फॅमिली मराठी जोक्स । Family Jokes in Marathi


जज: बाई, तुला नक्की मुल किती?

बाई: ७
जज: पहिल्याच नाव?
बाई: बाळू

जज: दुसरा?
बाई: त्याच पण बाळू .....सगळे शांत

जज: तिसरा?
बाई: त्याच पण बाळू .......कोर्टात हशा

जज: चवथा?
बाई: त्याच पण बाळू ....सन्नाटा...जज चिडले

जज: पाचवा?
बाई: त्याच पण बाळू .........सारे अस्वस्थ

जज: सहावा?
बाई: त्याच पण बाळू ...जज संतापून लालबुंद.......

जज: आणि सातवा?
बाई: त्याच पण बाळू .......।

जज: सात ही मुलांचे नाव एकच? काय थट्टा आहे का?
बाई: ......लाजत लाजत....ईश्य असं काय?

नाव तेच असल तरीही आडनाव सगळ्यांचं वेगळ वेगळ आहे की!
जज अजुनही कोमात आहेत ....

मुलगा आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळी कडे
पसरलाय त्याची मला पण लागण झालीय.

.
.
.
.
आई बाळा काळजी करु नकोस माझ्याकडे चप्पल नावाचा
अँन्टीव्हायरस आहे ते काम करेल.

एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.

बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!:-

गण्या: आजी, मी पळण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला.
सगळी तयारी पूर्ण झाली फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.

असे म्हणून गण्या आजीच्या पाया पडतो.

आजी: सावकाश पळ रे बाबा!

शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं?

बंड्या: माहीत नाही.

शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते?

बंड्या: शेजारच्यांकडून..

बसमध्ये कनडक्टर: बाई मुलांचं वय किती?????

बाई: धाकटा २ वर्ष, मधला २.५ वर्ष, थोरला ३ वर्ष........

बस कनडक्टर: बाई वय भले हि कमी सांगा पण गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा......

बाई: मधला जावेचा आहे मुडद्या..

!!!! मराठा मंङळ कॉलेजच्या पालकांसाठी महत्त्वाची सुचना !!!!
सर्व पालकांना विनंती आहे की येत्या १४ फेब्रुवारीला तारखेला
1 - Cake Walk
2 - Friends Corner
3 - LA Camp
4 - KFC
5 - US Pizza
6 - Dominos
एखादी चक्कर मारावी....
कदाचित तुम्हाला तुमच्या होणाऱ्या सुनेची,
किंवा होणाऱ्या जावयाची भेट होऊ शकते.....!

सगळ्या जोक्सचा बाप

मुलगा: आई मी अभ्यास करता करता TV बघू का ?

आई: बघ पण चालू नको करू.

बंटी अभ्यास करीत बसलेला असतो..
पाहुणे घरी येतात,

बंटीला विचारतात " बंटी बाबा घरी आहेत का?"

बंटी" मग मी काय येडा म्हणुन अभ्यासाला बसलोय का?"

मुलगी : मी शेजारच्या पांडूवर प्रेम करते..
आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे..!!!

बाप : धन्यवाद..!!!
माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल..

मुलगी : अहो.. बाबा मी पत्र वाचते आहे..!!!
" बहुतेक.. आई पळाली..!!! "

आताच्या लेकरांना सर्व आठवणीत ठेवण्यासाठी बदाम वगैरे खाऊ घालतात..

आपला काळ बरा होता दोन रट्ट्यात सगळं आठवत होतं..

सासऱ्याचा चहा पिऊन झाल्यावर सून चहा चा कप न्यायला येते.

कप उचलायला वाकणार तेवढ्यात जोरात पादते
आणि बिचारी लाजून कप न उचलताच किचन मधे पळून जाते.

हे पाहून सासरा सुनेला परत बोलवतो आणि विचारतो

सुनबाई, तुझं इथे काही काम होत कि फक्त पादायलाच आली होतीस

तू सध्या काय करतोयस..?
.
.
.
आणि पुढे काय करणार आहेस..?

.
.
.
असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात,
.
.
.
जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत
आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..!

सारिता सकाळी सकाळी समोरच्या ताईंशी बोलत होती...

"रोज रोज गाय आणि कुत्रा कुठे शोधणार ????

म्हणून रोज सकाळी पहिली पोळी मी खाते आणि शेवटची पोळी यांना टिफिनमध्ये देते ....."

(कुटूंब न्यायालयात )

न्यायाधीश: दोन्ही बाजू नीट तपासून पाहिल्यानंतर
मी तुझ्या बायकोला दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे ...

गण्या: खूप खूप धन्यवाद जजसाहेब...
आपण खूप दयाळू आहात .

जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मीदेखील तिला थोडेफार पैसे देत जाईन.. !!!

जज ने हातोडा फेकून मारला

आर्ची ची आई: ये कुठे निघालीस?

आर्ची: परशा कडे
आर्चीची आई: अजुन भुत उतरल नाही का परश्याचे?

आर्ची: आता ग बया बहिरी बिईरी झाली का काय......

म्या परसाकडे चालली हाय

अन तूले परश्या कडे ऐकू येते

मराठीत सांगितलेलं कळत नाही का इग्लिश मध्ये सांगु

*हागाय...... हागाय*

मुलगी : आई राम कदम आले आहेत निवडणुक प्रचाराला..

आई : पहिली तु आत हो..

बाबा : तु पण आत हो ग त्याचा काय भरोसा नाय!!

बायकोच्या शाब्दिक चाबकाचे फटके खात खात...

संसाराची गाडी पळवणा-या सर्व खिल्लारी बैलांना

पोळ्याच्या हार्दिक..हार्दिक शुभेच्या....

सुप्रीम कोर्टाने विवाह बाह्य संबंध गुन्हा नाही म्हणून मान्यता दिली,

तरीही शेजारीण नाही म्हणते.

*हा न्यायालयाचा अपमान आहे, महोदय.*

​ मुलगा: आई दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेणार

आई: नालायक हे फटाकड्याचं दुकान.नाय मुलिंचे हॉस्टेल आहे

मुलगा: मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत

आई: हो का .. अत्ता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील..

विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला,
'आई संजयने माझी पाटी फोडली.'

'कशी फोडली? थांब बघते मी संजयला.'

'मी त्याच्या डोक्यावर आपटली
आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.'

शेखर: 'आई, बघ टकला माणूस.'

आई: 'शांत रहा, तो ऐकेल ना.'

शेखर: 'काय त्याला हे माहित नाही?'

वडील: बबन, लक्षात ठेव आज गणिताच्या पेपरमधील जेवढी
उत्तरे चुकतील तेवढय़ा छड्या मारेन.

संध्याकाळी बबनला वडील म्हणाले किती प्रश्न चुकले?

बबन: एकपण नाही बाबा. तुमची धमकी मी लक्षात ठेवली.

वडील: याचा अर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली, होय ना?

बबन: नाही बाबा, मी एकही प्रश्न सोडवला नाही.

वडील: अहो डॉक्टर, माझ्या मुलाने पेन खाल्ला आहे, काय करू?

डॉक्टर: काळजी करू नका. मी येईपर्यंत पेन्सिल वापरा. मी येतोच.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment