फॅमिली मराठी जोक्स । Family Jokes in Marathi


आई: बाळू, तू हातोडी घेऊन खेळू नकोस.

बाळू: काळजी करू नकोस.
मी फक्त हातोडी मारतोय आणि खिळा रामूने धरलाय.

आई: बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं.
तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास.

बाळू: आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं,
की फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे.

आई: डॉक्टर साहेब, हा पप्पू कपडे घालण्यासाठी फार त्रास देतो.
कपड्यांमुळे म्हणे खाज सुटते.

डॉक्टर औषध देतात आणि पंधरा दिवसांनी विचारतात- आता कसा आहे मुलगा?

आई: आता बरा आहे पण औषधांनी नव्हे, तर त्याच्या नावामुळे.

डॉक्टर: कसे काय?
आई आम्ही त्याचं नाव सलमान ठेवून दिलं.

आई: का रडतोस?

पिंटू: बाबा पाय घसरून चिखलात पडले.

आई: अरे मग रडतोस का? तुला तर हसायला पाहिजे.

पिंटू: मी अगोदर हसलोच होतो.

आई वडिलानंतर आयुष्यातला दुसरा प्रेरणा देणारा माणुस म्हणजे
.
.
.
.
बसचा कंडक्टर..तो नेहमी म्हणतो "पुढे चला...पुढे चला..थांबु नका"

आई व मुलगी गर्दीत वडिलांपासून दूर झाल्यावर मुलगी रडून म्हणते,
'आई, आपण हरवलो.'

आई (मुलीला) -- 'नाही आपण तर येथे आहोत. पण पप्पा मात्र हरवलेत.'

आई : बाळा शाळेतून लवकर का आलास?

बाळ : मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठविले.

आई : अरे पण संजयला का मारलेस?

बाळ : मला लवकर घरी याचचे होते म्हणून!!!!

आई: पिंटू तुझा पाय जास्त दुखत असेल तर ही गोळी घे, दुखणं कमी होइल.

पिंटू : अगं आई पण गोळीला कसं माहिती माझा कोणता पाय दुखतो आहे ते.

आई: काय ग, ऐवढ्या उशिरा कुठे गेली होतीस ...

चिंगी (लाडात): मंग्याला भेटायला...

आई (वैतागून): अग भवाने, तोंड काळ करशील एक दिवस..

...
चिंगी: मग काय झाले .. माझ्याकडे फेअर अँड लवली आहे ना..

आई: अरे देवा, मीठ संपलं वाटतं. काय एकेक ताप.
राजू ते ऐकतो

राजू
: अग आई, काळजी करू नकोस. भाजीत टुथपेस्ट टाक ना!

आई: मेल्या, काय वाट्टेल ते सांगू नकोस.

राजू: खोटं नाही सांगत आई,
टीव्हीच्या टुथपेस्टच्या जाहिरातीत सांगत नाहीत का- ‘इसमे नमक है’

बडू: बाबा मला काल रात्री एकस्वप्न पडल.

त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता.
बाबा: अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या .
.
.
.
.....चड्डी फाटेल

आई: अरे राजू, आज उपवास आहे मी तुला साबुदाने
आणायला सांगितले होते आणलेस का?

राजू: आई, तूच म्हणाली होतीस ना की,
उपवासाच्या दिवशी साबुदाने चालतात!

म्हणून मी साबुदाने रस्त्यातच ठेउन आलो.
आता ते मागुन चालत येतील.

गोटया: आई, परी आकाशात उडू शकते?
आई: हो

गोटया: मग आपली रखमा (कामवाली) ... का नाही उडत?
आई: ती परी नाही आहे.

गोटया: पण बाबा तर तीला तू नसताना परी म्हणतात.
आई: काय????? मग आता बघच, उद्या सकाळीच उडून जाईल....

वडिलांनी राजूची तलाशी घेतली,
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..

वडिलांनी राजूला बदड बदड बदडले ..
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?

राजू रडत रडत,पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे.

आई: चिंटू काय करतो आहेस??
चिंटू: वाचत आहे .

आई: काय वाचत आहेस
चिंटू: आई तुझ्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस

​ एक मुलगी चेहर्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवरउभी असते.

तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,

"ए, आती क्या खंडाला?"

... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे"

मुलगा आईला: आई मला रात्रीची झोपच येत नाही …
मला प्रेम तर झालं नसेल ना ?

आई: मेल्या दुपारी तीन तास झोपतोस ते बंद कर
"प्रेम झालंय म्हणे"

मुलगी : पप्पा मि प्रेमात पडलिये.

लव अॅट सेकंड साईट.
पप्पा : सेकंड साईट

मुलगी : हो , पहिल्यांदा बघितलं तेव्हा तो टपरीवर तंबाखू चोळत उभा होता.
पण दुसर्यांदा मी त्याला ऑडीमधून थूंकताना पाहीलं.

मलिंगाची आई : "बाळा, जरा केस कापून ये!"

मलिंगा : "का ग, आई ?"

मलिंगाची आई : "पितळेची भांडी घासायची आहेत, काथ्या संपला आहे!"

पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
.
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात ...
.
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून
.
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर ...
पप्पू: पण का पप्पा ....

.
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment