: नालायक हे फटाकड्याचं दुकान.नाय मुलिंचे हॉस्टेल आहे

मुलगा: मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत

आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील.


विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला,
‘आई संजयने माझी पाटी फोडली.’

‘कशी फोडली? थांब बघते मी संजयला.’

‘मी त्याच्या डोक्यावर आपटली
आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.’


शेखर: ‘आई, बघ टकला माणूस.’

आई: ‘शांत रहा, तो ऐकेल ना.’

शेखर: ‘काय त्याला हे माहित नाही?’


वडील: बबन, लक्षात ठेव आज गणिताच्या पेपरमधील जेवढी
उत्तरे चुकतील तेवढय़ा छड्या मारेन.

संध्याकाळी बबनला वडील म्हणाले किती प्रश्न चुकले?

बबन: एकपण नाही बाबा. तुमची धमकी मी लक्षात ठेवली.

वडील: याचा अर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली, होय ना?

बबन: नाही बाबा, मी एकही प्रश्न सोडवला नाही.


वडील: अहो डॉक्टर, माझ्या मुलाने पेन खाल्ला आहे, काय करू?

डॉक्टर: काळजी करू नका. मी येईपर्यंत पेन्सिल वापरा. मी येतोच.


वडील: हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास,
मराठीत शून्य, वर्तवणूक वाईट, अक्षर घाणेरडे.

मुलगा: बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे.


वडील (मुलाला): तू मघापासून कोंबडा का झाल आहेस?

मुलगा: बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात ना
की जे काम शाळेत करशील तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून!


वडिल: पप्पू, रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात?

पप्पू: रेल्वे रुळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून.


लाईट बिल खूप जास्त आल्यामुळे चिडून आई पिटूला ओरडत असते ….

.
.
आई: काय रे, एवढं बिल कसं काय आलं? सारखे का लाईट चालू ठेवतोस???

.
.
पिटू: यूँ तो मैं बतलाता नहीं…..
पर अँधेरे से डरता हूँ मैं माँ !!!! तुझे सब है पता है ना माँ ?


रात्री झोपताना,

मॉम म्हणते – गुड नाईट बेबी,
माँ म्हणते – शुभ रात्री बेटा,

आणि … आई म्हणते – चुलीत घाल तो मोबाइल आणि झोप आता.


राजूला हातच्या बळावर घरात घुसताना बघून
कुलकर्णी काका जोरात ओरडले- हे काय करतोयं?

राजू: तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला
तर घरात पाय देखील ठेऊ देणार नाही म्हणून.


राजूच्या शाळेचा पहिला दिवस होता.
त्यामुळे घरी येताच वडिलांनी त्याला विचारले.

वडील: राजू शाळा आवडली का तुला?
राजू: हो

वडील: बाई चांगल्या आहे का?
राजू: हो
वडील: हुशार आहेत का?
राजू: हुशार आहेत की नाहीत कोण जाणे,
पण त्यांना माझ्यापेक्षा बरेच जास्त येते.


राजू: तुम्ही अंधारात स्वाक्षरी करून शकता?

बाबा: बिल्कुल करू शकतो.

राजू: मग माझ्या रिपोर्ट कार्डवर लवकर करून टाका.


मुलाने वडिलांना विचारले

मुलगा: ‘बाबा, तुम्ही अंधारला घाबरता? ‘
बाबा: ‘नाही, बाळा’

मुलगा: ‘ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटास? ‘
बाबा: ‘अजिबात नाही’

मुलगा: ‘शाबास बाबा म्हणजे तुम्ही आई व्यतिरिक्त कोणालाच घाबरत नाही’


मुलगा: बाबा लग्नाला किती खर्च येतो?

बाबा: सांगता येणार नाही,

मुलगा: माझा अंदाज पूर्णपणे चूकला आहे.


मुलगा बापाला: बाबा जशे तुम्ही मला मारतात,
तसे आजोबा पण तुम्हाला मारत होते का?

बाप: हो बेटा, मला पण मारत होते?

मुलगा: मग आता तरी बंद करा हि खानदानी गुंडागर्दी, खूप झालं..!


बाळ: आजोबा, तुम्हाला कोणी बनवल?

आजोबा: देवाने. बरीच वर्षे झालीत.

बाळ: आणि मला?

आजोबा: तुला पण देवानेच बनवल, तीन वर्षांपुर्वी.

बाळ: इतक्या वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना?


बाप: या वेळी नापास झालास तर यापुढे मला
‘बाबा’ म्हणून हाक मारू नकोस चंद्या.

सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,

बाप: काय लागला निकाल?

चंद्या: माफ कर रे रम्या,
तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक..


बंटी: बाबा कायदा आपल्याला एकापेक्षा जास्त लग्न का करू देत नाही?

बाबा: बेटा, मोठा झाल्यावर तुला कळेल की कायदा आपला रक्षक असतो!


पप्पू: मम्मी आपल्या शेजारच्या मावशीची दोन-दोन नावं आहेत काय?

मम्मी: नाही बेटा त्यांचं नाव जया आहे.

पप्पू: पण डॅडी तर त्यांना डार्लिग म्हणत होते.


नन्या: आई आई, मन्या येतोय.
आधी सगळी खेळणी आत ठेवूयात.

आई: का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का?
नन्या: नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!!


दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या
आईपाशी जाऊन मन्यानं तिला लडिवाळपणे विचारलं,
“आई गं, स्वयंपाकघरातील फडताळातल्या डब्यातला एक लाडू खाऊ का मी?”

खा बरं बाळ. भूक लागलीय का तुला?

आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला,
“आई! तू लाडू खायला परवानगी दिलीस,
म्हणून मला किती बरं वाटलं! कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता!”


छोट्या राघूनं विचारलं, “आई, माझी किंमत किती आहे गं?

आई: बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे.

राघू: मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी
सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?


आई: तुझा भाऊ पडला असताना तु त्याला उचलले का नाही?

चिंटू: तु तर सांगितले होतेस की
रस्त्यावर पडलेल्या वस्तू उचलायच्या नाहीत म्हणून.


आई- बिट्टू, तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलस का?
बिट्टू- नाही.

आई- का?
बिट्टू- आई, तुच सांगितलंस ना की
आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून.


आई: बाळू, तू हातोडी घेऊन खेळू नकोस.

बाळू: काळजी करू नकोस.
मी फक्त हातोडी मारतोय आणि खिळा रामूने धरलाय.


आई: बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं.
तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास.

बाळू: आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं,
की फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे.


आई: डॉक्टर साहेब, हा पप्पू कपडे घालण्यासाठी फार त्रास देतो.
कपड्यांमुळे म्हणे खाज सुटते.

डॉक्टर औषध देतात आणि पंधरा दिवसांनी विचारतात- आता कसा आहे मुलगा?

आई: आता बरा आहे पण औषधांनी नव्हे, तर त्याच्या नावामुळे.

डॉक्टर: कसे काय?
आई आम्ही त्याचं नाव सलमान ठेवून दिलं.


आई: का रडतोस?

पिंटू: बाबा पाय घसरून चिखलात पडले.

आई: अरे मग रडतोस का? तुला तर हसायला पाहिजे.

पिंटू: मी अगोदर हसलोच होतो.


आई वडिलानंतर आयुष्यातला दुसरा प्रेरणा देणारा माणुस म्हणजे
.
.
.
.
बसचा कंडक्टर..तो नेहमी म्हणतो “पुढे चला…पुढे चला..थांबु नका”


आई व मुलगी गर्दीत वडिलांपासून दूर झाल्यावर मुलगी रडून म्हणते,
‘आई, आपण हरवलो.’

आई (मुलीला) — ‘नाही आपण तर येथे आहोत. पण पप्पा मात्र हरवलेत.’


आई : बाळा शाळेतून लवकर का आलास?

बाळ : मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठविले.

आई : अरे पण संजयला का मारलेस?

बाळ : मला लवकर घरी याचचे होते म्हणून!!!!


आई: पिंटू तुझा पाय जास्त दुखत असेल तर ही गोळी घे, दुखणं कमी होइल.

पिंटू : अगं आई पण गोळीला कसं माहिती माझा कोणता पाय दुखतो आहे ते.


आई: काय ग, ऐवढ्या उशिरा कुठे गेली होतीस …

चिंगी (लाडात): मंग्याला भेटायला…

आई (वैतागून): अग भवाने, तोंड काळ करशील एक दिवस..


चिंगी: मग काय झाले .. माझ्याकडे फेअर अँड लवली आहे ना..


आई: अरे देवा, मीठ संपलं वाटतं. काय एकेक ताप.
राजू ते ऐकतो

राजू
: अग आई, काळजी करू नकोस. भाजीत टुथपेस्ट टाक ना!

आई: मेल्या, काय वाट्टेल ते सांगू नकोस.

राजू: खोटं नाही सांगत आई,
टीव्हीच्या टुथपेस्टच्या जाहिरातीत सांगत नाहीत का- ‘इसमे नमक है.


बडू: बाबा मला काल रात्री एकस्वप्न पडल.

त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता.
बाबा: अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या .
.
.
.
…..चड्डी फाटेल


आई: अरे राजू, आज उपवास आहे मी तुला साबुदाने
आणायला सांगितले होते आणलेस का?

राजू: आई, तूच म्हणाली होतीस ना की,
उपवासाच्या दिवशी साबुदाने चालतात!

म्हणून मी साबुदाने रस्त्यातच ठेउन आलो.
आता ते मागुन चालत येतील.


गोटया: आई, परी आकाशात उडू शकते?
आई: हो

गोटया: मग आपली रखमा (कामवाली) … का नाही उडत?
आई: ती परी नाही आहे.

गोटया: पण बाबा तर तीला तू नसताना परी म्हणतात.
आई: काय????? मग आता बघच, उद्या सकाळीच उडून जाईल….


वडिलांनी राजूची तलाशी घेतली,
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..

वडिलांनी राजूला बदड बदड बदडले ..
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?

राजू रडत रडत,पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे.


आई: चिंटू काय करतो आहेस??
चिंटू: वाचत आहे .

आई: काय वाचत आहेस
चिंटू: आई तुझ्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस


एक मुलगी चेहर्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवरउभी असते.

तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,

“ए, आती क्या खंडाला?”

… त्यावर मुलगी उत्तरते, “अहो पप्पा…मी आहे”


मुलगा आईला: आई मला रात्रीची झोपच येत नाही …
मला प्रेम तर झालं नसेल ना ?

आई: मेल्या दुपारी तीन तास झोपतोस ते बंद कर
“प्रेम झालंय म्हणे”


मुलगी : पप्पा मि प्रेमात पडलिये.

लव अॅट सेकंड साईट.
पप्पा : सेकंड साईट

मुलगी : हो , पहिल्यांदा बघितलं तेव्हा तो टपरीवर तंबाखू चोळत उभा होता.
पण दुसर्यांदा मी त्याला ऑडीमधून थूंकताना पाहीलं.


मलिंगाची आई : “बाळा, जरा केस कापून ये!”

मलिंगा : “का ग, आई ?”

मलिंगाची आई : “पितळेची भांडी घासायची आहेत, काथ्या संपला आहे!”


पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
.
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात …
.
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून
.
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर …
पप्पू: पण का पप्पा ….

.
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये


वडील: अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव आणि अंडी घेऊन यायचो … मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!


एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत झाडामागे बसला होता.

समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो,

काय रे हीच का आपली संस्कृती?

मुलगा म्हणतो: नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.


मुलगा: बाबा माझ्या वर्गातला एक मुलगा मला gay असं चिडवतो.

बाबा: मग २ सणसणीत कानाखाली दे ना त्याच्या.
.
.
.
.
मुलगा: नको बाबा, तो फ़ार cute आहे!!!!!!!!!!


वडील: लग्नाशिवाय माणूस अपूर्ण असतो.

मुलगा: आणि लग्नानंतर?

वडील: लग्नानंतर तो संपतो!


पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,
” पक्या परिक्षेची तयारी झाली का ?”

पक्या: होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर
आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे.”


बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटी मोठ्याने म्हणाला
.
.
.
.
“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
.
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
.
त्यांच काय झाल ?


मुलगा: बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप: स्वतः उठुन घे…?

मुलगा: प्लीज द्या ना बाबा..
बाप: आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा: थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.


बाप: आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ?? ज्याने माझी मान वर होईल ???

.
.
.
.
मुलगा: एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?


चंप्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील: देवानं दोन पाय कशाला दिलेत!

चंप्या: एक किक् मारायला, न् एक गिअर बदलायला.
.
लय हानला!


बाबा: काल रात्री कुठे होतास?
मुलगा: मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
बाबा: रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
मुलगा: काय???

बाबा: तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या….


कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना, मिळतेच..

गोटू: पप्पा, पप्पा जर मी तुम्हाला सांगितलं की मी पास झालोय तर तुम्हाला कसं वाटेल?

पप्पा: मी आनंदाने वेडा होईल.

गोटू: मला माहीत होतं, म्हणूनच तर घाबरून मी नापास झालोय.


वडील: पास हो किंवा नापास, तुला Bike
मिळणारच…!

मुलगा: नादच खुळा…
वडील: पास झालास तर Pulsar 180 .. college

ला जायला…,
नापास झालास तर M80.. रानात वैरण
आणायला जायला आणि दुध घालायला…!!!


बाप: येवढे कमी मार्क्स ??
दोन कानाखाली लावल्या पाहिजे,,

गण्या: व्हय की बाबा…
चला लवकर
मी तर मास्तरचं घर बी बघुन ठिवलंय


पुर्विचे पुरुष होते बाइलवेडे…

अन आताचे पुरुष मोबाइलवेडे..


अतिशय पाणचट जोक:

गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
या महिन्यात पगार ऐवजी १००”कीस” ( kiss ) पाठवतोय.
.
.
बायकोने उत्तर दिले “तुमचे१०० कीस मिळाले.
हिशोब पाठवते…
.
.
.
दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
.
.
चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
.
.
भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली.
.
.
घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
.
.
तुम्ही काळजी करू नका अजून३०-४० कीस बाकी आहेत,
या महीन्याच भागून जाईल….


बंड्या: बाबा, तुम्ही कधी इजिप्तला गेले आहेत का?

बाबा: नाही ..का?

बंड्या: मग तुम्हाला हि मम्मी कुठे सापडली


बंड्या: आई , पिवळा रंग महाग असतो का ग?

आई : नाही

बंड्या: मग तू शेजारच्या काकूंना सांगत होतीस ना,
हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात.


मुलगी : पप्पा मि प्रेमात पडलिये.

“बाबा,सेक्स म्हणजे काय?”

गण्याच्या ८ वर्षाच्या मुलाने गण्याला विचारले. . . . .

गण्याची अक्षरश: फाटली…..

“हल्लीची पोरे फारच पुढारलेली आहेत !”

असा विचार करून त्याने मुलाला जवळ बसवून योग्य त्या भाषेत सगळे समजावून सांगितले. . . . .

मुलगा – ते सर्व ठीक आहे.

पण या फॉर्ममध्ये एवढे सगळे कसे काय लिहू ? M का F ते सांगा फक्त…….


गण्या घरी खुप ऊशिरा जातो

आई: राञभर कुठे होता?

गण्या: इमोशनल चिञपट पाहिला गेलो होतो “प्यारी माँ”

आई: आत मध्ये तुझे बाबा तुझी वाट बघत आहे…. ते आता तुला अँक्शन चिञपट दाखवतील “ज़ालीम बाप”


लहान मुलगा:- पप्पा, आज संध्याकाळी आपण सर्कस बघायला जाऊया का?

वडील:- नको, मला खूप काम आहे, ऑफिसमध्ये आणि घरीही.

मुलगा:- पप्पा, तिथे मुली छोटे-छोटे कपडे घालून हत्तीवर बसून फिरतात. खूप मज्जा येते.

वडील:- (खुश होऊन) असं आहे का, मग आपण जाऊया ना, तसाही मी बरेच दिवस झाले हत्ती पाहीला नाही..


घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता

त्यात आवड या सदरा मध्ये “स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे” असे लिहीले होते

सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली – “भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे”


सखुबाई: तुझी सून कशी आहे?

बकुबाई: काय सांगू बाई, माझ्या पोराला बैल बनवलं आहे.
माझा पोरगा तिच्यापुढे पाणी भरतो, घर झाडतो, चहा करून देतो आणि मग ती उठते

सखुबाई: आणि जावई कसा आहे?

बकुबाई: जावई देव माणूस आहे…. पाणी भरून देतो, झाडू मारतो, चहा करून देतो.
माझी पोरगी सुखात आहे. जावई भलताच देव माणूस आहे


सासूबाई: अगं सुनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे?

नवीन सुनबाई: मला मैत्रिणीने सांगितले, वाणासाठी जर कोणाला ५ फळं मिळाली नाहीत
तर त्यांनी पूजेसाठी मिक्स जॅम वापरला तरी चालतो

सासूबाई चक्कर येऊन पडल्या… पूजा वही, सोच नायी


 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment