Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi | शिवाजी राजे | Shivaji Maharaj Quotes in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes in Marathi: मित्रांनो छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती 19 Feb 2021 ला आहे, आणि आम्ही या प्रसंगी Shivaji Maharaj Status आपल्या मायबोलीत म्हणजे मराठी मध्ये घेऊन आलो आहोत. आजच्या या Chatrapati Shivaji Maharaj messages च्या लेखामध्ये आम्ही छान छान असे Chatrapati Shivaji Maharaj Marathi Quotes चा सुद्धा collection केलेला आहे. तसेच तुम्ही या wishes, Facebook किव्हा Whatsapp द्वारे तुमच्या प्रियजनांना सुद्धा पाठवू शकता.

मित्रांनो तुम्हाला जर का तुम्ही Chatrapati Shivaji maharaj images च्या शोधात असाल तर पुढील लिंक वर क्लिक करा Shiv Jayanti 2020 | Chatrapati Shivaji Maharaj photo | Shivaji Maharaj Images

महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे
व तरुणांचे खरे प्रेरणास्थान “श्री छञपती शिवाजी राजे भोसले”
यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा.
थोर पराक्रमी राजांना मानाचा मुजरा…

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

“छत्रपती श्री शिवाजी महाराज”
सूर्य-किरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरी वर भगवा हि होता खेळत..
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल….. …
मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता…
आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी
मराठ्यांचा धनी मागितला होता..

शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!!
म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा…!!

छत्रपति शिवराय’…
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा”
शिवसुर्य “…!!!!

 हे देखील वाचा: शिवजयंतीच्या शुभेच्छाi | Shivjayanti Wishes In Marathi 2020

“वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर…. पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय,
तीन्ही लोकी “जय शिवराय” चा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा

“हातात चिंध्या बांधून”
“मैत्री करणारी आमची जात नाही”
“वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव”
“झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही.”

एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची..

चिंता नव्हती परिणामांची ..
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची..
त्यांची जात मर्द मराठ्याची,
देशात लाट आणली भगव्याची,
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची…
म्हणूनच म्हणतात,
“जय भवानी जय शिवाजी”

सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
“मराठी” असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय ….

कुणाची तहान
कुणाची मान
तळपत्या पातीला
रक्ताची शान
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान
जय भवानी…जय शिवराय

मुजरा कर राजांना
अरे घाबरतोस काय नामर्दांना
जात आपली मावळ्यांची
भीती न आम्हा कावळ्यांची….. !!
आहे जरा आड वाट
पण इथेच दिसतो आमचा थाट
कधी पडलीच आपली गाठ
तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट …!!
जय जिजाऊ!!
जय शिवराय!!

श्वासांत रोखूनी वादळ्,
डोळ्यांत रोखली आग….. देव आमुचा छञपती,
एकटा हिंदु वाघ…..हातात धरली तलवार,
छातीत भरले पोलाद….धन्य-धन्य हा महाराष्ट्र,
धन्य हे आपले महाराज ||
॥ मुजरा’राजे’मुजरा ॥
॥ जय भवानी जय शिवाजी ॥

“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर”
“क्षत्रिय कुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज”
“महाराज”
“श्रीमंत”
“श्री”
“श्री”
“श्री”
“छत्रपती”
“शिवाजी”
“महाराज”
“की”
“जय”
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंती निमित्त सर्व जनतेस भगव्या हार्दिक शुभेच्छा

ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.

।। स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला
दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही
आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे
धाडस नियती सुध्दा करत नाही।।

-छत्रपति शिवाजी महाराज..

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

“हातात चिंध्या बांधून”
“मैत्री करणारी आमची जात नाही”
”वेळेप्रसंगी मित्राच्या”
“छाती वरचा घाव”
“झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही ..”

शांत बसलेल्या वाघ्याला
दुबळा समजू नका,
फाडून टाकेल तुम्हाला तो
त्याच्या वाटेला जाऊ नका,
आम्ही दिसतो साधे भोळे
आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका,
करून टाकेन तुकडे तुकडे
आमच्या नादाला लागू नका..!!!
जय शिवाजी …….जय भवानी

पुन्हा दूरवर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!

करुनी तांडव जिंकु आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त…
|| जय शिवराय ||

केवळ स्त्रिया आपल रूप आरश्यात पाहतात ……
पण खरा वीरपुरुष आपले रूप तलवारीच्या पात्यात पाहतो.
।। जय शिवराय ।।

मित्रानो माझा रक्ता रक्तात भिनलंय काय…..
.
.
.
.
जय शिवराय…. .
जय शिवराय…. .

शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि.
असे होते राजे आमचे स्वराज्या साठी जीवाशी खेळनारे.
जय भवानी जय शिवाजी.

शिवरायांची आम्हाला आण आहे
मराठी ही महाराष्ट्राची शान आहे,
जे महाराष्ट्रात राहून,
मराठी बोलत नाहीत,
ती महाराष्ट्रातील घाण आहे……..
जय भवानी…….
जय शिवाजी…….

नका लाजवु पुन्हा पुन्हा रे,
स्वभाव माझा असा जुना रे…..
मुजरा माझ्या राजास करा,
येईल जन्मा तोच पुन्हा रे.
.
.
.
.
|| जय शिवराय ||
|| जय शिवराय ||

आज ३५० वर्षांनंतरही माझ्या राज्याच्या नावाच
वादळ या सह्याद्रिच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये घुमतय,
अन् काल जन्माला आलेल पोरगं सुद्धा
‘जयभवानी’ हे नाव ऐकताच ‘जय शिवाजी’
अगदी ठेक्यातच म्हणतयं !

निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे
मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे…..

फुलाची कहाणी लिहिली वसंताने,
रात्रीची कहाणी लिहिली चंद्राने,
मराठा नाही मिंदा कुणाचा…
कारण मराठ्यांची कहाणी लिहिली त्यांचा तलवारीने…!!!

तलवार एक धारी तर शिवा दोन धारी होता,
एकटाच शिवा माझा लाखात भारी होता,
सर्व मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण
शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप होता.
|| जय भवानी जय शिवराय ||

जर स्रुष्टि चे नियम नसते…..
तर आमचे रक्तही भगवे असते……
हर हर महादेव…
…….जय भवानी
जय शिवराय…..

दोन ओळी कायम लक्षातठेवा..
.
.
.
.
शिवरायांनी तुमचे भविष्य जाणले होते…..!!
निदान तुम्ही त्यांचा इतिहास तरी विसरू नका …..

|| जय शिवराय ||
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून,
भविष्य घडवायला शिकवणाऱ्याला
पवित्र मातीतल्या राजाला
रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..

नावापुढे “राजे” लावून जर
“राजेपण” आले असते,
तर जिजाऊंनी शिवबांचा जन्म होताच, त्यांचे नाव “शिवाजीराजे” ठेवले
असते, “शिवाजी” नाही.
जय जिजाऊ, जय
शिवराय……….!

जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Sarsenapati Prataprao Gujar Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi | शिवाजी राजे | Shivaji Maharaj Quotes in Marathi”

Leave a Comment