नवरा आणि बायको मराठी विनोद | Husband and Wife Marathi Jokes


एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली
आणि माणसाला विचारले,”काही आठवते का?”

माणूस: हो, फक्त बायकोचे नाव.

देव हसला अन म्हणाला,
सगळा फॉरमॅट केला पण वायरस गेला नाही

बायको: देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.

नवरा: अरे वा, इतका आवडतो मी तुला?

बायको: तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार?
नवीन माणसाला परत कोण शिकवणार?

एक नवरा साधूकडे जातो

नवरा: बाबा रात्री कधी झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून
तेजाने चमकत असतो, कुठलीतरी अद्भुत किरणे दिसतात,काय करू?

साधू: आरे password टाक मोबाईलला तुझ्या,
येड्या तुझा मोबाईल चेक करते ती………..!!!

सर्वात छोटा जोक

नवरा: मला कविता आवडते
बायको: मलापण विनोद आवडतो

पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते….

बायको (वैतागून): तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय……

पक्क्या: अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते… '

पत्नी: ऐकलं का? पेपरमध्ये बातमी आली आहे.
की एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विकलं?

पती – अरे वा, कितीला?
पत्नी – एका सायकलसाठी त्याने असं केलं.

तुम्ही तर अस नाही ना करणार
पती – मी इतका मूर्ख थोडी आहे. तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन

बायको नवऱ्यासाठी सकाळी गरम दूध घेऊन येते.
नवरा ग्लास घेऊन तोंडाला लावतो आणि एक घोट घेतो.

नवरा: याक … छी … !!! हे कसलं गं दूध ?

बायको: ते काय आहे ना, केसर संपलं आहे
म्हणून मी तुमच्या खिशातील विमल पान मसाला टाकला.

ते टीव्हीवर म्हणतात ना “इसके दाने दाने मे है केसर का दम”

(नवऱ्याने विमल सोडली)

बायको: आहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटते.

नवरा: हा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल?

बायको: आहो मी एक रुपयाचे तीन कांदे आणले.

नवरा: कसे काय?
बायको: एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.

नवरा: मग तिसरा?
बायको: तिसरा त्याने फेकून मारला

नवरा: अग ऐकतेस का, मला जर नगरसेवक केलं तर मी
अख्ख शहर बदलून टाकीन, मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र
बदलून टाकीन आणि पंतप्रधान केलं तर पूर्ण देश बदलून टाकीन. बायको: तुम्हाला कोणी चावलं की काय?
लय बडबडताय. हे बदलीन, ते बदलीन… दारू कमी प्या…
लुंगी समजून माझा परकर घातलाय तो बदला आधी.

बायको: आकाशात चांदणी बघून म्हणते,
“अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण आणू शकत नाही?”

नवरा: शेजारीण …. बायकोने घरात नेऊन लई चोपला.

बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता.

मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं…..
त्याच्या बायकोची बस चुकली होती

बायको : कशी दिसते मी?

नवरा : एकदम Piyanka Chopra सारखी दिसतेस
बायको : खरंच? DON वली कि KRISH वाली?

नवरा : BURFI वाली
मग काय, बायको ने धुतला MARY KOM बनून

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.

channel वर म्हैस दिसते…
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक

बायको: Aiyya…
सासूबाई

बायको:माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.

नवरा: बरं… पण वचन दे, माझी
मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…

बायको: मी ड्राइवरला नौकरी वरुन काढित आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे…

नवरा: Darling Please, त्याला आजुन एक चांस दे ना…

नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.

बायको:एकटीच आली असेल

नवरा: हो तुला कस माहीत?

बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…

बायको: माझी एक अट आहे,
नवरा : काय?

बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,
नवरा: माझी पण एक अट आहे,

बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे…

बायको : आहो ऐकले का?
नवरा : काय?

बायको : या वर्षी हळदी कुंकूला मी बायकांना काय देऊ?
नवरा: माझा नंबर दे

लय धुतला बायकोने त्याला

भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग

पीत नाहीत ग ते, मित्रच नालायक आहेत त्यांचे.

पण तिला काय माहित की आपला गंगाधरच शक्तिमान आहे


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment