Be Strong Be Positive | सकारात्मक दृष्टीकोन | Success Stories In Marathi

Be Strong Be Positive | सकारात्मक दृष्टीकोन

हे समजून घ्या अन्यथा आयुष्यभर रडत रहावे लागेल

वाईट वेळेची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला ते लोक देखील सल्ले द्यायला लागतात जे स्वतः कोणत्याही गोष्टीसाठी सक्षम देखील नसतात. खरी सुंदरता तर हृदयात आणि आत्म्यात असते, माहीत नाही का सर्व लोक तिला कपड्यांमध्ये आणि चेहऱ्यामध्ये बघत असतात?
कुलुपाकडून सोबत राहण्याची गोष्ट शिका कारण ते कुलूप तुटते तरी देखील त्याची चावी बदलत नाही. किती विचित्र आहे हे जीवन जे खेळण्यापासून सुरू झाले होते आणि आता स्वतः एक खेळणं बनून राहिली आहे.

मित्रांनो प्रेम तेव्हाच करा जेव्हा तुम्ही ते टिकवू शकता, नंतर येणाऱ्या मजबुरी मुळे एखाद्याला सोडून देणे ही वफादारी नसते. खूप वाईट वाटते जेव्हा एखाद्यासाठी खूप काही करून देखील तो मनुष्य जाता जाता म्हणून जातो की मी सांगितलं होतं का हे सर्व करायला?
तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल किंवा नात्यांमध्ये पुढे जायचे असेल तर हृदयाला खूप मजबूत बनवावे लागते, कारण जो कमजोर असतो तो न प्रेम निभावू शकत, न नाते निभावू शकत!

मित्रांनो ताकद जीवन आहे आणि कमजोरी हा मृत्यू आहे. कमजोर मनुष्यासाठी या जगात कोणतीच जागा नाहीये, मग ती कमजोरी शरीराची असू देत, मनाची असू दे किंवा धनाची! जर तुम्ही शरीराने कमजोर आहात तर पुन्हा पुन्हा आजारी व्हाल, स्वतःची सुरक्षा करू शकणार नाही, कायम घाबरत घाबरत जीवन जगाल आणि घाबरणाऱ्या लोकांचा हे जग कायम खिल्ली उडवत असते. जर तुम्ही मनाने कमजोर आहात तर कोणीही तुम्हाला उल्लू बनवून जाईल, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर घाबरून जाल, कायम तणावात राहाल आणि जीवनात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. कारण तुमचे कमजोर मन तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही, तुम्हाला ते हिंमत लावूच देणार नाही जी जीवनात पुढे जाण्यासाठी खूप जास्त महत्वाची असते.

जर तुम्ही धनाच्या म्हणजे पैशाच्या बाबतीत कमजोर असाल तर तुमची समाजात आणि मित्रपरिवार मध्ये काहीच इज्जत नसेल, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीत, तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या इच्छा देखील पूर्ण करू शकणार नाहीत. तुमचे संपूर्ण जीवन पैशाच्या कमजोरी मुळे डगमगत आणि तळमळत निघून जाईल.

त्यामुळे आम्ही सुरुवातीला बोललो होतो की बळ किंवा ताकद हे जीवनाचे प्रतीक आहे आणि कमजोरी हे मृत्यूचे प्रतिक आहे. अरे ते जीवन काय कामाचे जे आपण घाबरत, भीतीच्या सावटाखाली आणि तरसत घालवत असू? अशा आयुष्यापेक्षा तर चांगले जीवन त्या रस्त्यावरील कुत्र्याचे असते, कमीत कमी त्याला कोणत्याही गोष्टीला गमावण्याची भीती तरी नसते.

मित्रांनो जर तुम्ही दुर्बल राहिलात तर आयुष्यभर दुसऱ्याची गुलामी करत रहाल. आणि ज्यांना या सर्व गोष्टी बिनकामाच्या वाटत असतील त्यांना सांगू इच्छितो की गरीबाच कोणी आपलं नसतं, त्याची कोणी इज्जत करत नाही आणि कदरही करत नाही! त्यामुळे जीवनात सकारात्मक विचारांच्या सोबत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा, आपल्या जीवनात ते सर्व मिळवा ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. बिनकामाच्या सल्ल्यांकडे लक्ष न देता जीवनात फक्त पुढे वाटचाल करण्याकडे लक्ष द्या.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “Be Strong Be Positive | सकारात्मक दृष्टीकोन | Success Stories In Marathi”

Leave a Comment