दोष कुणाचा?? | Whose mistake for Mumbai flood in Marathi

मागच्या महिन्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात मेंनहोलमध्ये वाहून जाऊन बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी अंत झाला. बातमी वाचणाऱ्या प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली.

कुणी सिस्टीम वर मनसोक्त तोंडसुख घेतलं, तर कुणी सरकारला जाब विचारला. कुणी म्हणे न्यायालयात याचिका दाखल केली. ह्या सर्व प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आणि स्पष्ट आहेत.

परंतु आपण कुणीच असा विचार केला का? डॉ. अमरापूरकर यांच्या बाबतीत जे घडलं ते अनेक लोकांसोबत सुद्धा घडलेलं आहे. डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूमुळे ही बाब अधोरेखित झाली एवढंच. मुसळधार पावसाने असे असंख्य बळी ठरतात. निसर्ग कोपला असे बिनदिक्कत जाहिर करून आपल्या घरात आरामात बसून वाफाळलेल्या चहाचे घोट घेत टी व्ही वरच्या बातम्या पाहून काय करतो आपण ? सिस्टीम ला शिव्या घालतो. सिस्टीमचा दोष आहेच पण आपण सर्वजण त्याच सिस्टीमचा एक भाग आहोत हे बेमालूमपणे विसरून जातो.

मुंबईच नाही तर देशातील जवळ जवळ सगळ्याच मोठ मोठ्या आज ही अशी अवस्था आहे. आणि ही अवस्था होण्यासाठी सर्वात आधी जबाबदार आहोत आपण. प्लास्टिक बंदी,इकोफ्रेंडली संकल्पना, कचऱ्याचे योग्य प्रकारे विघटन हे शब्द फक्त वाचण्यापूरतेच चांगले वाटतात. पावसाचं पडलेलं पाणी वाहून जाण्यासाठीचे सगळे मार्ग आपणच बंद करत चाललो आहोत.

यासाठी वाढती लोकसंख्या, शहरावर वाढत चाललेला अतिरिक्त भार, एकमेकांवर फक्त चिखलफेक करण्यात धन्यता मानणारे राजकारणी ही आणि अशी बरीच कारणं जबाबदार आहेत. कुणी काहीच केलं नाही तर येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी भयानक होईल. सामान्य नागरिकांनि नियमांचे योग्य पालन करून आपापली जबाबदारी ओळखून प्रत्येक पाऊल उचलले पाहिजे. नाहीतर आज जी मुंबई सारख्या मोठ्या शहरांची अवस्था आहे तीच अवस्था भविष्यात लहान शहरांची होईल. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदार व कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून स्वतःलाच काही बंधने घालून घेतली पाहिजेत. नाहीतर येणाऱ्या पिढीसमोर काय वाढून ठेवणार आपण ? तुंबलेली गटारं आणि कचऱ्याचे ढीग??

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment