फॅमिली मराठी जोक्स । Family Jokes in Marathi


वडील: हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास,
मराठीत शून्य, वर्तवणूक वाईट, अक्षर घाणेरडे.

मुलगा: बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे.

वडील (मुलाला): तू मघापासून कोंबडा का झाल आहेस?

मुलगा: बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात ना
की जे काम शाळेत करशील तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून!

वडिल: पप्पू, रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात?

पप्पू: रेल्वे रुळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून.

लाईट बिल खूप जास्त आल्यामुळे चिडून आई पिटूला ओरडत असते ....

.
.
आई: काय रे, एवढं बिल कसं काय आलं? सारखे का लाईट चालू ठेवतोस???

.
.
पिटू: यूँ तो मैं बतलाता नहीं.....
पर अँधेरे से डरता हूँ मैं माँ !!!! तुझे सब है पता है ना माँ ?

रात्री झोपताना,

मॉम म्हणते - गुड नाईट बेबी,
माँ म्हणते - शुभ रात्री बेटा,

आणि ... आई म्हणते - चुलीत घाल तो मोबाइल आणि झोप आता.

राजूला हातच्या बळावर घरात घुसताना बघून
कुलकर्णी काका जोरात ओरडले- हे काय करतोयं?

राजू: तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला
तर घरात पाय देखील ठेऊ देणार नाही म्हणून.

राजूच्या शाळेचा पहिला दिवस होता.
त्यामुळे घरी येताच वडिलांनी त्याला विचारले.

वडील: राजू शाळा आवडली का तुला?
राजू: हो

वडील: बाई चांगल्या आहे का?
राजू: हो
वडील: हुशार आहेत का?
राजू: हुशार आहेत की नाहीत कोण जाणे,
पण त्यांना माझ्यापेक्षा बरेच जास्त येते.

राजू: तुम्ही अंधारात स्वाक्षरी करून शकता?

बाबा: बिल्कुल करू शकतो.

राजू: मग माझ्या रिपोर्ट कार्डवर लवकर करून टाका.

मुलाने वडिलांना विचारले

मुलगा: 'बाबा, तुम्ही अंधारला घाबरता? '
बाबा: 'नाही, बाळा'

मुलगा: 'ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटास? '
बाबा: 'अजिबात नाही'

मुलगा: 'शाबास बाबा म्हणजे तुम्ही आई व्यतिरिक्त कोणालाच घाबरत नाही'

मुलगा: बाबा लग्नाला किती खर्च येतो?

बाबा: सांगता येणार नाही,

मुलगा: माझा अंदाज पूर्णपणे चूकला आहे.

मुलगा बापाला: बाबा जशे तुम्ही मला मारतात,
तसे आजोबा पण तुम्हाला मारत होते का?

बाप: हो बेटा, मला पण मारत होते?

मुलगा: मग आता तरी बंद करा हि खानदानी गुंडागर्दी, खूप झालं..!

बाळ: आजोबा, तुम्हाला कोणी बनवल?

आजोबा: देवाने. बरीच वर्षे झालीत.

बाळ: आणि मला?

आजोबा: तुला पण देवानेच बनवल, तीन वर्षांपुर्वी.

बाळ: इतक्या वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना?

बाप: या वेळी नापास झालास तर यापुढे मला
'बाबा' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.

सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,

बाप: काय लागला निकाल?

चंद्या: माफ कर रे रम्या,
तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...

बंटी: बाबा कायदा आपल्याला एकापेक्षा जास्त लग्न का करू देत नाही?

बाबा: बेटा, मोठा झाल्यावर तुला कळेल की कायदा आपला रक्षक असतो!

पप्पू: मम्मी आपल्या शेजारच्या मावशीची दोन-दोन नावं आहेत काय?

मम्मी: नाही बेटा त्यांचं नाव जया आहे.

पप्पू: पण डॅडी तर त्यांना डार्लिग म्हणत होते.

​ नन्या: आई आई, मन्या येतोय.
आधी सगळी खेळणी आत ठेवूयात.

आई: का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का?
नन्या: नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!!

दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या
आईपाशी जाऊन मन्यानं तिला लडिवाळपणे विचारलं,
"आई गं, स्वयंपाकघरातील फडताळातल्या डब्यातला एक लाडू खाऊ का मी?"

खा बरं बाळ. भूक लागलीय का तुला?

आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला,
"आई! तू लाडू खायला परवानगी दिलीस,
म्हणून मला किती बरं वाटलं! कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता!"

छोट्या राघूनं विचारलं, "आई, माझी किंमत किती आहे गं?

आई: बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे.

राघू: मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी
सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?

आई: तुझा भाऊ पडला असताना तु त्याला उचलले का नाही?

चिंटू: तु तर सांगितले होतेस की
रस्त्यावर पडलेल्या वस्तू उचलायच्या नाहीत म्हणून.

आई- बिट्टू, तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलस का?
बिट्टू- नाही.

आई- का?
बिट्टू- आई, तुच सांगितलंस ना की
आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment