Pu La Deshpande quotes in Marathi | पु ल देशपांडे यांचे सुविचार

 Pu La deshpande quotes in Marathi

जुन्यात आपण रंगतो… स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!”.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच..

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

लग्नापुर्वी शी न लूक्ड सो … लुकडी!
.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

माणसाचे “केस गेलेले” असले तरी चालतील…. पण…. माणुस हा “गेलेली केस” असु नये….

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे….

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

आयुष्य फार सुंदर आहे… ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे…

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

खरं तर सगळे कागद सारखेच… त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

– पु.ल. देशपांडे


 Pu La deshpande quotes in Marathi

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

– पु.ल. देशपांडे


मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment