नवरा आणि बायको मराठी विनोद | Husband and Wife Marathi Jokes


ही तर फक्त आपल्या बायकोचीच नाटके असतात राव...

"तुमचा हा दोस्त वाईट आहे...!
तुमचा तो दोस्तच बरोबर नाही...!!"

आपल्याला तर तिच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात बुवा....!!

नवरा बायकोच भांडण होत

बायको : मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा

नवरा : मी चाललो देवळात

बायको : मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी

नवरा : अग वेडे मी नवस फेडायला चाललो

पती फोनवर बायकोला विचारतो: जेवायला काय बनवले आहे?

पत्नी फोनवर चिडून सांगते: विष!
.
.
.
.
पती :- जेवून झोप मला यायला उशीर होणार आहे .

हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर

बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.

नवरा: लग्न करू नको रे बाबा!!!

अरे, तुझी बायको खुप ओरडायची तुला, एवढी शांत कशी झाली ती?

मी एक आईडिया केली..

क़ाय?

मी तिला गुटका खायला शिकविले.. '

बायकोला थोबाडीत मारुन नवरा म्हणाला,---

"पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो".......

बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे
फटके मारुन म्हणाली, "तुम्ही काय समजता,की माझं
तुमच्यावर प्रेम नाही?.......

पुरूष हा लग्नानंतर देखील विद्यार्थीच असतो.

बायकोला वाटतं की....
आई आणि बहिणी शिकवतायं.

तर....
आई आणि बहिणींना वाटतं की बायको शिकवतेय.

नवरा-बायको दोघे हातात हात घालुन समुद्राकाठी फिरत होते..

...अचानक पणे बायकोने नवऱ्याला विचारलं तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो ?

नवर्‍याने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला....
आणि म्हणाला हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत ...

..हे पाहुन बिचाऱ्या समूद्राला पण रडू आलं आणि तो बोलला

कुठुन शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला?

गण्या: तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस?

बंड्या: "गुगल!"

गण्या: का रे?

बंड्या: आयला एक प्रश्न विचारला की "हजार" उत्तरं देते..!

समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न ...

पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत

.
.
.
.
तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कश्या मिळतात?

बायको: जिथे असाल तिथेच थांबा. कुठेही बाहेर पडू नका.
पावसामुळे परीस्थिती खूप बेकार आहे. काळजी वाटते.
सांगितलेल ऐका यावेळी तरी!

नवरा: बरं, बरं!

बायको: बरं, नक्की कुठे आहात तुम्ही आता?

नवरा: माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी. अचानक भेटली. तिने चहाला बोलवलं.

एकदम सन्नाटा

दुसऱ्या सेकंदाला बायको: जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब.
पावसाची कारण मला सांगु नकोस, समजलं ना.

बायको: बंदूक घेऊन दारात का थांबलात.

नवरा: वाघाची शिकार करायला चाललो.

बायको: मग थांबलात का?

नवरा: बाहेर कुत्रा उभा आहे तो गेला की जातो.

पती: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन options आहेत म्हणून,
इथं तर एकच भाजी दिसतेय . . .

पत्नी: ( शांतपणे options दोनच आहेत...

1.खायचं असेल तर खा,
2.नाहीतर बोंबलत जा !!!

अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला "बोटाने" इशारा केला. आणि बोलाऊन घेतले..

.
.
नवरा- काय झालं का बोलावलस??

बायको- काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या "बोटात" किती Power
आहे ते तपासत होते...

गावठी बायको...

नवरा आपल्या बायको ला घेवून हॉटेलमधे जातो.

नवरा: काय खाणार तू...?

बायको : काय पण चालेल...

नवरा: वेटर, अरे एक मेनूकार्ड आण रे...

बायको: अहो दोन मागवा ना, मी पण तेच खाणार...!

बायको: जास्त पिऊ नका लवकर घरी या.

नवरा: तुला कसं कळालं मी प्यायला आलोय ते.

बायको: किचन मधून एक ग्लास चोरीला गेलाय म्हणून..

"प्लास्टिक बंदी.."

आईला 21 वर्ष लागतात मुलाला जेनटल बनवायला आणि

.
.
.
.
बायकोला 21 मिनिट लागतात नवऱ्याला मेंटल बनवायला.

पति-पत्नी एका गच्च गर्दी असलेल्या बस मधून प्रवास करत होते...

योगायोगाने पतीसमोर एक सुंदर स्त्री असते व ते तिला चिटकुन् उभे असतात,
स्वाभाविकपणे हे पाहून पत्नी फार जळत असते !

अचानकपणे ती सूंदर बाई फिरली व तिने पतिदेवाच्या कानाखाली एक जोरदार चपराक लावली!
"लाज नाही वाटत परस्त्रीला चिमटी काढायला!"

बसमधुन उतरल्यावर

पति: खरेच मी नाही ग चिमटा काढला..

पत्नी: अर्थपूर्ण नजरेने पाहत हसत बोलली
"आणखी चिटका ??? चिमटा मीच काढला होता "

बोला पत्नीधर्माचा विजय असो!!

नवरा: अग कुठे चाललीस तू?

बायको: दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते !

नवरा: अग पण मोबाईल घेऊन ?

बायको: मग, बादली भरेपर्यंत काय करू ...............


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment