Best Powerful Motivation In Marathi ! घरात रहा, सुरक्षित रहा !

आपण कायम अशा लोकांना रडवतो जे सतत आपली काळजी करत असतात (आई- बाबा) आणि आपण अशा लोकांसाठी रडतो जे आपली कधीच कदर करत नाहीत (आपत्य). आपण त्यांची काळजी करत बसतो जे आपल्यासाठी कधी रडणार देखील नाहीत (समाज)!
जे आपले आहे त्याची आपण कधीच कदर करत नाही (शरीर).

आपण कायम अशा लोकांना रडवतो जे सतत आपली काळजी करत असतात.

आणि आपण अशा लोकांसाठी रडतो जे आपली कधीच कदर करत नाहीत.

आपण त्यांची काळजी करत बसतो जे आपल्यासाठी कधी रडणार देखील नाहीत!

आणि जे आपले आहे त्याची आपण कधीच कदर करत नाही.

मित्रानो आज जीवनाचे सत्य तर हे आहे की जिवंत होतो तेव्हा कोणी जवळ बसवले नाही आणि आता सर्व माझ्या चारही बाजुंनी बसलेले आहेत.

पहिले कधी कोणी माझी विचारपूस सुद्धा केली नाही आणि आता सर्व जण अश्रू ढाळत आहे. जेव्हा जीवंत होतो तेव्हा एक रुमाल सुद्धा कोणी भेट म्हणून दिला नाही आणि आता शाल आणि नवीन वस्त्र माझ्या वर टाकले जातायेत. सर्वांना माहीत आहे की आपल्याला हा काही कामाचा नाहीये परंतु तरी देखील सर्व जण दुनियादारी निभावत आहेत.

कधी कोणी एका वेळचे जेवण देखील दिले नाही परंतु आता माझ्या तोंडात शुद्ध देशी तूप टाकत आहे. जीवनात एक पाऊल देखील कोणी सोबत चालले नाही, आणि आता फुलांनी सजवून मला खांद्यावर घेऊन जात आहे.

आज कळले की मृत्यू हा जीवनापेक्षा किती उत्तम आहे, आम्ही तर काही कारण नसताना जगण्याची इच्छा बाळगून आहोत.
मित्रांनो इच्छेचा कधीच अभिमान करू नका, कारण भरारी ही जमिनिवरूनच सुरू होते आणि तिथेच थांबते.

जर आपल्या व्यक्तीला ओळखायचे असेल तर त्याला फक्त एक गोष्ट म्हणा की मी अडचणीत आहे, तो व्यक्ती त्याची लायकी दाखवून देईल. जर विश्वास नसेल तर एकदा करून बघा!

यासाठी आपले नाते आणि घराला एका पवित्र बंधनात बांधून ठेवा आणि सर्वांना सोबत घेऊन चालत रहा. तुम्ही जरी 500 करोड इतक्या भव्य संपत्तीचे मालक असाल तरी संध्याकाळ होताच आपली वाट बघणारे 5 खरे मित्र नसतील तर तुम्ही या जगातील सर्वात गरीब मनुष्य आहात.

मित्रांनो कठीण काळ आहे, घरात रहा, सुरक्षित रहा आणि स्वस्थ रहा! जीवंत रहाल तर सर्व काही प्राप्त करू शकाल, परंतू तुम्हीच नसाल तर सर्व काही व्यर्थ आहे!

त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय, घरात रहा, आपली आणि आपल्या परिजनांची काळजी घ्या!

 

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.