रजनीकांत जोक्स | रजनीकांत मराठी विनोद | Rajinikanth Marathi Jokes


ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा..

तुम्ही रजनीकांत असं उत्तर देणार होतात, हो ना?

पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.

रॉजर फेडरर म्हणाला, मला टेनिसबद्दल काहीही विचार..
मला सगळं काही ठाऊक आहे?

रजनीकांतने विचारलं, नेटमध्ये भोकं किती असतात?

मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते..

कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.

इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर
रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.

पॉवर ऑफ रजनीकांत!

तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता..
तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.

रजनीकांतशी गप्पा मारताना..

राज ठाकरेही तामिळ बोलतात.

एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने
रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो,

तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.

लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली..

ती जागा आज एस्सेलवर्ल्ड म्हणून प्रसिद्ध आहे.

रजनीकांत घडय़ाळ घालत नाही.

कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.

एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!!

तेव्हापासून तिला मराठी पिक्चर भेटने बंद झाले - बिच्चारी !

एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली.
ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह धडाडून पेटला..

त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?

रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता.

रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?

कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.

एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला,
आय अ‍ॅम बाँड, जेम्स बाँड.

त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली.
बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला,

आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना रास्कला.

एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले
आणि लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले..

त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.

आई आई, तो बघ तारा तुटला!
नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही.

रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!

रजनीकांतचा मुलगा: "आय्यो मेरा पप्पा इतना लंबा!
है के खडे खडे चलता पंखा रोक देता है!"!
!
. मकरंद अनासपुरेचा मुलगा: "उसमे कोणती मोठी गोष्ट है? !
मेरे वडील भी लम्बेच है, लेकीन वो ऐसा आगाउपणा नाही करते."

एकदा रजनीकांत व मकरंद (मक्या) बोलत असतात.

रजनिकांत : मी तर माझ्या ” जी. एफ़ ” ला ती जगात कोठेही असली
तरी तिच्या परफ़्युमच्या वासाने ओळखु शकतो.

.
.
.
मकरंद (मक्या): तुझ्या मायला तुझ्या !
रजन्या, आधल्या जन्मात तु कुत्रा होतास की काय ??

प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, तुला भविष्यात काय करायचे आहे?

मुलगा उत्तरला, एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय.

नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय.

भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.

प्रोफेसर म्हणाले, बाप रे, तुझं नाव काय? सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.

एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली..

आज जग त्याला बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3

You May Also Like

Add a Comment