नवरा आणि बायको मराठी विनोद | Husband and Wife Marathi Jokes


रात्री २ वाजता बायकोचा मोबाईल वाजला.

नवरा गडबडीत उठला.
बायकोचा मोबाईल बघितला तर मेसेज होता, “ब्युटीफुल”

नवऱ्याने रागाने बायकोला उठवुन विचारले,
“तुला ईतक्या रात्री ब्युटीफुलचा मेसेज कोणी पाठवलाय?”

बायको पण चक्रावली आता ४० च्या वयात ब्युटीफुल कोण म्हणणार आपल्याला??

जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तेव्हा नवऱ्याला ओरडुन म्हणाली,
“चष्मा लावून मोबाईल उचलत जावा “बॅटरी फुल” लिहिले आहे.”

बायको सोबत काल झालेल्या शाब्दीक चकमकी नंतर असं वाटतं
की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असलं पाहिजे.

ज्या 300 शब्द प्रति मिनिटं बोलल्या नंतर म्हणतात की
– माझं तोंड उघडायला नका लावू.

लग्नाच्या पुजेवेळी

नवरा : गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसवायच की उजवीकडे?

गुरूजी : बघ जमतय तस कर, नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे

बायकांनी नवऱ्यासाठी करवा चौथचे व्रत करण्याऐवजी

मौनव्रत केल्यास पती २५ वर्ष जास्त जगू शकतो .

बायको: मला बोलायचीही इच्छा नाही,
तुम्ही माझा वाढदिवस पुन्हा विसरला… असं होतंच कसं?

नवरा: तुझा वाढदिवस मी लक्षात ठेवावा असं वाटतच कसं तुला?
तुझे वय वाढलंय असं वाटतच नाही.

बायको: खरंच?

नवरा: (मनात) टायमावर डायलॉग आठवला, नाहीतर काही खरं नव्हतं आज. '

पत्नी : जर मी अचानक मारून गेली तर तुम्ही दुसरे लग्न कराल का?

पती : नो डार्लिंग, तसा तर मी स्वप्नातही विचार करू शकत नाही.

पत्नी : का नाही का? तुमच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी ना.
प्लिज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा, तुम्हाला माझी शपथ डार्लिंग.

पती : ओह, मेल्यानंतर पण माझी एवढी काळजी??
पत्नी : तर प्रॉमिस, तुम्ही दुसरे लग्न कराल ना?

पती : ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्यासाठी दुसरे लग्न कारेन.
पत्नी : तुम्ही तुमच्या नवीन पत्नीला या घरात ठेवाल ना?

पती : हो, पण मी तिला तुझी रूम नाही देणार वापरायला.
पत्नी : तिला आपली कार चालवायला द्याल ना?

पती : नो, नेव्हर, त्या कारमध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत.
तुझी आठवण म्हणून मी कायम माझ्याजवळ ठेवील ती कार. तिला नवीन कार घेऊन देईल
पत्नी : आणि माझे दागिने?
पती : ते मी कसे देईल तिला? त्यात तुझ्या आठवणी आहेत ना. मी तिला नवीन दागिने बनवून देईन.
पत्नी : आणि तिने माझ्या चप्पल वापरल्या तर?
पती : नाही वापरू शकणार ती. तिच्या पायाची साईज ७ आहे आणि तुझ्या पायाची ९.

भयाण शांतता….. (चप्पल तुटेपर्यंत हाणला नवऱ्याला)

एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.

तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.

नवरा आता चार दिवसांपासून भुकेला त्या मुलाला शोधतोय

बायको: माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना
तरी मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुझ्याबरोबर कंटाळलेय

नवरा: अगं वेडी, रक्ताच्या नात्यांमध्ये कुठे लग्नं होतात काय?

एकदा एका राजाने बायकोचे ऐकणारे आणि न ऐकणारे पुरुष पाहायचे ठरवले.

ऐकणारे आणि न ऐकणारे अशा दोन रंग करायला सांगितले.
सर्व पुरुष बायकोचे ऐकणारे याच रांगेत उभे होते.
फक्त एकच पुरुष न ऐकणारे अशा रांगेत उभा होता.

राजा म्हणाला: वा तू एकटाच बायकोच न ऐकणारा खरा पुरुष आहे.

त्यावर पुरुष म्हणाला: नाही, मला बायकोनेच येथे उभे राहायला सांगितले आहे.

काल रात्री उशिरा घरी पोहोचलो.
बराच वेळ बेल वाजवली पण बायकोने काही दर उघडलं नाही.
शेवटी आख्खी रात्र रस्त्यावर काढली.

मित्र: मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?

नाही रे, सकाळी उठल्यावर लक्षात आलं की बायको माहेरी गेलीय
आणि चावी माझ्या खिश्यातच आहे.

तात्पर्य: कमी प्या रे

नवरा: माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय,
ताबडतोब अँब्युलन्स ला फोन लाव.

बायको: हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा.

नवरा: राहू दे, थोडं बरं वाटतंय आता.

नवरा: हल्ली तुझे उपवास नसतात का?
लग्नाआधी बरेच करायचीस ना?

बायको: हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं
आणि माझा विश्वासच उडाला उपवासांवरचा.

बायको: तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, रंकाळा, गणपतीपुळे
कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा. आणि आता कुठेच नाही नेत.

नवरा: निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का तू?

बायको: काय हो बाहेर एवढा पाऊस पडतोय.
का एवढा उशीर झाला घरी यायला?

नवरा: स्टेशनला भिजलेल्या साड्यांचा सेल लागला आहे ना तो पाहत होतो

बायको: मग आणली का नाही एखादी ?

नवरा: नेसलेल्या होत्या ना!!

नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं.

भाजीवाला विचारतो: मैडम खूप शिकलेल्या आहेत वाटतं.

नवरा (खुश होऊन): हो इंजिनियर आहे ती, तुम्हाला कसं कळलं?

भाजीवाला: त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमॅटो
आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला.

पेट्रोल पंपावर पहिले प्रत्येकजण आपल्या बायकोला
पेट्रोल पंपाच्या बाहेर उतरवून पेट्रोल भरायला जात होता.

मी खूप विचार केला असे का?

नंतर तिथला बोर्ड पहिला आणि खूप हसलो राव
… लिहिलं होतं, “आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्यात”

तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल तर अविवाहित असताना बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चे चैनल पण बदलू शकत नाही.

गणपतीला दोन बायका असतात रिद्धी आणि सिद्धी

सामान्य माणसाला एकच बायको असते आणि ती पण जिद्दी

एक बाई कपडे धुताना दुसरीला

तू वापरतेस तोच साबण मीही वापरते
पण तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे?

दुसरी: आगं, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे
असे समजून धोपटते … म्हणून

माणूस: केस बारीक कापा

कटिंग वाला: किती बारीक कापू ?

माणूस: बायकोच्या हातात येणार नाही इतके


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment