रजनीकांत जोक्स | रजनीकांत मराठी विनोद | Rajinikanth Marathi Jokes


एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला..

शेवटी सूर्याचीच पापणी लवली.

एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं,
उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस.
हे सगळे मनाचे खेळ असतात.

रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!

रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला,
दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली..

बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.

एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं..

रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!

एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?

अर्थातच रावण यार!

प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?

रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं
किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं..

त्यातूनच गुगलचा जन्म झाला.

एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने
एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला..

आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.

संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत.

टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.

रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले..

भारतात बसून, ब्लूटुथवरून.

एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली..

सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.

प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते,
ते परतच केले नाहीत..

तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.

रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता.

रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?

कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.

संता-बंता आत्महत्या करणार आहेत.

रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही,
अशी त्यांची तक्रार आहे.

रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली..

शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.

रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले..

त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.

एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?..

ट्रॅफिक हवालदार..

सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?

मिशन इम्पॉसिबल हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता..

रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!

सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती..

जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..

एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला..

रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ढिशक्यांव!!!!

रजनीकांत कॉलेजात शिकत होता

तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3

You May Also Like