एकजूट साधती कार्यभाग  | Ekjut | Bal Katha in Marathi

एकजूट साधती कार्यभाग | Ekjut | Bal Katha in Marathi


एका जंगलात तमाल वृक्षावर एका चिमणीचे घरटे होते. त्यात त्या चिमणीची अंडी होती. एके दिवशी एक मदोन्मत्त हत्ती नेमका तमाल वृक्षाच्या सावलीत बसायला आला. पण त्याने सोंडेने तमालवृक्षाच्या ज्या फांदीवर चिमणीचे घरटे होते तीच फांदी ओढून घरटे खाली पाडले. त्यामुळे चिमणीची अंडी फुटली.


चिमणी या प्रसंगामुळे जोरजोरात रडू लागली. तिचा एक मित्र सुतार पक्षी जवळच राहत होता. चिमणीच्या रडण्याने तो धावत आला.सुतार पक्षी तिची समजूत काढू लागला, ''गेलेली अंडी परत येणार का? तेव्हा डोळे पुस आणि पुन्हा उद्योगाला लाग!'' तेव्हा चिमणी उत्तरते, ''हे सगळं खरं! पण या मदोन्मत्त हत्तीला ठार करण्याचा उपाय सांग. कारण याने माझी अंडी फोडलीत.''


सुतार विचार करून सांगतो, ''माझी वीणाखा नावाची एक माशी मैत्रिण आहे. तिची मदत घेऊ आपण!'' नंतर वीणाखा माशीला सुतार पक्षाकडून हकीगत कळल्यावर ती सांगते, ''माझा मेघनाद नावाचा एक बेडूक मित्र आहे. त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल.''


नंतर सर्वजण मेघनादाकडे जातात. चिमणीची कहाणी ऐकल्यावर तो हत्तीला ठार करण्याची युक्ती सांगते, ''हत्ती दुपारच्या वेळी जेव्हा झोपला असेल तेव्हा त्याच्या कानाशी बसून गोड आवाजात माशीने गुणगुण करायची. मग त्या आवाजाने हत्ती पण बेसावध राहील. त्यानंतर सुतार पक्षी त्याचे डोळे फोडून त्याला आंधळा करील. नंतर त्याला तहान लागल्यावर पाण्यासाठी तडफडू लागेल. मी बाजूच्या खड्ड्याजवळ बसून ''डराव डराव'' ओरडलो की हत्तीला वाटेल की इथे पाणी आहे. मग खड्ड्याच्या दिशेने चालत आला की खड्ड्यातच पडणार, मग जिवंत कसला राहणार? ''


मेघनाद बेडकाची कल्पना सगळ्यांना आवडते त्याचप्रमाणे हत्तीला खड्ड्यात पाडले जाते. थोड्या दिवसांनी हत्ती मरण पावतो.


तात्पर्य: एकजूटीने कार्य केल्यास शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्यावर मात करता येते.

You May Also Like

;
;