शिक्षक आणि विद्यार्थी विनोद | Teacher & Students Jokes in Marathi


शाळेत मराठीचा क्लास चालू होता.

बाई: हे बघा मुलांनो,
मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!

मन्या: बाई काढून दाखवा ना !!!!!

बाई(लाजुन): खाली बस मन्या येडया! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात

गुरूजी: बंड्या भारत कधी स्वतंत्र झाला.

.
.
.
.
.
.
.
बंड्या: कवाच…

गुरुजी मुलांवर खुश झाले...

गुरुजी: "मुलांनो जखमेवर मीठ चोळणे" याचं उदाहरण सांगा..

मुलं: पेट्रोल पंपावर मोदींचा हसता फोटो बघणे

गुरुजी: शाब्बास मुलांनो ...

शिक्षिकाः- एकीकडे पैसा,
एकीकडे अक्कल, काय निवडाल.

विद्यार्थीः पैसे.

शिक्षिकाः- चूक. मी अक्कल
निवडली असती.

विद्यार्थीः- तुमच बरोबर आहे बाई,

ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच घ्यायच असतं ..

आज कालच्या मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी
त्यांचे शिक्षक मुलांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करतात.

.
.
.
.
.
.
.
आणि आमचे एक होते पहिल्या दिवशी कचरा गोळा करायला लावायचे. '

मास्तर: दिप्या तू मोठेपणी कोण होणार?

दिप्या: मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला,
2-3 गाड्या, दिमतिला 10 नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार.

मास्तर: बस बस. आता सायली तू सांग. तू मोठेपणी कोण होणार?

सायली: दिप्याची बायको.

मास्तर कोमात. "कार्टी लई आगाव झालीत "

टिचर:- तुझे वडील काय काम करतात....??
मुलगा:- ते K F C चे मालक आहेत..

टिचर :- ओ..हो..मग सांग बरं
KFC चा फुल फॉम....काय..? .
..
...
....
मुलगा:- काळुबाई फरसाणा सेंटर..

गुरुजी: भारताचे 5 ऐतेहासिक वास्तुचे नाव सांग?

बंड्या: ताजमहाल.
गुरुजी: आणि 4 ही सांग..
बंड्या: चार मीनार..

शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा.

"सापाच्या शेपटीवर पाय देणे "

गण्या: बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे
शिक्षकांनी गण्याला मिठी मारली.

गुरूजी: सांगा बरे बंडू ....

कडधान्य म्हणजे काय?

बंडू: गुरूजी, शेताच्या कडं कडं नी जे धान्य उगवते.
त्यास कडधान्य असे म्हणतात.

गुरुजी: सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात?

गण्या: कारण भारतातील बायका त्यावर पण
कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत..

गुरुजी = गण्या, 52 गावांची नावे सांग

गण्या = चाळीस गाव ,आणि बारामती

गुरुंजी राजिनामा देऊन वनवासाला निघुन गेले

विज्ञानाचा तास सुरू असतो.

मास्तर : सांग बर बंड्या साखर आपली सर्वात मोठी शत्रु का असते?

बंड्या: कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरघळली की तिचा पाक होतो.

मास्तर शाळा सोडून अफगानीस्तानला गेले.

टीचर: लिहा दुनिया गोल आहे.

स्टूडंट : तुम्ही सांगता म्हणून लिहितोय
नाहीतर दुनिया "लय हरामखोर " आहे

हद झाली राव..

. आजकाल ९-१० वी चे मूलं स्टेटस टाकत आहे..
Feeling Love
Heart Broken

. . आम्ही जेव्हा शिकत होतो.
तेव्हा feeling तर दूरची गोष्ट हाय..

.
.
स्वप्नात पन गणिताच मास्तर
हाणताना दिसायच

"शब्दाने शब्द वाढतात म्हणून

आम्ही तोंडी
परिक्षेमध्ये शांत बसायचो...!!"

शिक्षक :- मुलांनो, जगात अशी कोणती गोष्ट आहे.

जी बनवली तर माणसाने आहे, पण तो तिथे जाऊ शकत नाही?

मन्या: सर "लेडीज मुतारी".....

सरांनी शाळा सोडली.....

गुरुजी: गण्या भारत कधी स्वतंत्र झाला?

गण्या: लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर

गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस?

विद्यार्थी - नाही गुरुजी ....
.
.
.
.
.
.
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!
गुरुजी पृथ्वी सोडून गेले.....


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment