शिक्षक आणि विद्यार्थी विनोद | Teacher & Students Jokes in Marathi


शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते.

शिक्षक: भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.

बंड्या: आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे.

शिक्षिका - चिंटू, तुला ५० मार्क देताना मला आनंद होतोय.

चिंटू - मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता.
शिक्षिका- ते कसे?

चिंटू - पूर्ण १०० मार्क देऊन.

शाळेचे तपासनीस एका शाळेवर तपासणीसाठी जातात.

तपासनीस: बाळा तुझे नाव काय?
विद्यार्थी: पांडू.

तपासनीस: अरे बाळा, पांडू नाही, पांडुरंग असे सांगावे.
तपासनीस दुसर्‍या मुलाला विचारतात,

तपासनीस: आणि बाळा तुझे नाव काय?
दुसरा विद्यार्थी: बंडुरंग.

हेडमास्तर: का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?

बंड्या: काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर: बस ने येता येतं नव्हतं का गधड्या?

बंड्या: मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ

गुरुजी: तुझा जन्म कोणत्या वारी झाला?

बंड्या :मंगळवारी,
बंड्या :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला.
गुरुजी :रविवारी

बंड्या :गप बसा राव मास्तर...रविवारी सुट्टी असती.
'

बाई: कायरे बंड्या आज शाळेत यायला एवढा उशीर का?

बंड्या: गायीला बैलाकडे घेवून गेलो होतो.

बाई: हे काम तुझे बाबा नाही करू शकत का?

बंड्या: करू शकतात पण बैल चांगला करतो.

बाईना चक्कर आली.

गुरुजी: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड.
बंड्या: लोखंड

गुरुजी: दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
बंड्या: लोखंडच जड

गुरुजी: अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
बंड्या: नाही गुरुजी लोखंडच जड

गुरुजी: गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे…
बंड्या: तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा,

मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते

सर: होमवर्क का नाही केले?
मुलगा: सर लार्ईट गेले होते.
सर: मेणबत्ती लावायची मग.
मुलगा: काडीपेटी नव्हती.
सर: का, काय झाली?
मुलगा: देवघरात होती.
सर: घ्यायची मग.
मुलगा: अंघोळ नव्हती केली.
सर: का नाही केली?
मुलगा: पाणी नव्हते.
सर: का?
मुलगा: मोटार चालू होत नव्हती.
सर: का?

मुलगा : आधीच सांगितले ना की लाईट गेलेले म्हणून.

शिक्षक: मुलांनो तिसर विश्वयुद्ध झाल तर काय होईल?

बाळू: सर फार गंभीर परिणाम होतील.

शिक्षक: सांग काय परिणाम होतील ?

बाळू: सर ईतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.

शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का?

राजू : नाही सर, तशी गरज नसते.
माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.

शिक्षक : बाळू, वर्गात थोड लक्ष देतोस का ?

बाळू : सर, मी शक्य तितक कमीच लक्ष देतोय.

शिक्षिकाः करण तू गृहपाठ का केला नाहीस?
करणः सॉरी, मॅम.

शिक्षिकाः माझ्या शब्दकोशांत सॉरी हा शब्द नाही.

करणः लायब्ररीमधल्या शब्दकोशांत नक्की असेलच

शाळेत English चे lecture चालू असते.

मास्तर _ : गण्या 'it' केव्हा वापरतात ?

गण्या _: घर बांधताना !!!!

मैडम :-“काय रे एकटाच का हसतोयस.?

सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो,
म्हणजे आम्ही देखिल त्याचा आस्वाद घेउ..!”

चंप्या: “मैडम हा तुम्ही आल्यावर “माझी आर्ची आली” म्हणाला..!!!

गुरुजी: ती मुलगी सर्व मुलांकडे पाहून हसते
सांग बर झंम्प्या या वाक्यात मुलगी काय आहे?

झंम्प्या: “मुलगी चालू आहे.

शिक्षक: सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?

हात वर करून बंड्या सांगतो,
‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक: काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही.

बाबा: काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?

चंदु: हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा: ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?

चंदु: हो बाबा, त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात.

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..
तू परीक्षेला नाही बसू शकत…..

गण्या: फिकीर नाॅट गुरूजी… आपल्याला जराबी घमेंड नाय …
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा… गुरूजींनी शाळा सोडली…

धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!

संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ…… या ओळिचा अर्थ काय ?

बंड्या : तु झोपुन जा आई, मी ज्योती च्या घरी जात आहे….
संस्कृत चे शिक्षक कोमात बंड्या आपला जोमात…


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment