फॅमिली मराठी जोक्स । Family Jokes in Marathi


वडील: अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव आणि अंडी घेऊन यायचो ... मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!

एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत झाडामागे बसला होता.

समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो,

काय रे हीच का आपली संस्कृती?

मुलगा म्हणतो: नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.

मुलगा: बाबा माझ्या वर्गातला एक मुलगा मला gay असं चिडवतो.

बाबा: मग २ सणसणीत कानाखाली दे ना त्याच्या.
.
.
.
.
मुलगा: नको बाबा, तो फ़ार cute आहे!!!!!!!!!!

वडील: लग्नाशिवाय माणूस अपूर्ण असतो.

मुलगा: आणि लग्नानंतर?

वडील: लग्नानंतर तो संपतो!

पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले,
" पक्या परिक्षेची तयारी झाली का ?"

पक्या: होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर
आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे."

बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटी मोठ्याने म्हणाला
.
.
.
.
“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
.
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत,
.
त्यांच काय झाल ?

मुलगा: बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप: स्वतः उठुन घे...?

मुलगा: प्लीज द्या ना बाबा..
बाप: आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा: थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.

बाप: आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ?? ज्याने माझी मान वर होईल ???

.
.
.
.
मुलगा: एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?

चंप्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील: देवानं दोन पाय कशाला दिलेत!

चंप्या: एक किक् मारायला, न् एक गिअर बदलायला.
.
लय हानला!

बाबा: काल रात्री कुठे होतास?
मुलगा: मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
बाबा: रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
मुलगा: काय???

बाबा: तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या....

कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना, मिळतेच..

गोटू: पप्पा, पप्पा जर मी तुम्हाला सांगितलं की मी पास झालोय तर तुम्हाला कसं वाटेल?

पप्पा: मी आनंदाने वेडा होईल.

गोटू: मला माहीत होतं, म्हणूनच तर घाबरून मी नापास झालोय.

वडील: पास हो किंवा नापास, तुला Bike
मिळणारच...!

मुलगा: नादच खुळा...
वडील: पास झालास तर Pulsar 180 .. college

ला जायला...,
नापास झालास तर M80.. रानात वैरण
आणायला जायला आणि दुध घालायला...!!!

बाप: येवढे कमी मार्क्स ??
दोन कानाखाली लावल्या पाहिजे,,

गण्या: व्हय की बाबा...
चला लवकर
मी तर मास्तरचं घर बी बघुन ठिवलंय

पुर्विचे पुरुष होते बाइलवेडे...

अन आताचे पुरुष मोबाइलवेडे..

अतिशय पाणचट जोक:

गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
या महिन्यात पगार ऐवजी १००"कीस" ( kiss ) पाठवतोय.
.
.
बायकोने उत्तर दिले "तुमचे१०० कीस मिळाले.
हिशोब पाठवते...
.
.
.
दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
.
.
चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
.
.
भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली.
.
.
घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
.
.
तुम्ही काळजी करू नका अजून३०-४० कीस बाकी आहेत,
या महीन्याच भागून जाईल.......

​ बंड्या: बाबा, तुम्ही कधी इजिप्तला गेले आहेत का?

बाबा: नाही ..का?

बंड्या: मग तुम्हाला हि मम्मी कुठे सापडली

बंड्या: आई , पिवळा रंग महाग असतो का ग?

आई : नाही

बंड्या: मग तू शेजारच्या काकूंना सांगत होतीस ना,
हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात.

मुलगी : पप्पा मि प्रेमात पडलिये.

"बाबा,सेक्स म्हणजे काय?"

गण्याच्या ८ वर्षाच्या मुलाने गण्याला विचारले. . . . .

गण्याची अक्षरश: फाटली.....

"हल्लीची पोरे फारच पुढारलेली आहेत !"

असा विचार करून त्याने मुलाला जवळ बसवून योग्य त्या भाषेत सगळे समजावून सांगितले. . . . .

मुलगा - ते सर्व ठीक आहे.

पण या फॉर्ममध्ये एवढे सगळे कसे काय लिहू ? M का F ते सांगा फक्त.......

गण्या घरी खुप ऊशिरा जातो

आई: राञभर कुठे होता?

गण्या: इमोशनल चिञपट पाहिला गेलो होतो “प्यारी माँ”

आई: आत मध्ये तुझे बाबा तुझी वाट बघत आहे…. ते आता तुला अँक्शन चिञपट दाखवतील “ज़ालीम बाप”

लहान मुलगा:- पप्पा, आज संध्याकाळी आपण सर्कस बघायला जाऊया का?

वडील:- नको, मला खूप काम आहे, ऑफिसमध्ये आणि घरीही.

मुलगा:- पप्पा, तिथे मुली छोटे-छोटे कपडे घालून हत्तीवर बसून फिरतात. खूप मज्जा येते.

वडील:- (खुश होऊन) असं आहे का, मग आपण जाऊया ना, तसाही मी बरेच दिवस झाले हत्ती पाहीला नाही..

घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता

त्यात आवड या सदरा मध्ये “स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे” असे लिहीले होते

सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली – “भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे”

सखुबाई: तुझी सून कशी आहे?

बकुबाई: काय सांगू बाई, माझ्या पोराला बैल बनवलं आहे.
माझा पोरगा तिच्यापुढे पाणी भरतो, घर झाडतो, चहा करून देतो आणि मग ती उठते

सखुबाई: आणि जावई कसा आहे?

बकुबाई: जावई देव माणूस आहे…. पाणी भरून देतो, झाडू मारतो, चहा करून देतो.
माझी पोरगी सुखात आहे. जावई भलताच देव माणूस आहे

सासूबाई: अगं सुनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे?

नवीन सुनबाई: मला मैत्रिणीने सांगितले, वाणासाठी जर कोणाला ५ फळं मिळाली नाहीत
तर त्यांनी पूजेसाठी मिक्स जॅम वापरला तरी चालतो

सासूबाई चक्कर येऊन पडल्या… पूजा वही, सोच नायी


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment